*  टाटा ट्रस्ट शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवीत आहे.

पात्रता –

पदवी शिक्षणासाठी – बॅचलर ऑफ फूड टेक्नॉलॉजी/ होमिओपॅथी/ बीएस्सीसी अ‍ॅग्रीकल्चर – किमान ६५% गुण.

नìसग/ फार्मसी/ बीटेक (फिजिक्स)/ डेंटिस्ट्री/ बीटेक (फिजिक्स) बॅचलर ऑफ फिजिओथेरपी किमान ७०% गुण.

अर्जदार भारतात शिक्षण घेत असला पाहिजे.

त्यांनी प्रथम वर्षांचे शिक्षण (त्यांच्या शाखेतील) पूर्ण केलेले असावे आणि ते टय़ूशन फी आणि इतर फी भरणारे उमेदवार असावेत.

पदव्युत्तर पदवी –

बायोटेक्नॉलॉजी/ मायक्रोबायोलॉजी/ केमिस्ट्री/ फिजिक्स/ गणित/ स्टॅटिस्टिक्स/ अ‍ॅन्थ्रोपोलॉजी/ होमिओपॅथी किमान ६५% गुणांसह उत्तीर्ण.

नर्सिंग/ डेंटिस्ट्री/ फार्मसी/ फिजिओथेरपी किमान ७०% गुणांसह उत्तीर्ण.

फॉरेन्सिक सायन्स/ डिझास्टर मॅनेजमेंट किमान  ६०% गुणांसह उत्तीर्ण.

एमडी/ एमएस/ डीएम/ एमसीएच किमान ७०% गुण.

अर्जदार भारतात शिक्षण घेत असावेत. त्यांनी आपल्या शाखेतील पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला असावा. तसेच ते टय़ूशन फी आणि इतर फी भरत असावेत.

ऑनलाइन अर्ज http://www.igpedutatascholarship.org या संकेतस्थळावर करावेत. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख २० डिसेंबर २०१७.

*  बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड सायन्स (BITS) पिलानी/ दुबई/ गोवा/ हैदराबाद ‘पीएच.डी. प्रोग्रॅम’ २०१७-१८ साठी पुढील विषयांत पीएच.डी.साठी प्रवेश सूचना.

बायोलॉजिकल सायन्सेस, केमिकल/ सिव्हिल/ इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल इंजिनीअरिंग, केमिस्ट्री, कॉम्प्युटर सायन्स, इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड फायनान्स, मॅनेजमेंट, मॅथेमॅटिक्स, फार्मसी, फिजिक्स, ह्य़ूमॅनिटिज् अ‍ॅण्ड सोशल सायन्सेस, इंटरडिसिप्लिनरी कोस्रेस- जसे की बायोटेक्नॉलॉजी, एनर्जी, एन्व्हिरॉनमेंट, रोबोटिक्स, नॅनो सायन्स अ‍ॅण्ड नॅनो टेक्नॉलॉजी आणि वॉटर मॅनेजमेंट.

पात्रता – संबंधित विषयातील किमान ६०% गुणांसह एमएससी/ बीई/ बीफार्म/ एमई/ एमफार्म/ एमबीए इंटरडिसिप्लिनरी कोस्रेससाठी इतर शाखांमधील वरील पात्रता ग्राह्य़ धरली जाईल.

ह्य़ुमॅनिटीज् आणि सोशल सायन्सेसमधील पीएच.डी.साठी एमए किमान ५५% सह उत्तीर्ण.

CSIR/UGC-NET उत्तीर्ण उमेदवारांना बिट्स पिलानीच्या प्रवेश परीक्षेस बसण्याची आवश्यकता नाही.

निवड पद्धती – प्रवेश परीक्षा मुलाखत. इकळर च्या वरील कॅम्पसच्या जवळपास काम करणारे उमेदवार पार्टटाइम कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतात. पूर्ण वेळ पीएच.डी. प्रोग्रॅमसाठी निवडलेल्या उमेदवारांना दर महिन्याला रु. २५,०००/- असिस्टंटशिप म्हणून दिले जातील. अर्जाचा विहित नमुना http://www.bitsadmission.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याची प्रिंटआऊट घेऊन पूर्ण भरलेले अर्ज रु. २,२००/- च्या फीसह ‘Dean Admissions, BITS Pilani, Pilani – 333 031l या पत्त्यावर १४ डिसेंबर २०१७ (५.००पीएम)पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

*  भारत सरकार, संरक्षण मंत्रालय, वेस्टर्न नेव्हल कमांड मुख्यालय, मुंबई येथे नॉन इंडस्ट्रियल एमटीएसच्या एकूण ३४ पदांची भरती. मल्टिटास्किंग नॉनटेक्निकल स्टाफ  

माळी – १७ पदे,

धोबी – ५ पदे,

वॉर्ड सहायक – ६ पदे,

लॅबोरेटरी अटेंडंट – २ पदे

मेडिकल अटेंडंट – २ पद,

बार्बर – १ पद,

मसालजी – १ पद.

एमटीएससाठी पात्रता – दहावी उत्तीर्ण + संबंधित कामातील कौशल्य.

इतर नॉन इंडस्ट्रियल पदे –

सिव्हिलियन मोटार ड्रायव्हर (ओ.जी) २२ पदे –

पात्रता १०वी उत्तीर्ण + एचएमव्ही ड्रायिव्हग लायसन्स आणि मोटर सायकल लायसन्स + १ वर्षांचा जड वाहन चालविण्याचा अनुभव.

वयोमर्यादा – १८ ते २५ वष्रे, इमाव – १८ ते २८ वष्रे, अजा/अज – १८ ते ३० वष्रे.

विस्तृत जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या

दि. २ डिसें. २०१७ च्या अंकात पाहावी.

ऑनलाइन अर्ज http://hqwncrecruitment.com/ या संकेतस्थळावर २५ डिसें. २०१७ पर्यंत करावेत.