जर्मनीतील बाऊहौस विद्यापीठामध्ये विविध विषयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. कला, संगीत व स्थापत्य क्षेत्रातील कामगिरीसाठी हे विद्यापीठ पूर्वी ओळखले जात असे. परंतु आता विज्ञान-तंत्रज्ञान व अभियांत्रिकीसारख्या क्षेत्रामध्येही विद्यापीठाने तितकीच भरीव कामगिरी केली आहे. वरील शिष्यवृत्तीसाठी विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय पदवीधर व पदव्युत्तर पदवीधर अर्जदारांकडून अर्ज मागवले आहेत.

शिष्यवृत्तीविषयी

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
Love Jihad, pune, Pune University
‘लव्ह जिहाद’च्या आरोपावरून मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल; पुणे विद्यापीठाच्या आवारातील घटना
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…

जर्मनीतील वेईमार शहरात असलेल्या बाऊहौस विद्यापीठाची स्थापना १८६० साली झाली होती. सुरुवातीला फक्त कला महाविद्यालय म्हणून ओळखली जाणारी ही संस्था टप्प्याटप्प्याने विद्यापीठामध्ये रूपांतरित होत गेली. १९९६ मध्ये ‘बाऊहौस विद्यापीठ’ असे नामकरण झालेल्या या विद्यापीठाने सन २०१०मध्ये स्थापनापूर्तीचे १५० वे वर्ष साजरे केले. सध्या विद्यापीठातील विविध विभागांमध्ये सुमारे चार हजारांच्या आसपास विद्यार्थी उच्चशिक्षण घेत आहेत.

विविध विभागांमध्ये चालू असलेल्या संशोधनातील गुणवत्ता वाढावी व त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता आकर्षित करत यावी या हेतूने बाऊहौस विद्यापीठाकडून ही शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांतील बाऊहौस विद्यापीठात उपलब्ध असलेल्या सर्व विषयांतील पदव्युत्तर व पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी प्रवेशासहित शिष्यवृत्ती बहाल केली जाते. शिष्यवृत्तीचा एकूण कालावधी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या कालावधीएवढाच असेल. शिष्यवृत्तीधारकाला दिलेल्या मर्यादित कालावधीतच त्याला त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. शिष्यवृत्तीअंतर्गत या कालावधीदरम्यान शिष्यवृत्तीधारकाला त्याच्या अभ्यासक्रमाचे संपूर्ण शिक्षण शुल्क दिले जाईल. याव्यतिरिक्त वर्षभर त्याला ४५० युरो दरमहा निवासी भत्ता दिला जाईल. इतर सुविधांमध्ये अर्जदाराला प्रवास भत्ता, संशोधन निधी, आंतरराष्ट्रीय आरोग्य विमा व प्रवास विमा इत्यादी गोष्टी बहाल केल्या जातील.

आवश्यक अर्हता

ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने बाऊहौस विद्यापीठात प्रवेश मिळवलेला असावा. अर्जदार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. अर्जदाराची पदवीपर्यंतची शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्तम असावी. पदवी पातळीवर त्याने किमान प्रथम श्रेणी मिळवलेली असावी. अर्जदाराचे इंग्रजी व जर्मन भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. जर्मन भाषेचे विविध स्तर उत्तीर्ण केल्याचे प्रशस्तीपत्र असावे. अर्जदाराने परदेशी विद्यापीठांच्या प्रवेशप्रक्रियेसाठी महत्त्वाची असलेली जीआरई किंवा जीमॅटसारखी परीक्षा उत्तीर्ण असावे अशी कोणतीही अट संस्थेने लागू केलेली नाही. मात्र, परदेशी विद्यापीठांच्या प्रवेशप्रक्रियेतील स्पर्धात्मकता लक्षात घेतली तर या परीक्षांपैकी शक्यतो जीआरई या परीक्षेत अर्जदाराने चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे त्याच्यासाठी फायद्याचे ठरेल. भारतीय अर्जदारांनी आयईएलटीएस वा टोफेल या इंग्रजीच्या परीक्षांपैकी कोणत्याही एका परीक्षेमध्ये किमान आवश्यक बँडस् किंवा गुण मिळवलेले असावेत. अर्जदाराचा सीव्ही अतिशय उत्तम असावा. ज्या विद्यार्थ्यांना इतर कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही अशाच विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती बहाल करण्यात येईल.

अर्ज प्रक्रिया

या शिष्यवृत्तीच्या अर्जप्रक्रियेसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर स्वतंत्र अर्जप्रणाली उपलब्ध आहे. अर्जदारास या प्रणालीमध्ये त्याचा अर्ज अपलोड करावयाचा आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या सॉफ्ट प्रती तयार ठेवाव्या. अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराकडे त्याचे एसओपी, सीव्ही, शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सस्क्रिप्टस्च्या अधिकृत प्रती, जीआरई, जीमॅट व आयईएलटीएस किंवा टोफेल यापैकी आवश्यक परीक्षांचे गुण, जर्मन भाषेत पारंगत असल्याचे प्रशस्तीपत्र, कार्यानुभवाचे प्रशस्तिपत्र इत्यादी गोष्टी तयार असाव्यात. अर्ज करताना ही सर्व कागदपत्रे एकाच पीडीएफमध्ये एकत्र करून विद्यापीठाच्या पोर्टलवर अपलोड करावीत. सर्व कागदपत्रे एकत्रित असलेली पीडीएफची १५ एमबीपेक्षा कमी आकाराची असावी.

निवड प्रक्रिया

सर्व अर्ज मिळाल्यानंतर प्रत्येक अर्जाची तपासणी केली जाईल. त्यामधून गुणवत्तेनुसार निवडक विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात येईल. शिष्यवृत्ती समितीचा निर्णय अंतिम राहील. गोपनीयतेच्या कारणास्तव फक्त यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या निवडीबाबत कळवले जाईल.

उपयुक्त संकेतस्थळ

https://www.uni-weimar.de/

अंतिम मुदत

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १७ डिसेंबर २०१७ आहे.

itsprathamesh@gmail.com