16 December 2017

News Flash

नोकरीची संधी

फिटर आणि मशिनिस्ट ट्रेडसाठी प्रशिक्षणाची मुदत २ वष्रे आ

सुहास पाटील | Updated: August 12, 2017 1:26 AM

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लार्सन अँड टुब्रो कंपनी’, मुंबईमध्ये अ‍ॅप्रेंटिसशिपसाठी प्रवेश.

अ‍ॅप्रेंटिसेस अ‍ॅक्ट १९६१अंतर्गत एल अँड टीच्या पवई कँपससाठी (१) फिटर (PWP/01) , (२) मशिनिस्ट (PWP/05) आणि (३) वेल्डर (PWP/02) ट्रेडसाठी प्रवेश.

फिटर आणि मशिनिस्ट ट्रेडसाठी प्रशिक्षणाची मुदत २ वष्रे आहे आणि वेल्डर ट्रेडसाठी प्रशिक्षणाची मुदत १ वर्ष ३ महिने आहे.

पात्रता – १०वी प्रथम प्रयत्नात किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण आणि गणित व विज्ञान विषयात ५५%  गुण आवश्यक. मार्च, २०१७ मध्ये १०वी उत्तीर्ण झालेल्यांना प्राधान्य दिले जाईल. मार्च, २०१६ व मार्च, २०१५मध्ये १०वी उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

वयोमर्यादा – दि. १ सप्टेंबर २०१७ रोजी १५ ते १८ वष्रे. दि. १ सप्टेंबर १९९९ ते १ सप्टेंबर २००२ दरम्यानचा जन्म असावा. (अजा/अज/भजच्या उमेदवारांसाठी २० वष्रे)

किमान शारीरिक पात्रता – उंची – १५५ सें.मी., वजन – ४३ कि.ग्रॅ. प्रशिक्षणादरम्यान मासिक विद्यावेतन पहिल्या वर्षी रु. ६,९३०/-, दुसऱ्या वर्षी रु. ७,९२१/-.

https://ecom.lthed.com/portal/tradeapprenticeformsystem/ या िलकवर अर्जाचा नमुना उपलब्ध आहे. एकाहून अधिक ट्रेडसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविले जातील. अर्जासोबत प्रमाणपत्र किंवा इतर प्रती जोडू नयेत. पात्र उमेदवारांना लेखी चाचणीसाठी उपस्थित रहावे लागेल. त्यानंतर यशस्वी उमेदवारांची मुलाखतीच्या आधारे निवड करण्यात येईल. विहित नमुन्यातील अर्ज ‘पीडब्ल्यूपी, लार्सन अँड टुब्रो, पवई कँपस, पोस्ट बॉक्स क्र. ८९०१, मुंबई – ४०००७२’ या पत्त्यावर दि. १९ ऑगस्ट २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. अर्जाच्या लिफाफ्यावर संदर्भ क्रमांक आणि कोणत्या ट्रेडसाठी अर्ज केला आहे ते स्पष्ट नमूद करावे.

महाराष्ट्र विधान मंडळ, सचिवालयामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह (ज्युनियर) प्रतिवेदक (कनिष्ठ)च्या एकूण १२ पदांची भरती.

(अजा – १, अज – २, विजा (अ) – २, भज (क) – १, भज (ड) – १, विमाप्र – १, इमाव – ४).

वेतन संरचना – पीबी- ३ (रु. १५,६००/- ३९,१००/-  ग्रेड पे रु. ५,४००/-) अधिक इतर भत्ते.

पात्रता – पदवी उत्तीर्ण १२० श.प्र.मि. इतक्या वेगाचे मराठी लघुलेखनाचे व किमान ४० श.प्र.मि. गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र (प्रत्यक्षात १४० श.प्र.मि. वेगाने ५ मिनिटांची डिक्टेशन (श्रुतलेखन) चाचणी परीक्षा द्यावी लागेल.

कालावधी – २ तास.

वयोमर्यादा – १ ऑगस्ट २०१७ रोजी १८ ते ४३ वष्रे. अर्जाचा नमुना ँ३३स्र्://े’२.१ॠ.्रल्ल/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

विहित नमुन्यातील अर्ज ‘उपसचिव (आस्थापना), महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, विधान भवन, बॅकबे रेक्लेमेशन, मुंबई – ४०० ०३२’ या पत्त्यावर रजिस्टर्ड पोस्टाने/स्पीड पोस्टाने दि. १ सप्टेंबर २०१७ पर्यंत प्राप्त होतील असे पाठवावेत.

अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, लघुलेखन व टंकलेखन, जात व वयासंबंधीच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित सत्यप्रती जोडणे आवश्यक.

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं. लि., चेन्नई यांच्या संपूर्ण देशभरातील (जम्मू-काश्मीर वगळता) आपल्या कार्यालयांसाठी असिस्टंटच्या एकूण ६९६ पदांची भरती.

पात्रता – दि. ३० जून, २०१७ रोजी पदवी उत्तीर्ण राज्याची प्रादेशिक भाषा बोलता, वाचता आणि लिहिता येणे आवश्यक.

वयोमर्यादा – दि. ३० जून २०१७ रोजी

१८ ते २८ वष्रे (अजा/अज – ३३ वष्रे, इमाव – ३१ वष्रे).

वेतन – रु. २३,०००/- दरमहा.

प्राथमिक परीक्षा दि. २२ सप्टेंबर २०१७ आणि मुख्य परीक्षा २३ ऑक्टोबर २०१७ रोजी होणार.

ऑनलाइन अर्ज  www.uiic.co.in या संकेतस्थळावर दि. १४ ऑगस्ट २०१७ ते २८ ऑगस्ट २०१७ पर्यंत करावेत.

First Published on August 12, 2017 1:26 am

Web Title: job opportunities 84