23 November 2017

News Flash

नोकरीची संधी

इकॉनॉमिक रिसर्च/इन्व्हेस्टिगेशन कामाचा २ वर्षांचा अनुभव.

सुहास पाटील | Updated: September 9, 2017 1:54 AM

डेव्हलपमेंट मॉनिटिरग अँड इव्हॅल्युएशन ऑफिस, निती आयोग, भारत सरकार – दहा इकॉनॉमिक ऑफिसरपदांची यूपीएससीमार्फत भरती.

वेतन – दरमहा रु. ६१,२१६/-

पात्रता – इकॉनॉमिक्समधील पदव्युत्तर पदवी.

अनुभव – इकॉनॉमिक रिसर्च/इन्व्हेस्टिगेशन कामाचा २ वर्षांचा अनुभव. (रुरल डेव्हलपमेंट संबंधित आणि इव्हॅल्युएशन करणे/ टेक्निकल रिपोर्ट बनविणे.) उच्चशिक्षित ‘अज’च्या उमेदवारांबाबतीत अनुभवाची अट शिथिल होऊ शकते.

वयोमर्यादा – ३० वष्रेपर्यंत (इमाव – ३३ वष्रे, अजा/अज – ३५ वष्रे). ऑनलाइन रिक्रूटमेंट अ‍ॅप्लिकेशन http://www.upsconline.nic.in/ वर १४ सप्टेंबर २०१७ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई पदांच्या एकूण १५२ जागांची भरती.

पात्रता – १० वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – दि. ३१ ऑगस्ट २०१७ रोजी १८ ते ३८ वष्रे. अंदाजे एकत्रित वेतन रु. १३,०००/-  इतर भत्ते. निवडीसाठी ९० गुणांची लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित व बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्न. मुलाखत १० गुणांसाठी.

अंतिम निवड – लेखी परीक्षा व मुलाखतीचे गुणांनुसार केली जाईल. परिविक्षाधीन (प्रोबेशन)

कालावधी – ६ महिन्यांचा. या दरम्यान रु.१२,००० /- पगार देण्यात येईल. परीक्षा शुल्क रु. ४००/-. परीक्षा अर्ज भरल्यानंतर चलान डाऊनलोड करता येईल.

ऑनलाइन अर्ज www.pdccbank.com/career या संकेतस्थळावर ११ सप्टेंबर २०१७ पर्यंत करावेत. परीक्षा ऑक्टोबर २०१७ मध्ये होईल.

इंजिनीअिरग डिप्लोमा धारकांसाठी इंडियन कोस्ट गार्ड (संरक्षण मंत्रालय) मध्ये यांत्रिकपदावर भरती.

पात्रता – इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलि कम्युनिकेशनमधील अभियांत्रिकी पदविका किमान  ६०% (सरासरी) गुण. (अजा/अज राष्ट्रीय पातळीवर स्पोर्ट्समध्ये १/२/३ क्रमांक मिळविलेले खेळाडू ५५% गुण.)

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ फेब्रुवारी, १९९६ ते ३१ जानेवारी, २००० दरम्यानचा असावा.

(कमाल वयोमर्यादेत सूट. इमाव – ३ वष्रे, अजा/अज – ५ वष्रे).

वेतन – रु.३६,८१६/-  इतर भत्ते.

निवड पद्धती – लेखी परीक्षा ऑक्टोबर, २०१७ मध्ये कोस्ट गार्ड, प्रादेशिक मुख्यालय (पश्चिम), वरळी सी फेस पोस्ट ऑफिस, वरळी कॉलनी, मुंबई – ४०० ०३० येथे होईल. लेखी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाइप असेल, ज्यात संबंधित ब्रँच (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलि कम्युनिकेशन) आणि सामान्य ज्ञान/रिझिनग अ‍ॅप्टिटय़ूड आणि इंग्रजी या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणीला सामोरे जावे लागेल.

(१.६ कि.मी. ७ मिनिटांत धावणे,  २० उठाबशा, १० पुशअप्स) त्यानंतर वैद्यकीय चाचणी. उंची – किमान १५७ सें.मी. (ट्रायबल्ससाठी उंचीत सूट केंद्र सरकारच्या नियमांनुसार.)

छाती – किमान ५ सें.मी. फुगविता आली पाहिजे.

ट्रेिनग – फेब्रुवारी, २०१८ पासून आय्एन्एस्, चिल्का येथे ऑनलाइन अर्ज www.joinindiancoastguard.gov.in या संकेतस्थळावर १३ सप्टेंबर,२०१७  पर्यंत (१७.००वाजेपर्यंत) करावेत.

First Published on September 9, 2017 1:54 am

Web Title: job opportunities job issue 3