भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल्) मुंबई येथील रिफायनरीकरिता पुढील पदांसाठी भरती.
’ प्रोसेस टेक्निशियन (ग्रेड-७) (४० पदे) पात्रता – केमिकल इंजिनीयरिंगमध्ये प्रथम श्रेणीसह डिप्लोमा.
’ युटिलिटी ऑपरेटर (ग्रेड-७) (१५ पदे) पात्रता – मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंगमध्ये प्रथम श्रेणीसह डिप्लोमा.
’ युटिलिटी ऑपरेटर (ग्रेड-७) (बॉइलर) (५ पदे)
पात्रता – मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंगमध्ये प्रथम श्रेणीसह डिप्लोमा आणि प्रथम श्रेणीतील बॉइलर अटेंडंट प्रमाणपत्र. वरील सर्व पदांसाठी (अजा/अज/विकलांग यांना गुणांची अट ५०%)
वयोमर्यादा (दि. १ ऑक्टोबर २०१६ रोजी) १८-३० वष्रे (अजा/अज १८-३५ वष्रे, इमाव – १८ ते ३३ वष्रे).
अनुभव किमान ५ वष्रे – इष्ट अनुभव ७ वष्रे. उच्च अर्हताप्राप्त उमेदवारांनी अर्ज करू नयेत.
अर्ज कसा करावा – अर्ज ऑनलाइन पद्धतीने www.bharatpetroleum.com>careersया संकेतस्थळावर दि. १६ ऑक्टोबर २०१६ पर्यंत करावेत. कोणतेही परीक्षा शुल्क नाही.
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) इंजिनीयरिंग सíव्हसेस एक्झामिनेशन – २०१७ दि. ८ जानेवारी २०१७ रोजी घेणार आहे. सिव्हील/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या शाखांतील अभियांत्रिकी पदवीधरांची एकूण ४४० पदांसाठी भारतीय रेल्वे, सी.पी.डब्ल्यू.डी., ऑर्डनन्स फॅक्टरीज, मिलिटरी इंजिनीयरिंग सर्व्हिसेस, डिफेन्स, इंडियन नेव्ही इ. खात्यांमध्ये भरती. वयोमर्यादा – दि. १ जानेवारी २०१७ रोजी २१ ते ३० वष्रे (अजा/अज – १८ ते ३५ वष्रे, इमाव – १८ ते ३३ वष्रे). इंडियन नेव्हल आर्मामेंट सíव्हस (इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयरिंग) आणि इंडियन रेडिओ रेग्युलेटरी सर्व्हिस ग्रुप ‘ए’ या पदांसाठी वायरलेस कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/रेडिओ फिजिक्स या विषयांतील एम्.एस्सी. किंवा रेडिओ इंजिनीयरिंग पदवी उमेदवारसुद्धा पात्र आहेत.
परीक्षा शुल्क – रु. २००/- (महिला/अजा/अज यांना फी माफ)
निवड पद्धती – स्टेज-१ (पूर्व परीक्षा – वस्तुनिष्ठ स्वरूपाची) पेपर-१ (जनरल स्टडीज आणि इंजिनीयरिंग अॅप्टिट्यूड) २०० गुण, कालावधी २ तास. पेपर-२ – संबंधित विषयावर आधारित ३०० गुण, कालावधी ३ तास. स्टेज-२-कन्व्हेंशनल टाइप संबंधित विषयातील २ पेपर प्रत्येकी ३०० गुणांसाठी. कालावधी ३ तास. स्टेज-३ – मुलाखत २०० गुण.
अर्ज कसा करावा – अर्ज ऑनलाइन पद्धतीने www.upsconline.nic.in http://www.upsconline.nic.in// या संकेत स्थळावर दि. २६ ऑक्टोबर २०१६ पर्यंत करावेत.
न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीसीआय्एल्) मध्ये टेक्निकल ऑफिसर/सी/डी आणि सायंटिफिक ऑफिसर/सीच्या एकूण ४३ पदांसाठी (एचएच – २९ पदे, ओएच – १४ पदे). शारीरिक विकलांग उमेदवारांची भरती.
(१) टेक्निकल ऑफिसर/डी पात्रता – मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, केमिकल, कॉम्प्युटर सायन्स, इन्स्ट्रमेंटेशन इ. विषयांतील बी.ई. पदवी आणि ४ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव.
(२) सायंटिफिक ऑफिसर/सी पात्रता – वरील विषयांतील बी.ई. आणि एम.ई./एम.टेक. पदवीधारक.
(३) टेक्निकल ऑफिसर/सी पात्रता – वरील विषयांतील बी.ई. पदवी.
वयोमर्यादा – दि. २१ ऑक्टोबर २०१६ रोजी पद क्र. (१) साठी ४० वष्रे पद क्र. (२) आणि (३) साठी ३५ वष्रे. (अजा/अज – ५ वष्रे, इमाव – ३ वष्रे शिथिलक्षम).
अर्ज कसा करावा – अर्ज ऑनलाइन पद्धतीनेwww.npcilcareers.co.in <http://www.npcilcareers.co.in/> या संकेतस्थळावर दि. २१ ऑक्टोबर २०१६ पर्यंत करावेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 14, 2016 5:08 am