सैनिक स्कूल, बेळगाव येथे स्टेनोग्राफर म्हणून संधी –

उमेदवार बारावी उत्तीर्ण असावेत. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम व लघुलेखनाची ८० शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी-हिंदी ट्रान्सक्रिप्शनची ६५ शब्द संगणकीय पात्रता धारक असावेत. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २२ ते २८ ऑक्टोबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली कमांडर, हेडक्वार्टर्स ज्युनिअर लिडर्स विंग, दि इन्फ्रंट्री स्कूलची जाहिरात पाहावी.

विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज कमांडर, इन्फ्रन्ट्री स्कूल, बेळगाव- ५९०००९ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०१६.

आर्मी वॉर कॉलेज, महू येथे कनिष्ठ कारकुनांच्या ७ जागा –

उमेदवार बारावी उत्तीर्ण व संगणकीय पद्धतीने इंग्रजीची ३५ शब्द प्रतिमिनिट तर हिंदीची ३० शब्द टंकलेखन पात्रता पूर्ण केलेले आणि शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाच्या नमुन्यासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ८ ते १४ ऑक्टोबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली वॉर कॉलेज, महूची जाहिरात पाहावी.

विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज प्रिसायडिंग ऑफिसर, सिव्हिलियन डायरेक्ट रिक्रुटमेंट (स्क्रुटिनी ऑफ अ‍ॅप्लिकेशन्स) बोर्ड, फॅकल्टी ऑफ स्टडीज, आर्मी वॉर कॉलेज, महू (जि. इंदोर), मध्य प्रदेश- ४५३४४१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०१६.

संरक्षणदलात बरॅक अ‍ॅण्ड स्टोअर्स ऑफिसर्सच्या ८१ जागा-

उमेदवार पदवीधर इंजिनीअर असावे व  त्यांना संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव असावा. अधिक माहितीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २४ ते ३० ऑक्टोबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण दलाची जाहिरात पाहावी.

संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर जनरल (पर्सोनेल), मिनिस्ट्री इंजिनीअरिंग सव्‍‌र्हिसेस, इंजिनीअर इन चीफ ब्रँच, इंटिग्रेटेड हेडक्वार्टर्स, काश्मीर हाऊस, नवी दिल्ली ११००११ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २३ नोव्हेंबर २०१६.

 

राष्ट्रीय आवास बँक (रिझर्व बँक ऑफ इंडियाची संपूर्ण मालकी) ‘असिस्टंट मॅनेजर’ (जेएमजी स्केल-१) (एएम) (एकुण १४ जागा. खुला – ७, इमाव – ४, अजा – २, अज – १).

पात्रता – एएम (जनरल स्ट्रीम) – कोणत्याही शाखेतील पदवी किमान ६०% गुण (अजा/अज – ५०%) किंवा पदव्युत्तर पदवी किमान ५५% गुण किंवा सीए/एमबीए इ. ५५% गुण (अजा/अज – ५०%)  एएम-लॉ – कायदा विषयातील पदवी किमान ६०% गुण किंवा पदव्युत्तर पदवी किमान ५०%

वयोमर्यादा – दि. १ ऑक्टोबर २०१६ रोजी जन्म २ ऑक्टोबर १९८८ आणि १ ऑक्टोबर १९९५ दरम्यानचा असावा. (उच्चतम वयोमर्यादा शिथिलक्षम – इमाव – ३ वष्रे, अजा/अज – ५ वष्रे). ऑनलाईन अर्ज www.nhb.org.in वर दि. २० नोव्हेंबर २०१६पर्यंत करावेत.

केंद्र सरकारच्या कंझ्युमर्स अफेअर्स, फूड व पब्लिक डिस्ट्रिब्युशन विभागात पुण्यासह विभिन्न ठिकाणी डेप्युटी डायरेक्टर (स्टोअरेज अ‍ॅण्ड रिसर्च) च्या ११ जागा-

उमेदवारांनी अँटॉमॉलिजी, प्लँट पॅयॉलॉजी, बायोलॉजी, बायो केमिस्ट्री, कृषी यासारख्या विषयांतील पदव्युत्तर पात्रता पूर्ण केलेली असावी व त्यांना संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव असायला हवा. अर्जाच्या नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज अंडर सेक्रेटरी, मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर अफेअर्स फूड अ‍ॅण्ड पब्लिक डिस्ट्रिब्युशन, डिपार्टमेंट ऑफ फूड अ‍ॅण्ड पब्लिक डिस्ट्रिब्युशन, कृषी भवन, नवी दिल्ली या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २३ नोव्हेंबर २०१६.