रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम या योजनेमध्ये सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना त्यांचे कौशल्य व क्षमता वाढविण्यासाठी खाजगी आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे प्रशिक्षण देण्यात येते. रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम या योजनेचा मूळ उद्देश उमेदवारांचे कौशल्य वाढवून त्यांना मागणीनुसार नोकरीक्षम करणे हा होय. रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम या योजनेमध्ये विद्यावेतन देण्यात येते.

सुविधा

  • रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमांतर्गत उपलब्ध पदे व उमेदवार निवडीचे वेळापत्रक ऑनलाइन पाहण्याची सुविधा.
  • रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमांतर्गत आपला सहभाग ऑनलाइन नोंदविण्याची सुविधा
  • प्रशिक्षणानंतर कायमस्वरूपी रोजगाराची संधी
  • रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमाच्या प्रशिक्षणाकरिता मुलाखत कार्यक्रम व निवडीबाबतच्या माहितीकरिता एसएमएस अलर्ट व इमेल सुविधा या सुविधांचा लाभ घेण्याकरिता रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय, महाराष्ट्र शासन- वेबसाइटवर (maharashtra.gov.in) नोंदणी करा अथवा यापूर्वीच नोंदणी केली असल्यास लॉगइन करा.

योजनेची ठळक वैशिष्टय़े

  • प्रशिक्षणासाठी किमान एसएससी उत्तीर्ण व वय १८ वर्षे पूर्ण असलेला उमेदवार पात्र आहे.
  • उमेदवारांचे कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांना खाजगी क्षेत्रातील आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येते.
  • या प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने आहे.
  • उमेदवारांना प्रशिक्षणाच्या कालावधीत शैक्षणिक पात्रतेनुसार दरमहा रुपये ३०० ते १००० पर्यंत विद्यावेतन देण्यात येते.
  • प्रशिक्षणाचा कालावधी समाप्त झाल्यावर उमेदवाराला नोकरीमध्ये सामावून घेतले जाऊ शकते.

उद्योजकांकरिता सुविधा

  • रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमांतर्गत पदे ऑनलाइन अधिसूचित करण्याची सुविधा.
  • उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यासाठी त्यांची शैक्षणिक पात्रता, कौशल्य, अनुभव, वास्तव्याचे ठिकाण, इ.नुसार शोध ऑनलाइन घेण्याची सुविधा.
  • विवरणपत्रे, विद्यावेतन प्रतिपूर्ती मागणीपत्रे. इ. कालमर्यादेत सादर करण्यासाठी एसएमएस अलर्ट व इमेल सुविधा.