*   नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे ‘अप्रेंटिसशिप ट्रेनिंग’साठी १८० (पुरुष/महिला) आयटीआय पात्रताधारक आणि १० वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती.

एक वर्षांच्या ट्रेनिंगसाठी

(ए)    फिटर –  १५ पदे,

(बी)    मशिनिस्ट – १०,

(सी)    शीट मेटल वर्कर – १५,

(डी)    वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिकल) – १५,

(ई)    प्लंबर – १०,

(एफ)   मेसॉन (बीसी) (गवंडी) (बिल्डिंग कन्स्ट्रक्शन) – १०,

(जी)    मेकॅनिक मशीन टूल मेन्टेनन्स –  ५,

(एच)   मेकॅनिक रेफ्रिजरेटर आणि ए.सी. – ५,

(आय) मेकॅनिक डिझेल – १५,

(जे)    टेलर (जनरल) – ५,

(के)    पेंटर (जनरल) – १०,

(एल्)   पॉवर इलेक्ट्रिशियन – २०,

एकूण १३५ पदे.

दोन वर्षे कालावधीचे ट्रेनिंग –

(ए)    शिपराइट (स्टील) – फिटर – १० पदे,

(बी)    पाइप फिटर (प्लंबर) – १० पदे,

(सी)    शिपराइट (वुड) – कारपेंटर – १५ पदे,

(डी)    रिग्गर फ्रेशर – ५ पदे,

(ई)    क्रेन ऑपरेटर (ओव्हरहेड स्टील इंडस्ट्री) – फ्रेशर ५ पदे.

पात्रता – सर्व पदांसाठी ८ वी किंवा १० वी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण. संबंधित ट्रेडमधील आयटीआय परीक्षा किमान  ६५% गुणांसह उत्तीर्ण.

(रिग्गर आणि क्रेन ऑपरेटर या पदांसाठी आयटीआय पात्रता धारण करण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच दहावी उत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत.) एकूण ४५ पदे.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ एप्रिल, १९९७ ते ३१ मार्च, २००४ दरम्यानचा असावा. कमाल वयोमर्यादेत अजा/अजसाठी ५वर्षांची सूट.

शारीरिक मापदंड – उंची – १५० सें.मी. वजन – ४५ कि.ग्रॅ. छाती – किमान ५ सें.मी. फुगविता आली पाहिजे. स्टायपेंड – ट्रेनिंगदरम्यान नियमानुसार मिळेल. दहावी आयटीआयच्या गुणवत्तेनुसार शॉर्ट लिस्टेड उमेदवारांसाठी निवड पद्धती – जानेवारी, २०१८ च्या शेवटच्या आठवडय़ात लेखी परीक्षा आयोजित केली जाईल.

कालावधी – दोन तास. १०० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न. सामान्य विज्ञान, सामान्य ज्ञान आणि गणित या विषयांवर आधारित प्रश्नपत्रिका हिंदी/इंग्रजी भाषेत छापलेली असेल. ओएमआरवरील चुकीच्या उत्तरांना गुण वजा केले जाणार नाहीत.

परीक्षा केंद्र मुंबईतच असतील. परीक्षेचा दिनांक, वेळ आणि लेखी परीक्षेचे ठिकाण उमेदवारांना ऑनलाइन कॉलअप लेटरमधून कळविले जाईल.

तसेच भरतीविषयी सर्व माहिती http://www.bhartiseva.com  किंवा http://www.indiannavy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाईल. लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवारांना मुलाखत/ स्किल टेस्टसाठी फ्रेबुवारी, २०१८ मध्ये बोलाविले जाईल. त्यानंतर वैद्यकीय तपासणी घेतली जाईल.

ट्रेनिंग एप्रिल, २०१८ पासून सुरू होणार.

ऑनलाइन अर्ज http://www.bhartiseva.com या संकेतस्थळावर दि. ३० डिसेंबर, २०१७ पर्यंत करावेत.

अर्जासोबत पुढील कागदपत्र पीडीएफ  फॉरमॅटमध्ये संकेतस्थळावर अपलोड करावीत.

