20 February 2019

News Flash

यूपीएससीची तयारी : ‘केस स्टडी’ सोडवताना..

केस स्टडीज सोडवत असताना विविध टप्प्यांचा वापर करून उत्तर लिहिता येते

केस स्टडीज सोडवत असताना विविध टप्प्यांचा वापर करून उत्तर लिहिता येते. खाली दिलेले टप्पे आणि विविध प्रश्न यांचा वापर करत केस स्टडीजचे उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करावा.

१)नतिक प्रश्न/द्विधा ओळखणे (Recongnize an Ethical Issue)

– हा निर्णय किंवा ही परिस्थिती एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या गटाला अपायकारक ठरू शकेल का? हा निर्णय चांगल्या किंवा वाईट पर्यायी निवडींना समाविष्ट करणारा आहे का? किंवा कदाचित दोन ‘चांगल्या’मधील किंवा दोन ‘वाईट’मधील पर्यायांची निवड समाविष्ट करणारा आहे का?

-निर्णय कायदेशीर आहे का? तसेच इतर पर्यायांपेक्षा जास्त कार्यक्षम आहे का? माझ्यासमोर असलेल्या निवडीच्या पर्यायांमधील कोणते घटक मला अस्वस्थ करतात का?

२)वस्तुस्थिती जाणून घ्या (Get The Facts) –

 • परिस्थितीशी संबंधित काय वस्तुस्थिती आहे? अजून कोणती तथ्य/वस्तुस्थिती माहीत नाही? या परिस्थितीविषयी मी अजून काही शिकू शकतो का? माझ्याकडे एखादा निर्णय घेण्याकरिता लागणारी माहिती पुरेशी आहे का? (एखादा निर्णय घेण्यासाठी मला पुरेसे माहीत आहे का?)
 • परिणामामध्ये व्यक्तींची आणि गटांची महत्त्वाची भूमिका काय असेल? काही काळजी करण्यासारखे अधिक महत्त्वाचे आहे का? असेल तर का?
 • अंमलबजावणी करण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत? संबंधित सर्व व्यक्तींशी आणि गटांशी विचारविनिमय केला का? सर्जनशील/निर्मितीक्षम पर्यायांना मी ओळखले आहे का?

३) पर्यायांचे मूल्यमापन करा (Evaluate Alternative Actions)

– खालील प्रश्न विचारून पर्यायांचा विचार करा.

 • कोणता पर्याय जास्तीत जास्त चांगली परिणती देईल आणि कमीत कमी अपायकारक असेल? (The Utilitarian Approach / उपयुक्ततावादी दृष्टिकोन)
 • निर्णयात सामील असलेल्या सर्वाच्या हक्कांना न्याय देऊ शकेल असा कोणता पर्याय आहे? (हक्काधिष्ठित दृष्टिकोन/ Rights Approach)
 • कोणता पर्याय लोकांना समानतेने किंवा प्रमाणशीर रीतीने वागणूक देऊ शकतो? (न्यायाधिष्ठित दृष्टिकोन/ Justice Approach)
 • कोणता पर्याय फक्त समाजाच्या काही घटकांना नव्हे तर संपूर्णपणे समाजाला सर्वाधिक उपयोगी पडेल? (समानहित दृष्टिकोन/ Common Good Approach)
 • मला जे बनायचे आहे त्याच्या काहीसा जवळ घेऊन जाणारा निर्णय कोणता असेल? (सद्गुणाधिष्ठित दृष्टिकोन / The Virtue Approach)

४)निर्णय घ्या आणि परीक्षण करा  (Make a decision and test it)

वरील सर्व दृष्टिकोन लक्षात घेता, कोणता पर्याय दिलेल्या परिस्थितीत सर्वाधिक योग्य असेल? अशी योग्य-अयोग्यता ठरवण्यासाठी कोणत्या निकषांचा विचार करता येईल?

खालील दिलेल्या ‘चाचण्या’ योग्य-अयोग्यता ठरवण्यासाठी मदत करतील.

समर्थनीयता चाचणी – पर्यायी निवडीपेक्षा ही निवड कमी नुकसान/अपाय करणारी आहे का?

संरक्षणीय चाचणी – नियामक मंडळाच्या चौकशीपुढे किंवा विभागीय समितीपुढे मी घेतलेला/निवडलेल्या पर्यायाचे समर्थन करू शकेल का?

सहकारी चाचणी – माझी अडचण आणि त्यावर सुचविलेला उपाय हे जेव्हा माझ्या सहकाऱ्यांना वर्णन करून सांगेन, तेव्हा याबाबत त्यांचं म्हणणं काय असेल?

अनुभविक/उच्च व्यावसायिक

चाचणी – माझ्या व्यवसायातील नियामक मंडळ किंवा नतिक समिती यांचे, मी निवडलेल्या पर्यायांविषयी काय म्हणणे असेल?

संघटन चाचणी – या निर्णयाविषयी विभागाच्या नीतिशास्त्राचे अधिकारी/किंवा कायदेविषयक उपदेशक यांचे म्हणणे काय असेल?

५) कृती करा आणि परिणामांचे मूल्यमापन करा (Act and reflect on the outcomes)

 • मी घेतलेल्या निर्णयाची जास्तीत जास्त काळजीपूर्वक अंमलबजावणी कशी होईल.
 • माझा निर्णय कशा प्रकारे स्वीकारला जाईल? आणि या नेमक्या परिस्थितीतून मी काय शिकले?
 • अशा प्रकारचा निर्णय भविष्यात मला किंवा दुसऱ्या अधिकाऱ्याला पुन्हा घ्यायची वेळ आली तर त्या परिस्थितीत कोणती खबरदारी घेणे शक्य आहे याचा विचार करा. असा निर्णय घेताना निर्माण झालेला पेच किंवा नतिक द्विधा पुन्हा निर्माण होणार नाही यासाठी काही उपाय सुचविणे शक्य आहे का याचा विचार करा. नतिक द्विधेची परिस्थिती कुणालाच आवडत नाही. म्हणूनच अशा प्रसंगी पाळता येतील किंवा विचारात घेता येतील अशा सूचनांची किंवा नियमांची यादी करणे शक्य आहे का? एकंदरीतच नतिक द्विधेत असताना घ्यायचे निर्णय अधिक सुलभ करण्यासाठी कोणते धोरणात्मक बदल संघटनेच्या पातळीवर राबविता येतात का याचा जरूर विचार करावा व त्यासंबंधीच्या लिखाणाने अशा प्रश्नांचा समारोप करावा.

प्रस्तुत लेखकांनी नीतिशास्त्र, सचोटी आणि नसíगक क्षमताया पुस्तकाचे लेखन केले आहे.

First Published on February 8, 2018 1:26 am

Web Title: upsc exam case study