17 January 2019

News Flash

नोकरीची संधी

ओसीईएस टीएसओज आणि डीजीएफएस फेलोज यांना दरमहा रु. ३५,०००/- स्टायपेंड दिले जाईल.

डीएईमध्ये सायंटिफिक ऑफिसर पदांची भरती.

भारत सरकार, डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी (डीएई)मध्ये भाभा अ‍ॅटॉमिक रिसर्च सेंटर ट्रेनिंग स्कूल्समार्फत वर्ष २०१८-१९ साठी इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्स आणि सायन्स पोस्ट ग्रॅज्युएट्सची ‘सायंटिफिक ऑफिसर’ पदांची भरती (OCES/DGFS- 2018)

इंजिनीअरिंग डिसिप्लीनसाठी

पात्रता – मेकॅनिकल, केमिकल, मेटॅलर्जिकल, मटेरियल्स, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रमेंटेशन, कॉम्प्युटर, न्यूक्लियर इंजिनीअरिंगमधील बीई किंवा बीटेक.

सायन्स स्ट्रीमसाठी पात्रता – फिजिक्स, अ‍ॅप्लाईड फिजिक्स, केमिस्ट्री, बायोसायन्सेस, जीओफिजिक्स, अ‍ॅप्लाईड जीओफिजिक्स, जीऑलॉजी, अ‍ॅप्लाईड जीऑलॉजीमधील एमएस्सी किंवा बीएस्सी (टेक) (फूड टेक्नॉलॉजी) पात्रता परीक्षेत किमान ६०% गुण आवश्यक.

ट्रेनिंग स्कीम्स – ओरिएंटेशन कोर्स फॉर इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्स अ‍ॅण्ड सायन्स पोस्ट ग्रॅज्युएट्स (ओसीईएस)

कालावधी – एक वर्ष.

ट्रेनी सायंटिफिक ऑफिसर (टीएसओ) जे किमान ५०%  गुणांसह ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण करतील त्यांना डीएईअंतर्गत कार्य करणाऱ्या १२ युनिट्समध्ये सायंटिफिक ऑफिसर (ग्रुप- ए) म्हणून नेमले जाईल. ट्रेनिंगदरम्यान किमान पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना एमटेक/ एमफिल कोर्ससाठी होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट (एचबीएनआय) (जी एक डिम्ड युनिव्हर्सटिी आहे.) प्रवेश दिला जाईल. उत्कृष्ट कामगिरी असणारे उमेदवार पीएचडीसाठी एचबीएनआयमध्ये प्रवेश घेऊ शकतात.

दोन वर्षांसाठी डीएई ग्रॅज्युएट फेलोशिप स्कीम – इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्स आणि फिजिक्स पोस्ट ग्रॅज्युएट्स जे बीएआरसी ट्रेनिंग स्कूलच्या मुलाखतीत चांगली कामगिरी करणारे आणि आयआयटी/ एनआयटीत एमटेक/ एमकेम इंजिनीअरिंगला प्रवेश घेतलेले यांच्यासाठी. ओसीईएस टीएसओज आणि डीजीएफएस फेलोज यांना दरमहा रु. ३५,०००/- स्टायपेंड दिले जाईल.

ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ‘सायंटिफिक ऑफिसर सी’ या पदावर लेव्हल- १० – रु. ५६,१००/- (सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पे मॅट्रिक्स) सुरुवातीचे वेतन दरमहा रु. ८४,०००/-  इतर भत्ते.

निवड पद्धती – ओसीईएससाठी ऑनलाइन एक्झामिनेशन घेतली जाईल. ही मार्च/एप्रिल २०१८ मध्ये इंजिनीअरिंगच्या ९ डिसिप्लीनसाठी आणि सायन्सच्या ५ डिसिप्लीनसाठी घेतली जाईल. यातील गुणवत्तेनुसार आणि जीएटीई स्कोअर (गेट २०१७ किंवा गेट २०१८) वरून उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड मुलाखतीसाठी केली जाईल.

मुलाखतीतील कामगिरीवर आधारित अंतिम निवड. मुलाखत मुंबई (सर्व डिसिप्लीनसाठी) आणि हैदराबाद (फक्त जीऑलॉजी आणि अप्लाईड जीऑलॉजीसाठी) होईल.

अर्जाचे शुल्क – रु. ५००/-. फक्त जनरल आणि इमावच्या पुरुष उमेदवारांसाठी.

(महिला, अजा/अज यांना फी माफ आहे.)

ऑनलाइन अर्ज http://www.barconlineexam.in या संकेतस्थळावर दि. ४ फेब्रुवारी २०१८ पर्यंत करावेत. गेट- २०१८ स्कोअर अपलोड करण्याची अंतिम तारीख २ एप्रिल २०१८.

suhassitaram@yahoo.com

First Published on February 3, 2018 2:02 am

Web Title: job opportunities 88