पासपोर्ट साइज फोटो, एसएस्सी मार्कलिस्ट/प्रमाणपत्र, जन्म तारखेचा पुरावा, आठवीची मार्कलिस्ट (जरुरी असल्यास), आयटीआय मार्कशीट,  अजा/अज/इमावसाठी जातीचा दाखला (इमावसाठी नॉन-क्रीमी लेअर दाखल्या सोबत), पॅनकार्ड/आधारकार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र, आधारकार्ड अपलोड करणे आवश्यक, विकलांग असल्यास तसे प्रमाणपत्र. उमेदवारांना कोणतीही फी भरावयाची नाही. फक्त एकच अर्ज करावयाचा आहे.

*   एनटीपीसी लिमिटेड वेस्टर्न रिजन मुख्यालय रायपूर येथे आयटीआय ट्रेनी, असिस्टंट ट्रेनी, आणि लॅब असिस्टंट ट्रेनी पदांची भरती एकूण पदे ६९.

१)     आयटीआय (फिटर) ट्रेनी एकूण ३० पदे (युआर – १७, इमाव – १, अजा -३,

अज – ९)

२) आयटीआय (इलेक्ट्रिशियन) ट्रेनी  – १६ पदे (युआर- १०, अजा- १०, अज – ५)

३) आयटीआय (इन्स्टूमेंट मेकॅनिक) ट्रेनी – १२ पदे (युआर – ८, अजा – १, अज – ३)

पद क्र. १ ते ३ साठी पात्रता दहावी उत्तीर्ण + संबंधित विषयातील आयटीआय कोर्स.

४) असिस्टंट (मटेरिअल/ स्टोअर किपर) ट्रेनी – ५पदे (यूआर – ४, अजा – १)

पात्रता- स्टोअर कििपगमध्ये एनसीटीव्हीटी परीक्षा उत्तीर्ण + ३० शप्रमि इंग्रजी टायिपग स्पीड किंवा दहावी उत्तीर्ण + फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रानिक्स/ इन्स्ट्रमेंट मेकॅनिक ट्रेडमधील आयटीआय कोर्स + ३० शप्रमि इंग्रजी टायिपग स्पीड.

५) लॅब असिस्टंट (केमिस्ट्री) ट्रेनी- पात्रता- बीएसी (केमिस्ट्री/ अ‍ॅप्लाईड केमिस्ट्री/ इंडस्ट्रियल केमिस्ट्री) कमाल

वयोमर्यादा – दि. १ जाने २०१८ रोजी २७ वर्षे. (इमाव-३० वर्षे, अजा/अज ३२ वर्षे, विकलांग ३७/४०/४२ वर्षे.)

निवड पद्धती – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी लेखी परीक्षा ज्यात पार्ट १ मध्ये संबंधित विषयाच्या ज्ञानावर आधारित ७० प्रश्न आणि पार्ट २ मध्ये अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट ५० प्रश्न (सामान्य ज्ञान, क्वांटिटेटीव्ह अ‍ॅप्टिटय़ूड आणि रिझिनग). प्रत्येक चुकीच्या उत्तराला १/४ गुण वजा केले जातील. कालावधी दोन तास. पार्ट – १ लेखी परीक्षेतून निवडलेल्या उमेदवारांना स्किल टेस्ट द्यावी लागेल. लेखी परीक्षा छत्तीसगढ राज्यातील रायपूर, बिलासपूर आणि रायगड परीक्षा केंद्रावर मार्च २०१८ मध्ये होईल. विहित नमुन्यात (एम्प्लॉयमेंट न्यूज च्या दि. २ डिसें. १७ च्या अंकातील जाहिरातीत दिल्याप्रमाणे पूर्ण भरलेले अर्ज ‘ऊॅट (HR Rectt), NTPC Ltd. Western Region -II, Headquarters, 4th Floor, Magneto Offizo, Labhandi, GE Road, Raipur (CG) 492001’ या पत्त्यावर रजिस्टर्ड किंवा स्पीड पोस्टाने  दि. ३१ डिसें २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. अर्जाच्या लिफाफ्यावर वरील बाजूस ‘The post applied for’ असा उल्लेख असावा.