29 January 2020

News Flash

टाटा मेमोरियल सेंटरमध्ये एमएस्सी (क्लिनिकल रिसर्च) अभ्यासक्रम

टाटा मेमोरियल सेंटरमध्ये क्लिनिकल रिसर्च या विषयात एमएसस्सी करण्यासाठी प्रवेश उपलब्ध आहेत.

मुंबईच्या परळ येथील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये क्लिनिकल रिसर्च या विषयात एमएसस्सी करण्यासाठी प्रवेश उपलब्ध आहेत. क्लिनिकल रिसर्चमधील पदव्युत्तर पदवी होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट या अभिमत विद्यापीठातर्फे दिली जाईल.
अर्हता : बी.एस्सी. (वनस्पतीशास्त्र/ प्राणिशास्त्र/ जैवरसायनशास्त्र/ सूक्ष्मजीवशास्त्र/ जेनेटिक्स/ जैवतंत्रज्ञान/ रसायनशास्त्र/ क्लिनिकल न्यूट्रिशन/ ऑक्युपेशनल थेरपी/ फिजीओथेरपी/ नìसग) किंवा बी.फार्म. किंवा मेडिसीन/ डेंटिस्ट्रीमधील पदवी.
वयोमर्यादा : ३१ मे २०१६ रोजी ३० वष्रे. (अजा/अज- ३५ वष्रे, इमाव- ३३ वष्रे.)
अभ्यासक्रमाचा कालावधी : २ वर्षे.
१ वर्ष इंटर्नशिप.
प्रशिक्षणादरम्यान विद्यावेतन- रु. १० हजार प्रतिमाह (प्रथम वर्षांसाठी), रु. १२ हजार प्रतिमाह (दुसऱ्या वर्षांसाठी.) रु. १६ हजार प्रतिमाह (इंटर्नशीप कालावधीसाठी).
निवड पद्धती : लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणवत्तेनुसार निवड केली जाईल. लेखी परीक्षेत किमान ५० टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
परीक्षा शुल्क : रु. २ हजार (महिला/ अजा/ अज यांना शुल्कमाफ).
प्रवेश परीक्षेचे स्वरूप : वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी. परीक्षेत मूलभूत विज्ञान, क्लिनिकल रिसर्च मेथड्स आणि सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केले जातील. फक्त मूळ प्रवेशपत्र आणि वैध ओळखपत्र असलेल्या उमेदवारांनाच परीक्षेच्या ठिकाणी प्रवेश दिला जाईल.
अभ्यासक्रमाचे शुल्क : निवडलेल्या उमेदवारांकडून रु. ३० हजार प्रत्येक वर्षी असे दोन वर्षांसाठी अभ्यासक्रमाचे शुल्क घेतले जाईल. मिळणाऱ्या विद्यावेतनातून शुल्क हप्त्याहप्त्याने
वजा केले जाईल.
अर्ज पाठविण्याची मुदत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज mc.gov.in या संकेतस्थळावर करून त्याची पिंट्रआऊट काढून सही करावी आणि रजिस्टर्ड पोस्ट किंवा स्पीड पोस्टद्वारे ‘डायरेक्ट अ‍ॅकॅडॅमिक्स’, टाटा मेमोरियल सेंटर, १३ वा मजला, होमी भाभा ब्लॉक बिल्डिंग, डॉ. अन्रेस्ट बोर्जेस रोड, परळ, मुंबई- ४०००१२ या पत्त्यावर २ जून २०१६ पर्यंत पाठवावे.

First Published on May 30, 2016 12:10 am

Web Title: msc clinical research course in tata memorial centre
Next Stories
1 आदिवासी युवक-युवतींसाठी कौशल्य विकास कार्यक्रम
2 पुणे विद्यापीठ संलग्न एम.सी.ए. (व्यवस्थापन) अभ्यासक्रम
3 यूपीएससीची तयारी : यूपीएससी (मुख्य परीक्षा) सामान्य अध्ययन ३ : स्वरूप आणि व्याप्ती