स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) इंडिया मेटीओरॉलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये सायंटिफिक असिस्टंटएकूण १,१०२ पदांच्या भरतीसाठी 

परीक्षा – २०१७.

satej patil
“बारक्यांनी नादाला लागू नका, कोणाला कधी चितपट करायचं…”, सतेज पाटलांचा महायुतीला इशारा; म्हणाले, “या चौकात काठी घेऊन…”
sadabhau khot loksatta news, sadabhau khot latest marathi news
“मंत्रिपद गेलं, गाड्या गेल्या, उरलो एकटाच!”, सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली सत्तांतराची खंत
Important decision of the supreme court
उमेदवारांनी संपत्ती म्हणून घड्याळही जाहीर करावं का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल; मालमत्ता प्रकरणी दिला महत्त्वपूर्ण निकाल
Sainik School Satara Bharti 2024
Sainik School Satara Bharti : सैनिक स्कूल सातारामध्ये नोकरीची संधी, महिन्याला मिळेल ३८ हजार रुपयांपर्यंत पगार

पात्रता – दि. ४ ऑगस्ट २०१७ रोजी विज्ञान शाखेतील पदवी (एक विषय फिजिक्स असावा)/कॉम्प्युटर सायन्स/आयटी/कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमधील इंजिनीअरिंग पदविका. पात्रता – परीक्षेत किमान ६०% गुण किंवा ६.७५ सीजीपीए स्कोअर १० पॉइंट स्केलवर असावा. उमेदवार फिजिक्स आणि गणित विषयांसह १२वी उत्तीर्ण असावा. (ही अट इंजिनीअरिंग पदविका धारकांसाठी लागू आहे.) कमाल वयोमर्यादा – दि. ४ ऑगस्ट २०१७ रोजी ३० वष्रे (इमाव – ३३ वष्रे, अजा/ अज – ३५ वष्रे) (विकलांग पीएच् – ४० वष्रे, पीएच  इमाव – ४३ वष्रे, पीएच अजा/अज – ४५ वष्रे) (केंद्र सरकारी कर्मचारी किमान ३ वर्षांची सेवा पूर्ण केलेले खुला – ३५ वष्रे, इमाव – ३८ वष्रे, अजा/अज – ४० वष्रे).

परीक्षा शुल्क – रु. १००/- (महिला/अजा/अज/पीएच यांना फी माफ. फी एसबीआय चलान अथवा एसबीआय नेट बँकिंगने भरावी.)

परीक्षा केंद्र – अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, पणजी इ.

निवड पद्धती – २०० गुणांची कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा

– पार्ट-१ (१) जनरल इंटेलिजन्स अ‍ॅण्ड रिझिनग,

(२) क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड,

(३) इंग्लिश लँग्वेज अ‍ॅण्ड कॉम्प्रिहेन्शन,

(४) जनरल अवेअरनेस. प्रत्येकी २५ गुण एकूण १०० गुण. पार्ट-२ – फिजिक्स, कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग – १०० गुण. एकूण कालावधी – १२० मिनिटे.

उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक भरावा. कारण फक्त एकच अर्ज करावयाचा आहे. एकाच उमेदवाराचे एकापेक्षा अधिक रजिस्ट्रेशन्स आढळल्यास उमेदवार बाद ठरविला जाईल.

ऑनलाइन अर्ज http://ssconline.nic.in/ या संकेतस्थळावर दि. ४ ऑगस्ट २०१७ रोजी १७.०० वाजेपर्यंत करावेत. (एसबीआय चलानामार्फत फी भरणाऱ्यांनी जर चलान ४ ऑगस्ट २०१७पर्यंत जनरेट केले असेल तर फी ८ ऑगस्ट २०१७ पर्यंत भरता येईल.)

कॉर्पोरेशन बँक (जाहिरात क्र. १/२०१७) मुख्यालय – मँगलोर (कर्नाटक) मॅनेजर लॉच्या एकूण २० पदांची भरती (खुला – १०, इमाव – ५, अजा – ३, अज – १) (विकलांग ओसी १ पद राखीव).

पात्रता – दि. ३१ मे २०१७ रोजी कायदा विषयातील पदवी ३ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा – २१ ते ३५ वष्रे (इमाव – ३८ वष्रे, अजा/अज – ४० वष्रे, विकलांग – ४५ वष्रे).

अर्जाचे शुल्क – रु. ६००/- (रु. १००/- अजा/अज/विकलांग(ओसी)).

ऑनलाइन अर्ज www.corpbank.com या संकेतस्थळावर दि. ५ ऑगस्ट २०१७ पर्यंत करावेत.

संघ लोकसेवा आयोग (यूपीएस्सी) (जाहिरात क्र. १४/२०१७) डायरेक्टोरेट ऑफ मार्केटिंग अँड इन्स्पेक्शन, डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅग्रिकल्चर, को-ऑपरेशन अँड फार्मर वेल्फेअर, मिनिस्ट्री ऑफ अ‍ॅग्रिकल्चर अँड फार्मर्स वेल्फेअरमध्ये मार्केटिंग ऑफिसर (ग्रुप-१)च्या एकूण २७ पदांची भरती (यूआर-१८, इमाव – ४, अजा – ३, अज – ३).

पात्रता –  अ‍ॅग्रिकल्चर किंवा बॉटनी किंवा इकॉनॉमिक्स किंवा इकॉनॉमिक्स विषयासह कॉमर्स इ. मधील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण. अ‍ॅग्रिकल्चर मार्केटिंगमधील २ वर्षांचा अनुभव किंवा मार्केटिंग मॅनेजमेंटमधील पदविका. अनुभवाच्या अटीविषयी यूपीएससी शिथिलतेचा विचार करू शकते.

वयोमर्यादा – ३० वष्रेपर्यंत.

परीक्षा शुल्क – रु. २५/- (अजा/अज/विकलांग/महिला यांना फी माफ).

ऑनलाइन अर्ज http://www.upsconline.nic.in/ वर दि. ११ ऑगस्ट २०१७(२३.५९वाजेपर्यंत) करावेत.