कॉफी बोर्डातर्फे घेण्यात येणाऱ्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कॉफी क्वालिटी मॅनेजमेंट या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या २०१७-१८ या शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी- उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत-

अभ्यासक्रमाचा कालावधी व तपशील- बारा महिने कालावधीच्या या विशेष पदविका अभ्यासक्रमात कॉफीच्या गुणवत्तेशी निगडित अशा कॉफी उत्पादन, चव आणि दर्जा, कॉफी पिकाची निगा, गुणवत्ता व विक्री, कॉफी उत्पादन प्रक्रियेशी निगडित पद्धती व कॉफी उत्पादनाशी संबंधित प्रशिक्षण इ. विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्जदार विद्यार्थ्यांनी जीवशास्त्र, प्राणिशास्त्र, रसायनशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी, बायोसायन्स, अन्न- तंत्रज्ञान, खाद्य विज्ञान, पर्यावरण विज्ञान, कृषी विज्ञान यांसारख्या विषयातील पदवी अभ्यासक्रम चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.

विशेष सूचना – अनुभवी व कार्यरत उमेदवारांना प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येईल.

निवड पद्धती – अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना कॉफी बोर्डातर्फे ३० ऑगस्ट २०१७ रोजी बंगलोर येथे मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांना अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.

अर्जासह पाठविण्याचे शुल्क – अर्जासह पाठवायचे प्रवेश शुल्क म्हणून अर्जदारांनी आपल्या प्रवेश अर्जासह ५०० रु.चा ‘कॉफी बोर्ड आयईबीआर अकाऊंट’ यांच्या नावाने असणारा डिमांड ड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क – अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी कॉफी बोर्डाच्या दूरध्वनी क्र. ०८०- २२२६२८६८ अथवा २२२६६९९१ वर संपर्क साधावा अथवा कॉफी बोर्डाच्या http://www.indiacoffee.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख – संपूर्णपणे भरलेले, आवश्यक तो तपशील, कागदपत्र, डिमांड ड्राफ्ट व ९ इंच x ६ इंच आकाराचा स्वत:चा पत्ता असलेल्या लिफाफ्यासह असणारे प्रवेश अर्ज डिव्हिजनल हेड (कॉफी क्वालिटी), कॉफी बोर्ड, १, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी, बंगलोर- ५६०००१ या पत्त्यावर १४ ऑगस्ट २०१७ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

विज्ञान-शास्त्र वा कृषीशी संबंधित विषयांसह पदवीधर असणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना कॉफी उत्पादन- दर्जा नियंत्रण यांसारख्या विषयातील विशेष पदविका अभ्यासक्रमासह आपले करिअर करायचे असेल अशांनी या अभ्यासक्रमाचा जरूर फायदा घ्यावा.