स्टेट बँक ऑफ इंडिया – २,००० प्रोबेशनरी ऑफिसर्सपदांची भरती.

(अजा – ३००, अज – १५०, इमाव – ५४०, खुला – १,०१०) (११८ जागा विकलांगांसाठी राखीव, एलडी – २७, व्हीआय – २६,

एचआय- ६५)

पात्रता – पदवी उत्तीर्ण (अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र)

वयोमर्यादा – दि. १ एप्रिल २०१८ रोजी

२१ ते ३० वष्रे (इमाव – ३३ वष्रे, अजा/अज – ३५ वष्रे, विकलांग – ४०/४३/४५ वष्रेपर्यंत)

अर्जाचे शुल्क – रु. ६००/- (अजा/ अज/विकलांग यांना रु. १००/-)

निवड पद्धती – प्रिलिमिनरी एक्झाम

(दि. १, ७, ८ जुल २०१८ रोजी) – इंग्लिश लँग्वेज -३० गुण, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड – ३५ गुण, रिझिनग अ‍ॅबिलिटी – ३५ गुण.

वेळ प्रत्येक सेक्शनसाठी २० मिनिटे.

परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल. प्रिलियम परीक्षेतून शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी शॉर्ट लिस्ट केले जाईल.

मुख्य परीक्षा (दि. ४ ऑगस्ट २०१८ रोजी) –  २०० गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची. कालावधी ३ तास.

रिझिनग अँड कॉम्प्युटर अ‍ॅप्टिटय़ूड – ४५ प्रश्न, ६० मिनिटे.

डेटा अ‍ॅनालिसिस अँड इंटरप्रिटेशन – ३५ प्रश्न, ४५ मिनिटे.

जनरल/इकॉनॉमी/बँकिंग अवेअरनेस – ४० प्रश्न, ३५ मिनिटे.

इंग्लिश लँग्वेज – ३५ प्रश्न, ४० मिनिटे.

(ब) वर्णनात्मक परीक्षा – ५० गुणांसाठी ३० मिनिटे कालावधी. इंग्लिश लँग्वेज (निबंध व पत्रलेखन).

(क) ग्रुप डिस्कशन (२० गुण) व मुलाखत (३० गुण) (दि. २४ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०१८ दरम्यान)

अंतिम निवड – मुख्य परीक्षा, ग्रुप डिस्कशन व मुलाखत यांतील कामगिरीवर आधारित असेल.

वेतन – सीटीसी दरवर्षी रु. ८.२० लाख ते १३.०८ लाख (पोस्टिंगचे स्थानानुसार)

ट्रेनिंग – निवडलेल्या उमेदवारांना कामावर रुजू होण्यापूर्वी ऑनलाईन ट्रेनिंग कोर्स पूर्ण करावी लागेल. त्यानंतर त्यांना प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून २ वष्रे प्रोबेशन कालावधी असेल. खुल्या गटातील उमेदवार एकूण ४ वेळा मुख्य परीक्षा देऊ शकतात. खुलागट (विकलांग), इमाव आणि इमाव (विकलांग) एकूण ७ प्रयत्नांत मुख्य परीक्षा देवू शकतात. अजा/अजा विकलांग/अज/अज विकलांग – कितीही वेळा परीक्षा देऊ शकतात.

परीक्षा पूर्व प्रशिक्षण (दि. १८ जून ते २३ जून २०१८ दरम्यान) – अजा/अज/अल्पसंख्याक उमेदवारांसाठी मुंबई, पुणे, नागपूर, गोवा इ. केंद्रांवर परीक्षा पूर्व प्रशिक्षण स्व-खर्चाने दिले जाईल. याकरिता अर्ज करताना तसे नमूद करावे लागेल.

रजिस्ट्रेशन व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी  https://www.sbi.co.in/careers किंवा https://bank.sbi.careers या संकेतस्थळावर दि. १३ मे २०१८ पर्यंत करू शकतात.

इंडियन आर्मीमध्ये इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी’ (आयएमए) डेहराडून येथे जानेवारी, २०१९ पासून सुरू होणाऱ्या १२८ व्या टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (टीजीसी-१२८)अविवाहित पुरुष इंजिनीअर्सना प्रवेश.

पात्रता – सिव्हील/आíकटेक्चर/ मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/आयटी/मेटॅलर्जकिल इत्यादी विषयांतील अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण. (पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.)

एकूण जागा – ४० (सिव्हील – १०, मेकॅनिकल – ४, इलेक्ट्रिकल – ५, कॉम्प्युटर सायन्स/आयटी – ६, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन – ७ इत्यादी)

ट्रेनिंग – कालावधी १ वर्ष. ट्रेनिंगदरम्यान उमेदवारांना शॉर्ट सíव्हस कमिशनवर लेफ्टनंट पदावर तनात केले जाईल. स्टायपेंड

रु. ५६,१००/- दरमहा दिले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर उमेदवारांना पर्मनंट कमिशनवर लेफ्टनंट पदावर पे मॅट्रिक्स लेव्हल-१० वर तनात केले जाईल.

दरमहा वेतन रु. ८०,०००/-

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९२ ते १ जानेवारी १९९९ दरम्यानचा असावा.

उंची – किमान १५७.५ सें.मी.

निवड पद्धती – पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवार एसएसबीसाठी शॉर्ट लिस्ट केले जातील. ज्यांना अलाहाबाद (यूपी), भोपाळ (एम्पी), बंगळुरु (कर्नाटक) आणि कापूरथळा (पंजाब) यापकी एका सिलेक्शन सेंटरवर एसएसबीसाठी बोलाविले जाईल. यशस्वी उमेदवारांना वैद्यकीय तपासणी द्यावी लागेल.

ऑनलाईन अर्ज www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर ऑफिसर्स एन्ट्री/लॉगइन रजिस्ट्रेशनवर क्लिक करून दि. १६ मे २०१८ पर्यंत करावेत.

suhassitaram@yahoo.com