should not schedule wedding in afternoon to avoid heatstroke says Dr Deepak Selokar
‘उष्माघात टाळायचा असेल तर भरदुपारी लग्न…’
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
Actor Sonu Sood made an anonymous post about trolling of Hardik Pandya
IPL 2024 : एक दिवस कौतुक करायचं, दुसऱ्या दिवशी हुर्यो उडवायची अशी वागणूक देशाच्या हिरोंना देऊ नका – सोनू सूद
career options after 10th and 12th career opportunities after 10th and 12th
स्कॉलरशीप फेलोशीप : करिअर मॅपिंग आताच सुरू करा

सध्याचे जग पूर्वीपेक्षा फारच स्पर्धात्मक झाले आहे. तुम्ही एखादे काम वेळेअभावी करणार नसाल तर दुसरा कुणीतरी तेच काम करायला लगेच तयार होतो व तुमची काम करायची संधीच जाते. नोकरीमध्ये हे फार वेळा घडले तर कंपनी लवकरच तुम्हाला कायमचा निरोप देऊ  शकते. यामुळे कार्यालयीन वेळेबाहेर न कुरकुरता काम  (Overtime) करणे आता एक रूढीच होऊन गेली आहे.

अर्थात प्रत्येक कर्मचाऱ्याची ओव्हरटाइम करायची कारणे भिन्न असू शकतात.

  • कामाचे प्रचंड ओझे – ओव्हरटाइम करण्यासाठी हे मुख्य कारण सांगितले जाते. कार्यालयीन वेळात काम पूर्ण होत नाही व उद्याचा दिवस उजाडायच्या आधी पूर्ण झालेच पाहिजे असे कामाचे स्वरूप असेल तर ओव्हरटाइमला पर्याय नाही.
  • कामाचे स्वरूप – फिरतीचा विक्री व्यवसाय, वाहतूक क्षेत्र, रुग्णालये, सेवा संस्था अशा ठिकाणी २४ तास पाळी पद्धतीने काम चालते तेथे बऱ्याच वेळा ओव्हरटाइम करणे अपरिहार्य ठरते.
  • मीटिंग, कॉन्फरन्स कॉल – यामुळे दिवसभरातील बराच वेळ जाऊन हातातील काम बाजूला पडते व ते निपटण्यासाठी ओव्हरटाइम करावा लागतो.
  • लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी – कार्यालयात आजूबाजूला अनेक सहकारी बऱ्याच वायफळ गोष्टी करत असतील तर काम करण्यात आपले लक्ष लागत नाही, सातत्य कमी होते. काम करण्याचा वेग मंदावतो, तसेच उत्पादकता कमी होते; परिणामत: ओव्हरटाइम करणे क्रमप्राप्त होते.
  • अकार्यक्षमता – दिलेले काम कुवतीच्या बाहेरचे असेल तर अर्थातच ते हळूहळू किंवा न करण्याकडे कर्मचाऱ्यांची प्रवृत्ती बनते. मग ओव्हरटाइमच्या स्वरूपात ते काम पूर्ण करावे लागते.
  • प्रौढी मिरवणे – ओव्हरटाइम करण्याचे हेही एक कारण असू शकते. काही कर्मचारी सहकाऱ्यांना व वरिष्ठांना ‘माझ्यावर कामाचे किती ओझे आहे किंवा मीच सर्वात जबाबदार कर्मचारी आहे’ असे दाखविण्यासाठी ओव्हरटाइम करतात.
  • नकार देता न येणे – काही नाठाळ सहकारी स्वत:ची कामे तुमच्यावर लादतात; नाही म्हणता येत नसल्याने तुम्ही ओव्हरटाइम करून ती कामे पूर्ण करता.

ओव्हरटाइम करण्यामुळे कदाचित तुम्ही एक जबाबदार कर्मचारी म्हणून नावलौकिक मिळवालही, परंतु त्याचे तेवढेच दुष्परिणामही तुम्हाला भोगायला लागतील हे नक्की. उशिरा जाण्यामुळे तुमचे कौटुंबिक आयुष्य त्रासदायक होईल, मनावरचा ताण वाढेल, प्रकृतीस्वास्थ्यावर अनिष्ट परिणाम होईल व मुख्य म्हणजे या सर्व कारणांमुळे चिडचिड वाढून कार्यक्षमतेमध्येसुद्धा फरक पडेल.

हे लक्षात ठेवा

नोकरीच्या पहिल्या वर्षांत जेव्हा तुम्ही नवोदित असता, त्याच वेळेला ओव्हरटाइम करण्याविषयी पुढे दिलेली काळजी घ्या :

  • एखाद वेळेला ओव्हरटाइम करणे काही गैर नाही, पण त्याचे सवयीत रूपांतर होऊ देऊ  नका.
  • ओव्हरटाइम करताना स्वत:चे, सहकाऱ्यांचे किंवा वरिष्ठांनी दिलेल्या कामांची ‘तातडीचे (urgent) व महत्त्वाचे (important)’ अशी वर्गवारी करून क्रमवारी लावा, म्हणजे कामाचा निपटारा करताना कमीत कमी ताण येईल.
  • मीटिंग, कॉन्फरन्स कॉल ठरविताना तुमच्या दैनंदिन कामात कमीत कमी व्यत्यय येईल व ती पूर्ण होतील अशी काळजी घ्या.
  • जे काम तुमच्या कुवतीबाहेरचे आहे किंवा लादले जात आहे त्यासाठी नम्रपणे स्पष्ट नकार द्या.
  • दैनंदिन कामाची सूत्रबद्ध आखणी करून ते कमीत कमी वेळात कसे पूर्ण करता येईल याचा सराव करा. नवीन कामांसाठी नवीन कौशल्ये आत्मसात करा.
  • ओव्हरटाइम करताना ताण जाणवू नये म्हणून मधून मधून थोडी विश्रांती घ्या, थोडे चाला किंवा हात पाय लांब करा.
  • कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त घरून काम करणे (work from home), कॉन्फरन्स कॉलवर बोलणे हासुद्धा ओव्हरटाइमचाच प्रकार आहे. अशा वेळी कौटुंबिक वातावरण खराब होणार नाही, तुमच्या कामाचा ताण घरच्यांना जाणवणार नाही याची खबरदारी घ्या.
  • ओव्हरटाइमच्या वेळेला केलेल्या कामाची तपशीलवार नोंद ठेवा व तशी ई-मेल किंवा नोट सहकाऱ्यांना / वरिष्ठांना पाठवा, म्हणजे तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय दुसरे कुणी घेऊ शकणार नाही.
  • ओव्हरटाइम करणे किंवा न करणे हा एक परिस्थितीजन्य नाजूक निर्णय आहे. परंतु वर दिलेल्या सूचना पाळल्यास आपला फायदा होण्याची जास्त शक्यता आहे.

dr.jayant.panse@gmail.com