28 September 2020

News Flash

ठेवा विचारांचे अवधान..

आनंदाचा नेमका अर्थ आपल्या लक्षात येत नाही. महागडी गाडी घेणं म्हणजे आनंद असे आपल्याला वाटते. पण याच चाळीस लाखांच्या गाडीत बसून असेही होऊ शकते की

| February 14, 2014 10:02 am

आनंदाचा नेमका अर्थ आपल्या लक्षात येत नाही. महागडी गाडी घेणं म्हणजे आनंद असे आपल्याला वाटते. पण याच चाळीस लाखांच्या गाडीत बसून असेही होऊ शकते की कधी कधी आपण खूप बेचन असू, खूप दु:खी असू, कधी कधी तर आत्महत्येचा विचारही मनात प्रवेश करून जाईल. याचा अर्थ माझ्या आयुष्यातील समस्यांची उकल करण्याची क्षमता तर या गाडीमध्ये नाही. म्हणजेच गाडी आपणास आराम देऊ शकते, आनंद नाही.
प्रत्येकाची हीच इच्छा असते की, माझ्यामुळे कुणी दु:खी होऊ नये. सर्वाना आनंद मिळावा. पण आपण कितीही प्रयत्न केले, तरी अनेकदा समोरची व्यक्ती नाखूश राहू शकते. यामुळे दोन गोष्टी पक्क्या ध्यानात ठेवायला हव्या की, ती व्यक्ती खूश झाली नाही तरी त्याची टोचणी मनाला लागू द्यायची नाही आणि दुसरी म्हणजे आपण असफल झाल्याची खंत वाटू द्यायची नाही. कारण ही असफलतेची भावना दु:खाच्या, निराशेच्या जवळ घेऊन जाते.
गेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे एखादी साडी वा शर्ट विकत घेतला, चांगली गाडी खरेदी केली की आपल्याला आनंद होतो. नवनवीन वस्तू खरेदी करण्याची आवड मुळातच आपल्याला असते. याचे कारण असे आहे की, आपण आपला आनंद वस्तूंमध्ये पाहतो व दुसरे म्हणजे वस्तूंचा संग्रह करण्याची वृत्ती आपल्यात एवढी बळावली आहे की आपल्याला वाटते की पशाच्या जोरावर आम्ही आनंद विकत घेऊ शकतो. समजा, एखाद्या रस्त्यावरून आपण चाललो आहोत आणि सहज बाजूच्या शोरूमकडे आपले लक्ष गेले आणि तिथे आपण छान ड्रेस बघितला किंवा एखादी गाडी बघितली. आपल्याला तो ड्रेस पाहताक्षणीच मनात भरला. आपण रस्ता ओलांडून दुसऱ्या रस्त्याला लागलो तरीही आपल्या मनात तोच ड्रेस घोळत असतो किंवा त्याच गाडीचा विचार येत असतो. असे एखाद्या चित्रपटाच्या बाबतीतही होऊ शकते. म्हणजे तो चित्रपट पाहिल्यावर किंवा त्यातील अभिनेता किंवा त्यातील पात्र, त्यांचा संवाद आपल्या मनात घर करून राहतो. यामुळे आपले मन वर्तमानात न राहता कधी कधी व्यक्तींशी, वस्तूंशी आणि परिस्थितीशी जोडले जाते. जेव्हा ती अमुक एक गोष्ट आपण विकत घेतो तेव्हाच आपल्याला चैन पडते. आपण म्हणतोही की, ही केवळ एक वस्तू नाही तर सर्व सुखसोयींनी युक्त असणारे साधन आहे. अर्थात याने आपल्याला सुखाची अनुभूती होते व आपली सोयदेखील होते. पण इथेच खरी गफलत होते. आपण सुख व सुविधा या दोहोंना एकत्र करतो आणि मग हे असेच चालू राहते. अमुक एक वस्तू घ्यायची. कारण आपली अशी ठाम समजूत असते की, जर ही वस्तू माझ्याकडे असेल तरच मला आनंद मिळेल. आपण नेहमीच असा चुकीचा समज करीत आलो आहोत.
