23 November 2017

News Flash

एमपीएससी मंत्र : अवकाश संशोधन उपयुक्त अभ्यास २

या उपग्रहांवरील उपकरणांच्या माध्यमातून भूमपीकी, अवकाशीय, वर्णपटीय, माहिती अद्ययावतरीत्या उपलब्ध होते.

फारूक नाईकवाडे | Updated: September 8, 2017 2:36 AM

मागील लेखामध्ये दळणवळण उपग्रह, दिशादर्शक उपग्रह व लघुउपग्रहांबाबत चर्चा करण्यात आली. इस्रोकडून प्रक्षेपित करण्यात आलेल्या उर्वरित उपग्रहांचे प्रकार या लेखामध्ये पाहू.

दूरसंवेदन उपग्रह

केरळमधील नारळांच्या बागांमध्ये पसरलेल्या मूळकुजव्या रोगाचे सर्वेक्षण करण्यासाठी १९७०च्या दशकामध्ये भारताचा पहिला पथदर्शी दूरसंवेदी उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. या अनुभवानंतर IRS Indian Remote sensing Satellites ची मालिका सुरू करण्यात आली. सध्या कार्यरत एकूण १७ दूरसंवेदी उपग्रहांपकी रिसोर्स सॉट, १,२,२ए, काटरेसॉट १,२,२ए, २बी रीसॉट १,२,१ ओशन सॉट, मेघा टॉपिक्स, सरल आणि स्कॉट सट हे १३ उपग्रह सूर्य समकालिक कक्षेमध्ये आणि ईन्सॉट ३डी, कल्पना, ईन्सॉट ३ डीआर हे ४ उपग्रह भूस्थिर कक्षेमध्ये प्रक्षेपित करण्यात आले आहेत. सन २०१७ मध्ये काटरेसॉट २ श्रेणीतील दोन उपग्रह १५ फेब्रुवारी व २३ जून रोजी प्रक्षेपित करण्यात आले आहेत.

या उपग्रहांवरील उपकरणांच्या माध्यमातून भूमपीकी, अवकाशीय, वर्णपटीय, माहिती अद्ययावतरीत्या उपलब्ध होते. या माहितीच्या विश्लेषणाचा वापर कृषी, जलसंपदा, नगर नियोजन, ग्रामीण विकास, हवामान, पर्यावरण, सागरी साधन संपत्ती, खनिजे इत्यादी क्षेत्रांतील नियोजन, व्यवस्थापन आणि धोरण निर्मितीमध्ये करण्यात येतो. देशातील नसíगक साधन संपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी राष्ट्रीय नसíगक साधनसंपत्ती व्यवस्थापन प्रणाली (National Natural Resources Management System NNRMS) हा उपक्रम दूरसंवेदन उपग्रहांच्या मदतीने राबविण्यात येत आहे. यामध्ये केंद्र शासन, सर्व राज्य सरकारे, खाजगी क्षेत्र, संशोधन संस्था आणि अशासकीय संस्था यांच्या सहभागातून कालसुसंगत तंत्रज्ञान आणि प्रकल्प व्यवस्थापन तंत्र यांच्या मदतीने संशोधन, सर्वेक्षण आणि व्यवस्थापनाचे कार्य करण्यात येते.

अवकाश संशोधन उपग्रह

खगोलशास्त्र, खगोल भौतिकी, ग्रहविज्ञान, भविज्ञान, हवामान विज्ञान आणि सद्धांतिक भौतिकी या विषयांमधील संशोधन हाही इस्रोच्या कार्याचा भाग आहे. या क्षेत्रातील मूलभूत व तंत्रज्ञानविषयक संशोधनासाठी वाहिलेली तीन अभियाने इस्रोकडून प्रक्षेपित करण्यात आली आहेत. क्ष-किरण, दृश्य व अतिनील वर्णपट्टय़ातील अवकाशीय स्रोतांचा अभ्यास करण्यासाठी अ‍ॅस्ट्रोसॉट उपग्रह २८ सप्टेंबर २०१५ रोजी प्रक्षेपित करण्यात आला आहे. इस्रोचे पहिले आंतरग्रहीय अभियान (Interplanetary Mission) मंगळयान ५ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रक्षेपित करण्यात आले. चंद्रयान १, २२ ऑक्टोबर २००८ रोजी प्रक्षेपित करण्यात आले असून चंद्रावर पाणी असल्याबाबतचे पुरावे या यानाकडून प्राप्त झाले आहेत.

शिक्षण संस्थेचे उपग्रह

शिक्षण संस्था / विद्यापीठे यांना उपग्रह विज्ञानामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी इस्रोकडून वेगवेगळ्या पद्धतीची मदत, मार्गदर्शन उपलब्ध करण्यात येते आणि योग्य उपग्रहाचे प्रक्षेपणही करण्यात येते. तामिळनाडूच्या अण्णा विद्यापीठाने विकसित केलेला सूक्ष्म उपग्रह अणुसॉट हा या प्रकल्पातील प्रक्षेपित पहिला उपग्रह या मालिकेतील नववा आणि सर्वात नवीन उपग्रह निऊसॉट तामिळनाडूच्याच नूरुल इस्लाम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून विकसित  करण्यात आला असून तो २३ मार्च २०१७ रोजी प्रक्षेपित करण्यात आला आहे.

प्रायोगिक  उपग्रह

विविध प्रकारचे तंत्रज्ञान, प्रक्षेपण, उपग्रह, कार्यप्रणाली यांची चाचणी करण्यासाठी इस्रोकडून प्रायोगिक उपग्रहही प्रक्षेपित करण्यात येतात. भारताचा सर्वात पहिला उपग्रह आर्यभट्ट हा प्रायोगिक उपग्रहच होता. त्यानंतर इस्रोने RTP, रोहिणी, युथसॉट, APPLE हे एकूण सहा प्रायोगिक उपग्रह प्रक्षेपित केले. सन २०१७ मध्ये INS1A आणि INS1B हे दोन उपग्रह १५ फेब्रुवारी रोजी प्रक्षेपित करण्यात आले आहेत. इस्रोकडून प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या उपग्रहांबाबत आतापर्यंत चर्चा करण्यात आली. हे उपग्रह ज्या प्रक्षेपकांच्या साहाय्याने अवकाशात पाठविण्यात आले त्यांची परीक्षोपयोगी चर्चा पुढील लेखांमध्ये करण्यात येईल.

First Published on September 8, 2017 2:36 am

Web Title: space research study mpsc exam