*  सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स ((CISF)) मध्ये अनुसूचित जाती/अनुसूचित जमातींच्या पुरुष उमेदवारांची कॉन्स्टेबल/ड्रायव्हर पदांवर भरती.

एकूण रिक्त पदे ४४१ (अजा – ३६४, अज – ७७).

पात्रता – दहावी उत्तीर्ण, एचएमव्ही/एलएमव्ही/ मोटरसायकलसाठीचा चालक परवाना. (ड्रायिव्हग लायसन्स)दि. १९ नोव्हेंबर २०१६ रोजी वरील गाडय़ा चालविण्याचा तीन वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा – दि. १९ नोव्हेंबर २०१६ रोजी २१ ते २७ वष्रे (अजा/अज – २१ ते ३२ वष्रे).

शारीरिक मापदंड – अजा (एससी) – उंची – १६७ सें.मी., छाती – ८०-८५ सें.मी. अज (एसटी) – उंची – १६० सें.मी., छाती – ७६ ते ८१ सें.मी.

निवड पद्धती – (अ) पात्रता तपासणी – (ब) शारीरिक क्षमता चाचणी (पीईटी) (१) ८०० मी. ३ मि. १५ से.मध्ये धावणे. (२) लांब उडी – किमान ११ फूट (तीन संधी). (३) उंच उडी – ३ फूट ६ इंच (तीन संधी) माजी सनिकांसाठी पीईटी माफ (अ) आणि (ब) चाचण्या फक्त पात्रता फेऱ्या असतील. (क) ट्रेड टेस्ट आणि लेखी परीक्षा – पात्रता तपासणी आणि पीईटीमधील पात्र उमेदवारांना खालील परीक्षा द्याव्या लागतील. (१) लेखी परीक्षा – २० गुण, (२) हलकं वाहन चालविणे – ५० गुण, (३) जड वाहन चालविणे – ५० गुण, (४) गाडी दुरुस्ती व देखभाल चाचणी – ३० गुण. (प्रत्येक परीक्षेत किमान ५०% गुण मिळविणे आवश्यक. विस्तृत जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. ८ ऑक्टोबर २०१६ च्या अंकात पाहावी.

अर्ज विहित नमुन्यात ((Appendix-A)) (जाहिरातीत दिल्याप्रमाणे) आवश्यक त्या कागदपत्रांसह (सोबत दोन ८ ७ १९ सें.मी. आकाराचे स्वत:चा पत्ता लिहिलेले लिफाफे जोडावेत. ज्यावर प्रत्येकी रु. २२/- चे पोस्टेज लावलेले असावेत.) ‘डीआयजी, सीआयएसएफ (वेस्ट झोन), सीआयएसएफ कॉम्प्लेक्स, सेक्टर ३५, खारघर, नवी मुंबई – ४१० २१०’ या पत्त्यावर दि. १९ नोव्हेंबर २०१६ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

*   भारतीय सन्यदलात (इंडियन आर्मी) पुरुष उमेदवारांची ज्युनियर कमिशण्ड ऑफिसर (रिलिजियस टीचर) JCO (RT) पदांची भरती.

(अ) पंडित (५९ जागा) – पात्रता – संस्कृत/हिंदी यांपकी एका मुख्य विषयासह बी.ए. पदवी उत्तीर्ण किंवा संस्कृतमधील मध्यमा किंवा हिंदीमधील भूषण किंवा तत्सम पदवी प्रादेशिक भाषेतील.

(ब) ग्रंथी (६ जागा) – पात्रता – पंजाबी मुख्य विषयासह पदवी किंवा पंजाबी भाषेतील विद्वान पदवी. (वयोमर्यादा – दि १ ऑक्टोबर २०१७ रोजी २७ ते ३४ वष्रे). उंची – १६० सें.मी. छाती – ७७ सें.मी., वजन – ५० किलो.

शारीरिक क्षमता – उमेदवारांना १,६०० मी. अंतर ८ मि. धावता येणे आवश्यक.

निवड पद्धती – (१) पात्र उमेदवारांना मूळ प्रमाणपत्र तपासणीसाठी आणि वैद्यकीय तपासणीसाठी रिक्रूटमेंट झोन कार्यालयात हजर राहावे लागेल. (अ‍ॅडमिट कार्ड पाठविले जाईल.)

(२) लेखी परीक्षा – दि. २६ फेब्रुवारी २०१७ रोजी – (अ) पेपर-क – १०० गुण फक्त पात्रता फेरी.

(ब) पेपर-कक – १०० गुण धार्मिक विषयांवर आधारित. वेतन – रु. ३५,४००/- अधिक इतर भत्ते.

अर्ज कसा करावा – पंडित व ग्रंथी पदांसाठी अर्ज http://www.joinindianarmy.nic.in  या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने दि. ८ नोव्हेंबर २०१६ पर्यंत करावेत.

* अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (AICTE) कॉमन मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन टेस्ट (CMAT)

ही राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) दरवर्षी भारत सरकारच्या एचआरडी मंत्रालयाच्या आदेशानुसार घेत असते. CMAT चा स्कोअर सर्व AICTE  मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठे अंतर्गत येणाऱ्या कॉलेजेसमधील ‘एमबीए’च्या प्रवेशासाठी ग्राह्य़ धरला जातो. CMAT-2017

दि. २८ जानेवारी २०१७ रोजी

पात्रता – पदवी (कोणत्याही शाखेची) उत्तीर्ण (पदवीच्या अंतिम वर्षांत शिकणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात. ज्यांचा रिझल्ट २०१७-१८ च्या प्रवेश प्रक्रियेपूर्वी लागेल.) ऑनलाइन पद्धतीने अर्ज http://www.aicte-cmat.in या संकेतस्थळावर

दि. १० डिसेंबर २०१६ पर्यंत करावेत.