टीव्हीवर दिसणाऱ्या मॉडेल्स त्यांचे दिमाखदार रॅम्प वॉक पाहून अनेकांना वाटते आपणही मॉडेलिंगमध्ये करिअर करायला हवे. मग एक साधारण असा समज असतो की, फक्त सुंदर चेहऱ्यांनाच ही संधी मिळू शकेल. पण असे काही नाही. ज्या व्यक्तीला कॅमेऱ्याची आवड आहे. जी कष्टाळू पण मेहनती आहे. सुदृढ आहे, अशी कोणतीही व्यक्ती मॉडेल बनू शकते. कारण मॉडेलिंग म्हणजे एक मूकाभिनय असतो. पण अनेकांना मॉडेलिंग म्हणजे फक्त रॅम्पवर चालणे वाटते. यातही अनेक प्रकार आहेत. प्रत्येक प्रकाराच्या मॉडेलिंगमध्ये मूलत: काही गुणविशेष असणे आवश्यक असते.

मॉडेलिंगचे प्रकार पाहू या-

Loksabha Election 2024 Last 72 hours most crucial during elections
मतदानापूर्वीचे ३ दिवस का महत्त्वाचे असतात? काय असते प्रक्रिया?
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Reptiles, tigers, Reptiles news, Reptiles latest news,
विश्लेषण : वाघांइतकेच सरपटणारे प्राणीदेखील महत्त्वाचे.. पण तरीही ते दुर्लक्षित का असतात?
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?

रॅम्प वॉक-रनवे मॉडेल- या प्रकारात मॉडेलची उंची आणि वजन या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. या प्रकारात मॉडेल सडपातळ असणे फार महत्त्वाचे असते. जेव्हा डिझायनर कपडे बनवतात तेव्हा ते असेच मॉडेल निवडतात ज्यांच्यावर ते कपडे सहज बसू शकतील आणि छानही दिसतील. मॉडेलची उंची किमान ५.९ असणे आवश्यक असते. यामध्ये मुलींसाठी शरीराचे माप ३३-२४-३४ हे प्रमाण मानतात. आकर्षक डोळे, रेखीव हनुवटी, मोठे ओठ आणि चांगले केस असणे फार आवश्यक असते. या सगळ्या गोष्टी एकत्रच असल्या पाहिजेत असेही काही नाही. पण जर असतील तर सोन्याहून पिवळे.

प्रिंट कॅटलॉग मॉडेल-या प्रकारात कोणत्याही मॉडेलची उंची ही किमान ५ फूट ६ इंच एवढी असणे आवश्यक आहे. ६ फूट १० इंचापर्यंत उंची असलेल्या व्यक्ती या प्रकारात मॉडेलिंग करू शकतात. कॅटलॉग मॉडेलिंगमध्ये एकाच दिवशी सुमारे २० ते ३० वेगवेगळ्या कपडय़ांवर फोटोशूट करावे लागते. तेवढा संयम असायला हवा. कपडे घातल्यावर ते कशा प्रकारे दिसतील हे ग्राहकांना दाखवावे लागते. यासाठीच हे फोटोशूट केले जाते. या फोटोशूटमुळे कपडे विकत घेताना ग्राहकांना त्याचा अचूक अंदाज येतो.

कमर्शिअल मॉडेल : मॉडेलिंगमधला हा एक असा प्रकार आहे. ज्यात कोणत्याही प्रकारची वयोमर्यादा नसते. इथे कोणत्याही बांध्याच्या, उंचीच्या मॉडेल काम करू शकतात. एखाद्या प्रोडक्टच्या गरजेनुसार मॉडेल निवडल्या जातात. उदाहरण द्यायचे झाले तर खाद्यपदार्थ, क्रीम, घरगुती वस्तूंच्या जाहिराती, तांत्रिक गोष्टींची जाहिरात इत्यादी.

फॅशन मॉडेल : रॅम्प मॉडेलना आवश्यक असणारी उंची आणि बांधा इथेही आवश्यक असतो.

या मॉडेल फॅशन मासिकात अधिक झळकताना दिसतात.

स्विमसूट- या प्रकारात ५फूट ६ इंच एवढी उंची आवश्यक असते. यात आकर्षक मॉडेल असणे महत्त्वाचे असते. सडपातळ बांध्याच्या मॉडेलना अधिक पसंती मिळते. प्रत्येक मॉडेल अशा प्रकारचे मॉडेलिंग करतेच असे नाही. त्यामुळे या प्रकारात फार थोडय़ाचजणी दिसतात.

स्थूल बांध्यासाठी : हा एक नवीन प्रकार मॉडेलिंगमध्ये आला आहे. केवळ बारीकच नव्हे तर स्थूल बांध्याच्या व्यक्तीसुद्धा मॉडेलिंग करू शकतात. कारण आता अशा व्यक्तींसाठी खास कपडय़ांचे कलेक्शन केले जातात. यासोबतच हल्ली गरोदर महिलाही मॉडेलिंग करू शकतात.

या विषयात प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत का? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचे उत्तर होय असे आहे. परंतु यातील कोणत्याही संस्थेत नोंदणी करायच्या आधी तिथे नेमके कोण शिकवते, तेथील किती मॉडेल्स आजपर्यंत या व्यवसायात आल्या आहेत. तेथील प्रशिक्षकांचे फॅशन इंडस्ट्रीत कितपत योगदान आहे, हे लक्षात घेऊन मगच त्या संस्था निवडा.

मी स्वत: ‘कोकोबेरी मिनिस्ट्री ऑफ टॅलेन्ट’ या ठिकाणी मॉडेलिंगचे प्रशिक्षण देते. याशिवाय नवी मुंबईमध्ये वाशी येथे कोरिओग्राफर निशा हराळे, बंगळुरू येथे प्रसाद गडप्पा, पुणे येथे संदीप धार्मा तर दिल्ली येथे नोयनिका चॅटर्जी या व्यक्ती त्यांच्या संस्थेमार्फत मॉडेलिंगचे प्रशिक्षण देत असतात.

शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मॉडेलिंगच्या क्षेत्राकडे कोणत्याही पूर्वग्रहदूषीत नजरेने बघू नका. प्रत्येक क्षेत्रात चांगली, वाईट माणसे असतातच. आपल्याला नेमके काय करायचे आहे, काय करायचे नाही हे डोक्यात पक्के करा. त्यानुसारच वागा. कामाशी प्रामाणिक राहा. मग यश तुमचेच आहे.

लेखिका सुपरमॉडेल आहेत.

शब्दांकन – मधुरा नेरुरकर