आयआयटी मुंबईमध्ये ज्यु. अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट (५ पदे) आणि अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह सुपिरटेंडंट (७ पदे) या पदांची भरती.

३ वर्षांच्या करार पूर्ततेनंतर उमेदवारांना नियमित सेवेत रु. २,४००/- ग्रेड पेमध्ये सामावून घेतले जाईल.

पात्रता – पदवी. सुपरिटेंडंट पदासाठी पदव्युत्तर पदवीधरांसाठी २ वष्रे कामाचा अनुभव आणि पदवीधरांसाठी ४ वष्रे कामाचा अनुभव आवश्यक. वयोमर्यादा – २७ वष्रे.

ऑनलाइन अर्ज http://www.iitb.ac.in/en/careers/staff-recruitment या संकेतस्थळावर दि. ५ जून २०१७ पर्यंत करावेत.

साहाय्यक कक्ष अधिकारी (१०७ पदे), विक्रीकर निरीक्षक (२५१पदे), पोलीस उप निरीक्षक (६५०पदे) या एकूण १००८ पदांच्या भरती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त पूर्वपरीक्षा दि. २६ जुल २०१७ रोजी घेणार, यातून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची स्वतंत्र मुख्य परीक्षा होणार.

साहाय्यक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा – २०१७ दि. १० डिसेंबर २०१७; विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा दि. ७ जानेवारी २०१८; पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा ५ नोव्हेंबर २०१७.

पात्रता – पदवी (पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार संयुक्त पूर्वपरीक्षेस पात्र असतील.)

वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०१७ रोजी साहाय्यक कक्ष अधिकारी आणि विक्रीकर निरीक्षक पदांसाठी ३८वष्रे (मागासवर्गीय – ४३ वष्रे.)

पोलीस उपनिरीक्षक – १९ ते ३१ वष्रे (मागासवर्गीय – ३४ वष्रे.)

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी उंची (पु.) – १६५ सें.मी., महिला – १५७ सें.मी.; छाती (पु.) – ७९-८४ सें.मी. परीक्षेचे टप्पे – (१) संयुक्त पूर्वपरीक्षा १०० गुण, (२) स्वतंत्र मुख्य परीक्षा – २०० गुण.

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी (३) शारीरिक चाचणी (१००गुण) व मुलाखत (५० गुण).

शुल्क – रु. ३७३/- (मागासवर्गीय रु. २७३/-). ऑनलाइन अर्ज  https:\\mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दि. १६ मे २०१७ पर्यंत करावेत.