 भौतिकदृष्टीने सुखी असणे म्हणजे खूश असणे असा याचा अर्थ होतो का? समजा, आपण मर्सिडीज कार खरेदी केली. गाडी सर्व प्रकारच्या अद्ययावत सुखसोयींनी युक्त. आधी आपण चार ते पाच लाखांचीच गाडी घेऊ असा विचार केला. पण जास्त सुखसोयींना अनुसरून मग आपण चाळीस लाखांच्या मर्सिडीजपर्यंत येऊन पोहोचलो. जेवढा दाम जास्त तेवढे कामही जास्त. माझी खुशीदेखील तेवढय़ा प्रमाणात वाढत गेली. कुठे चार लाखांची साधी गाडी आणि कुठे चाळीस लाखांची मर्सिडीज. जेवढे सुख,आराम चार लाखांची गाडी देऊन त्याच्या दहापट सुख, आराम चाळीस लाखांची गाडी देत नाही का?
नवीन वस्तू आपल्याला खूप आवडतात. त्या किती चांगल्या, उपयुक्त आहेत, याचे गुणगान करायलाही आपल्याला खूपच आवडते. आपल्यासह इतरांनीही तसेच करावे हीसुद्धा आपली अपेक्षा असते. ठीक आहे, लोक करतीलही स्तुती, पण किती वेळ? गाडीमुळे आपल्याला निश्चितच आराम मिळतो. दूरचा प्रवास बसने किंवा ट्रेनने करायचा, म्हणजे कधी उभ्यानेही प्रवास करण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. पण गाडीमुळे तर अगदी सोयीस्कर, न थकता प्रवास करू शकतो. त्यात चालकाचे ड्रायिव्हग चांगले असेल, गाडीचा एसी उत्तम काम करीत असेल, जोडीला म्युझिक सिस्टीमवर जुन्या गाण्यांच्या ओळी मंद आवाजात वातावरणात भरून राहिल्या असतील तर आपला मूडही आपसूकच चांगला होतो. या गोष्टींमुळे आपल्या शरीराला अर्थात आपल्या कानांना-डोळ्यांना आराम देतात. या वस्तू आजही आराम देतात व उद्याही त्या अशाच आराम देत राहतील. पण समजा, आपण ऑफिसातून निघालो. आपले आपल्या बॉससोबत कुठल्यातरी गोष्टीवरून बिनसले आणि आताही आपण याच चाळीस लाखांच्या गाडीत येऊन बसलात. पण आता तुम्ही आरामाचा अनुभव करू शकता का? नाही. म्हणजे गाडी आरामदायी नाही असा होत नाही, तर आता अस्वस्थ विचारांची न थांबणारी प्रक्रिया आता चालू झाली आहे. याच चाळीस लाखांच्या गाडीत बसून असेही होऊ शकते की कधी कधी आपण खूप बेचन असू, खूप दु:खी असू, खूप अशांत असू, कधी कधी तर आत्महत्येचा विचारही मनात प्रवेश करून जाईल. आता या गाडीकडे तर ती क्षमता नाही ना माझ्या आयुष्यातील समस्यांवर उकल काढण्याची. म्हणजेच गाडी आपणास आराम देऊ शकते, आनंद नाही.
आता जेव्हा आपण नवीन गाडी घेतली होती तो दिवस आठवा. तेव्हा घरातील सगळेजण किती आनंदात होतो, पण किती दिवस? एक महिना, दोन महिने? त्याच्यानंतर जशा इतर गोष्टी आपल्या घरात पडलेल्या असतात तशाच प्रकारे हीदेखील वस्तू होऊन जाते. पुन्हा तेच आयुष्य, त्याच दिनचर्या, सर्व काही तेच. मग पुन्हा असा विचार आपण करू लागतो की, आता अशी कुठली गोष्ट घेऊ या ज्याने आम्हाला आनंद मिळेल? आपल्याला शांती-सुख मिळावे यासाठी आपण काहीही करायला तयार असतो.
