दत्तात्रय आंबुलकर

इन्स्टिटय़ूट ऑफ ह्य़ूमन बिहेविअर अ‍ॅण्ड अप्लाइड सायन्सेस, नवी दिल्ली येथे उपलब्ध असणाऱ्या एमफिल- क्लिनिकल सायकॉलॉजीच्या २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात उपलब्ध असणाऱ्या शैक्षणिक अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

*    उपलब्ध जागांची संख्या व तपशील – अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांची संख्या १०. यापैकी ५ जागा खुल्या वर्गगटातील उमेदवारांसाठी असून १ जागा अनुसूचित जातीच्या, १ जागा अनुसूचित जमातीच्या, २ जागा इतर मागासवर्गीय तर १ जागा दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत.

*    आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्जदारांनी सायकॉलॉजी, अप्लाइड सायकॉलॉजी, काँजिटिव्ह सायकॉलॉजी, क्लिनिकल सायकॉलॉजी, काऊंसेलिंग सायकॉलॉजी अथवा हेल्थ सायकॉलॉजी यांसारख्या विषयातील एमए पदव्युत्तर पदवी कमीतकमी ५५% गुणांसह (राखीव वर्गगटातील उमेदवारांसाठी ५०%) उत्तीर्ण केलेली असावी.

*    निवड पद्धती – अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. अर्जदारांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अभ्यासक्रमासाठी अंतिम निवड करण्यात येईल.

*    प्रवेश शुल्क – अर्जासाठी भरावयाचे प्रवेश शुल्क म्हणून खुल्या वर्गगटातील उमेदवारांनी २०००/- रु. चा (राखीव वर्गगटातील उमेदवारांसाठी १००० रु.) डायरेक्टर, आयएचबीएएस यांच्या नावे असणारा व नवी दिल्ली येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.

*    शिष्यवृत्ती – अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या उमदेवारांना त्यांच्या अभ्यासक्रम कालावधीत दरमहा १२००० रु. ची शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येईल.

*    अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २६ मे ते १ जून २०१८ च्या अंकात प्रकाशित झालेली इन्स्टिटय़ूट ऑफ ह्य़ूमन बिहेविअर अ‍ॅण्ड अप्लाइड सायन्सेसची जाहिरात पहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.ihbas.delhigovt.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

*    अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख- संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज हेड ऑफ डिपार्टमेंट (क्लिनिकल सायकॉलॉजी), रूम नं. १२२, पहिला मजला, अ‍ॅकेडॅमिक ब्लॉक, इन्स्टिटय़ूट ऑफ ह्य़ूमन बिहेविअर अ‍ॅण्ड अप्लाइड सायंसेस, दिलशाद गार्डन, दिल्ली ११००९५ या पत्त्यावर

१० जुलै २०१८ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.