13 December 2017

News Flash

नोकरीची संधी

लेखी परीक्षा पार्ट-१ एकूण १०० गुणांसाठी मुलाखत - २०० गुण.

सुहास पाटील | Updated: February 22, 2017 2:48 PM

इंडियन इकॉनॉमिक सíव्हस/इंडियन स्टॅटिस्टिकल सíव्हस परीक्षा २०१७ केंद्रीय लोकसेवा आयोग दि. १२ मे २०१७ पासून घेणार आहे.

इंडियन इकॉनॉमिक सíव्हस (१५ पदे) पात्रता – इकॉनॉमिक्स/अप्लाइड इकॉनॉमिक्स/बिझनेस इकॉनॉमिक्स/इकॉनॉमेट्रिकमधील पदव्युत्तर पदवी.

इंडियन स्टॅटिस्टिकल सíव्हस (२९ पदे) पात्रता – स्टॅटिस्टिकल/ मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स/अप्लाइड स्टॅटिस्टिक्स विषयांसह पदवी  फी – रु. २००/- (महिला/अजा/अज/विकलांग यांना फी माफ)

वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०१७ रोजी २१ ते ३० वष्रे (अजा/अज २१ ते ३५ वष्रे, इमाव – २१ ते ३३ वष्रे)

निवड पद्धती – लेखी परीक्षा पार्ट-१ एकूण १०० गुणांसाठी मुलाखत – २०० गुण. ऑनलाइन अर्ज www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि. ३ मार्च २०१७ पर्यंत करावेत. आपल्या पसंतीचे परीक्षा केंद्र हवे असल्यास लवकरात लवकर अर्ज करावेत.

 

कंबाइंड जीओ सायंटिस्ट आणि जीओलॉजिस्ट परीक्षा २०१७ केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) दि. १२ मे २०१७ रोजी घेणार आहे. या परीक्षेतून पुढील पदांची भरती होणार.

(१) जिऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया; खाण मंत्रालय

(a) जिऑलॉजिस्ट ग्रुप-ए

– ४० पदे

(b) जिऑफिजिसिस्ट ग्रुप-

ए – ४० पदे (१ पद अंशत: अंधांसाठी राखीव)

(c) केमिस्ट ग्रुप-ए – २५ पदे

(२ पदे एचएचसाठी राखीव)

(२) सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड, मिनिस्ट्री

ऑफ वॉटर रिसोस्रेस

(a) ज्युनियर हायड्रोलॉजिस्ट (सायंटिस्ट बी)

ग्रुप-ए – ३३ पदे. (प्रत्येकी एक पद एचएच आणि चलनवलन अपंग यांसाठी राखीव.)

पात्रता –

जिओलॉजिस्ट/ ज्युनियर हायड्रोलॉजिस्ट – जिऑलॉजी/अप्लाइड जिऑलॉजी/मरिन जिऑलॉजी, इ.मधील पदव्युत्तर पदवी/पदविका (समान पात्रता असलेले उमेदवार दोन्ही पदांसाठी अर्ज करू शकतात.)  जिओफिजिसिस्ट – फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स/जिओफिजिक्स, इ.मधील पदव्युत्तर पदवी/पदविका

केमिस्ट – केमिस्ट्री /अप्लाइड केमिस्ट्री /अ‍ॅनालिटिकल केमिस्ट्रीमधील पदव्युत्तर पदवी.

वयोमर्यादा –

जिओलॉजिस्ट/जिओफिजिसिस्ट/ केमिस्टसाठी २१ ते ३२ वष्रे. (उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९८५ ते १ जानेवारी १९९६ दरम्यानचा असावा.)

हायड्रो जिओलॉजिस्टसाठी २१ ते ३५वष्रे (उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९८२ ते १ जानेवारी १९९६दरम्यानचा असावा.) कमाल वयोमर्यादा अजा/अजसाठी ५ वर्षांनी; इमाव – ३ वर्षांनी, विकलांग १० वर्षांनी शिथिलक्षम.

फी – रु. २००/- महिला/अजा/अज/विकलांग यांना फी माफ. ऑनलाइन अर्ज www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि. ३ मार्च २०१७ पर्यंत करावेत.

 

पदवीधर उमेदवारांना स्टेट बँकेत उच्च पदावर पोहोचण्यासाठी संधी.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसरच्या एकूण २,३१३ पदांची भरती. (अजा – ३४७,

अज – ३५०, इमाव – ६०६, जन – १०१०) (ओएच- २५, व्हीआय – २५, एचआय- ४०, एकूण ९०  जागा विकलांगांसाठी राखीव)

पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी. (अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.)

वयोमर्यादा – दि. १ एप्रिल २०१७ रोजी २१ ते ३० वष्रे. (इमाव – २१ ते ३३ वष्रे, अजा/अज –

२१ ते ३५ वष्रे)

परीक्षा शुल्क – रु. ६००/- (अजा/अज/विकलांग – रु. १००/-)

परीक्षापूर्व प्रशिक्षण – बँक अजा/अज/अल्पसंख्याक उमेदवारांसाठी परीक्षापूर्व प्रशिक्षण मुंबई/नागपूर/गोवा/पुणे, इ. केंद्रांवर आयोजित करणार आहे. प्रोबेशनरी ऑफिसरच्या निवड परीक्षेसाठी जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांना एकूण ४ संधी आणि इमाव अपंग/जनरल (अपंग) यांना एकूण ७ संधी उपलब्ध आहेत.

निवड पद्धती – फेज-१ पूर्वपरीक्षा – १०० गुणांसाठी कालावधी १ तास. (इंग्रजी भाषा – ३० गुण, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड आणि रिझिनग एबिलिटी प्रत्येकी ३५ गुण)

फेज-२ मुख्य परीक्षा – २०० गुण  कालावधी ३ तास. (ऑब्जेक्टिव्ह टाइप)

(बी) वर्णनात्मक परीक्षा – ५०गुण. कालावधी ३ तास.

फेज- ३ ग्रुप एक्सरसाइज (२० गुण), मुलाखत (३० गुण)

अंतिम निवड फेज-२ आणि फेज-३ च्या गुणवत्तेनुसार.

वेतन – सीटीसी प्रतिवर्ष रु. ७.९३ लाख ते १२.९५ लाख (नियुक्तीच्या ठिकाणानुसार). ऑनलाइन अर्ज www.sbi.co.in/careers किंवा www.statebankofindia.com/careers या संकेतस्थळावर

दि. ३ मार्च २०१७ पर्यंत करावेत.

First Published on February 17, 2017 12:30 am

Web Title: job opportunities 68