22 March 2018

News Flash

आयआयटी दिल्लीमध्ये एमबीए करण्याची संधी

अर्जदारांपैकी पात्रताधारकांची आयआयटी, दिल्लीतर्फे निवड परीक्षा घेण्यात येईल.

दत्तात्रय आंबुलकर | Updated: March 9, 2018 12:29 AM

आयआयटी म्हणजेच इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली येथे सेवारत उमेदवारांसाठी विशेष एमबीए अभ्यासक्रम खालीलप्रमाणे उपलब्ध आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता- उमेदवारांनी इंजिनीअरिंग, तंत्रज्ञान, आर्किटेक्चर, फार्मसी, कृषी अभियांत्रिकी, गणित, रसायनशास्त्र, सांख्यिकी, संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स सायन्स, पर्यावरण विज्ञान, ऑपरेशन्स रिसर्च यांसारख्या विषयांतील पदवी कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते सीए/ आयसीडब्ल्यूए यांसारखे पात्रताधारक असावेत व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा आणि त्यांना संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव असायला हवा.

निवड प्रक्रिया- अर्जदारांपैकी पात्रताधारकांची आयआयटी, दिल्लीतर्फे निवड परीक्षा घेण्यात येईल. ही निवड परीक्षा संगणकीय पद्धतीने १ एप्रिल २०१८ रोजी घेण्यात येईल.

निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना आयआयटीतर्फे समूहचर्चेसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांना प्रवेश देण्यात येईल.

अर्जासह भरावयाचे  शुल्क- अर्जासह भरावयाचे प्रवेश शुल्क म्हणून अर्जदारांनी संगणकीय पद्धतीने २५०० रु. भरणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १७ ते २३ फेब्रुवारी २०१८ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्लीची जाहिरात पाहावी अथवा आयआयटीच्या www.iitd.ac.in अथवा http://dms.iitd.ac.in/mba-part-admission.html या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०१८ आहे.

First Published on March 9, 2018 12:29 am

Web Title: opportunity to do mba in iit delhi
  1. No Comments.