*   स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट – कॅटेगरी-१ च्या एकूण ६७ पदांची न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, काक्रापार, गुजरात येथे भरती.

एसटी/एसए (कॅटेगरी-१) डिप्लोमा इन

इंजिनीअरिंग –

इलेक्ट्रिकल – १४ पदे

केमिकल – ५

मेकॅनिकल – १९

इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रमेंटेशन – ११

पात्रता – संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदविका किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण. (एसएससी/आयटीआय उमेदवार ज्यांनी डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षांला प्रवेश घेऊन डिप्लोमा केला असेल असे उमेदवार पात्र नाहीत.)

एसटी/एसए (कॅटेगरी-१) बीएस्सी इन

फिजिक्स – ९ पदे.

पात्रता – बी.एस्सी. किमान ६०% गुणांसह (फिजिक्स मुख्य विषयासह आणि केमिस्ट्री/मॅथेमॅटिक्स/ स्टॅटिस्टिक्स/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स यांपैकी एक सबसिडिअरी विषय असावा.)

केमिस्ट्री – ९ पदे.

पात्रता – केमिस्ट्री मुख्य विषयासह बीएस्सी (किमान ६०% गुण) आणि फिजिक्स/मॅथ्स्/स्टॅट्स/ इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स यांपैकी एक सबसिडिअरी विषय असावा. बारावीला गणित विषय आवश्यक.

वयोमर्यादा – सर्व पदांसाठी दि. २५ नोव्हेंबर, २०१७ रोजी १८ ते २५ वर्षे. (वयोमर्यादा शिथिलक्षम ५ वर्षे अजा/अजसाठी, ३ वर्षे इमावसाठी आणि १०/१३/१५ विकलांगांसाठी).

शारीरिक मापदंड – स्टायपेंडिअरी ट्रेनी / सायंटिफिक असिस्टंट – बी.एस्सी.साठी

उंची – किमान १६० सें.मी. वजन – किमान ४५.५ कि.ग्रॅ. (विकलांग उमेदवारांना ही अट लागू नाही.)

ट्रेनिंग – निवडलेल्या उमेदवारांना एनपीसीआय्एलच्या न्यूक्लिअर ट्रेनिंग सेंटरमध्ये दीड वर्षांचे ट्रेनिंग दिले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या उमेदवारांना सायंटिफिक असिस्टंटच्या पदावर घेतले जाईल. ट्रेनिंगनंतर १ वर्ष कालावधीसाठी प्रोबेशन असेल.

स्टायपेंड – दरमहा रु. ९,३००/- ट्रेनिंग दरम्यान.

वेतन  – दरमहा रु. ४७,०००/- अंदाजे.

निवड पद्धती – ऑनलाइन लेखी परीक्षा मुंबई, चेन्नई, सूरत, दिल्ली, कलकत्ता या केंद्रांवर जानेवारी, २०१८ मध्ये घेतली जाईल. ज्यात एकूण तीन सेक्शनमध्ये प्रत्येकी ४० गुण असे एकूण १२० गुणांसाठी असेल. चुकीच्या उत्तरांना निगेटिव्ह गुण दिले जाणार नाहीत. अंतिम निवड लेखी परीक्षा आणि मुलाखत यांतील गुणांवर प्रत्येकी ५०% वेटेज देऊन काढलेल्या गुणवत्तेनुसार. इमाव उमेदवारांनी दि. १ एप्रिल, २०१७ नंतर जारी केलेला जातीचा दाखला सादर करणे आवश्यक. ज्यात ‘नॉन-क्रिमी लेअर’बाबत उल्लेख असावा. ऑनलाइन अर्ज

https://www. npcilcareers. co.in/ या संकेतस्थळावर दि. २५ नोव्हेंबर, २०१७ (१६.०० वाजेपर्यंत) करावेत.

* इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो), सतीश धवन स्पेस सेंटर शार (जाहिरात क्र. ०३/ २०१७) येथे पुढील पदांची भरती.

१) सायंटिफिक असिस्टंट (केमिस्ट्री) – २ पदे.

पात्रता – बीएस्सी (सीपीएम).

२) सायंटिफिक असिस्टंट (फिजिक्स) – १ पद. पात्रता – बीएस्सी (पीसीएम).

३) टेक्निकल असिस्टंट –

सिव्हिल इंजिनीअरिंग – ५ पदे,

केमिकल इंजिनीअरिंग – ३ पदे,

इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन

इंजिनीअरिंग – ४ पदे,

मेकॅनिकल इंजिनीअरिंग – १३ पदे,

फोटोग्राफी – १ पद.

पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा प्रथम वर्गासह उत्तीर्ण.

४) लायब्ररी असिस्टंट – ए – १ पद.

पात्रता – प्रथम वर्गासह पदवी लायब्ररी सायन्समधील पदव्युत्तर पदवी.

वयोमर्यादा – सर्व पदांसाठी दि. १७ नोव्हेंबर, २०१७ रोजी १८ ते ३५ वर्षे.

वेतन – दरमहा रु. ४४,९००/-  डी.ए.

ऑनलाईन अर्ज <http://www.shar.gov.in/>  या संकेतस्थळावर दि. १७ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत करावेत.