कौटुंबिक नातेसंबंधातील ताणतणाव, परिस्थितीमुळे येणारे चढउतार व या सर्वाबरोबर आपल्या स्वभावातील काही उणिवा माहीत असूनही आपण त्या तशाच कवटाळत पुढे जात राहिलो आणि वर म्हणतो, मी काय करू ज्याच्यामुळे मला आनंद मिळेल. आपण अशा किती तरी नवीन गाडय़ा विकत घेऊ? किती नवीन दूरचित्रवाणी संच विकता घेऊ? किती वेळा नवीन मोबाइल फोन विकत घेऊ? कधी कधी तर यामुळे वेगळीच वृत्ती तयार होते. त्याच्याकडे जो मोबाइल फोन आहे तो माझ्याकडे नाही हा विचार द्वेष, मत्सर अशा सगळ्या चुकीच्या भावनांना जन्म देतो. आपण तरीही शरीराचा विचार करतो, वस्तूंचा विचार करतो, पण मनाचा विचार?
प्रसारमाध्यमांकडे तर आपल्या भावनांना हात घालण्याचा हातखंडा असतो. जाहिरातींमध्ये असे दाखवले जाते की जेव्हा तुम्ही ही वस्तू खरेदी कराल तेव्हा तुमची पत्नी तुमच्यावर खूश होईल, मुले खूश होतील, कोणी तुमच्यावर नाराज असेल तर तोदेखील राजी होईल. मग आपण लागलीच त्या जाहिरातींनी प्रभावित होतो व त्या वस्तूच्या खरेदी करण्याच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचतो. आपण एखादी साडी खरेदी केली. तिचा रंग आपल्याला खूपच आवडला. तुम्ही ती साडी परिधान केली तेव्हा आजूबाजूचे चार लोक म्हणालेसुद्धा, ‘साडी कुठून घेतली. खूपच छान आहे.’ हे ऐकून तुम्ही आनंदित झालात. पण लक्षात घ्या, साडीकडे तुम्हाला द्यायला काही नाही. तिला भावना नाहीत. ती तुम्हाला आनंद कसा देऊ शकेल? आता समजा, एखादी पाचवी व्यक्ती भेटली त्याने सांगितले की, तुम्हाला हा रंग शोभत नाही. थोडय़ा वेळापूर्वी याच साडीमुळे तुम्ही आनंदित झाला होतात. पण आता दुसऱ्याच्या प्रतिक्रियेमुळे तुमचा साडीबाबतचा विचार बदलला. म्हणजेच साडी भावना निर्माण करीत नाही. भावना मी निर्माण करतो-करते. हे सांगणाऱ्या महत्त्वाच्या अशा ळएअट -ळँ४ॠँ३ ऐ३्रल्ल२ अ३३्र३४ीि टीे१८.ला आपण समजून घेऊ या. अर्थात मनातले विचार, त्यामागची भावना व केलेले कर्म यामुळे त्याच प्रकारची स्मृती आपण पक्क्या करीत जातो. म्हणून म्हणावेसे वाटते, फक्त ठेवा विचारांचे अवधान..
(प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या ‘ओम शांती मीडिया’ या वृत्तपत्र विभागाद्वारा प्रकाशित झालेल्या प्रवचनांचा मराठी अनुवाद )

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 10:02 am

Web Title: bodhivruksha be thoughtful
टॅग Chaturang
Next Stories
1 जोंधळय़ाला चांदणं लगडून आलं..
2 प्रगल्भता प्रेमातली
3 जीवनाची समग्रता
Just Now!
X