News Flash

मुलींचे वसतिगृह

बहुसंख्य विद्यार्थिनींपर्यंत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पोहोचावे, हादेखील या योजनेचा हेतू आहे.

राज्यातील शैक्षणिकदृष्टय़ा मागास गटांतील मुलींसाठी शंभर खाटांचे मुलींचे वसतिगृह उभारणे, असे या योजनेचे स्वरूप आहे. यापूर्वी खाजगी संस्थांमार्फत मुलींसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थिनींसाठी वसतिगृह स्थापन करण्यासाठी आणि चालवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना साहाय्य दिले जात असे. त्याऐवजी ही योजना सुरू करण्यात आली.

उद्दिष्टे

  • शाळेपासून घर दूर असणे, पालकांची आर्थिक दुर्बलता अथवा अन्य सामाजिक कारणांमुळे मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थिनींना आपले शिक्षण पुढे सुरू ठेवता यावे, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
  • बहुसंख्य विद्यार्थिनींपर्यंत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पोहोचावे, हादेखील या योजनेचा हेतू आहे.

लक्ष्य गट

  • १४ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थिनी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक समुदाय तसेच दारिद्रय़रेषेखालील कुटुंबातील इयत्ता नववी आणि बारावी दरम्यानच्या वर्गातील मुलींचा गट, हा या योजनेचा लक्ष्य गट आहे.
  • कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील उत्तीर्ण विद्यार्थिनींना या वसतिगृहांमध्ये प्राधान्यक्रमाने प्रवेश दिला जाईल.

अधिक माहितीसाठी स्रोत : http://mpsp.maharashtra.gov.in/SITE/Information/fmGirlsHostel.aspx?ID=11

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 2:19 am

Web Title: girl hostel maharashtra education
Next Stories
1 सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अ‍ॅण्ड पॉवरचे अभ्यासक्रम
2 यूपीएससीची तयारी : भूगोल आणि इतर विषयांचा सहसंबंध
3 मच्छीमारांसाठी घरकुल योजना
Just Now!
X