News Flash

ब्रोकोली

कॉलिफ्लॉवरसारखी दिसणारी ही भाजी हिरव्या रंगाची असते. कोबी फ्लॉवरच्या जातीतल्या या भाजीत भरपूर सी विटॅमिन, कॅल्शियम, लोह, फायबर असतं,

| January 10, 2015 01:01 am

कॉलिफ्लॉवरसारखी दिसणारी ही भाजी हिरव्या रंगाची असते. कोबी फ्लॉवरच्या जातीतल्या या भाजीत भरपूर सी विटॅमिन, कॅल्शियम, लोह, फायबर असतं, अ‍ॅन्टी एजिंग-अ‍ॅन्टी-बॅक्टीरिअल गुणधर्म असलेली ही भाजी पटकन शिजते, नूडल्स, सूप यामध्ये वापरतात. ब्रोकोली सूप प्रसिद्ध आहे.
ब्रोकोली पचडी
साहित्य: ब्रोकोलीच्या दांडय़ासकट किसलेला कीस दोन वाटय़ा, अर्धी वाटी किसलेलं गाजर, अर्धी वाटी चण्याची डाळ (मुगाची डाळही चालेल), एका हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे, चवीला मीठ, साखर, फोडणीसाठी एक मोठा चमचा तेल, मोहरी-हिंग-हळद, दोन तीन चमचे लिंबाचा रस, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती: चण्याची डाळ दोन तास भिजत घालावी आणि धुऊन भरड वाटून घ्यावी. ब्रोकोलीचा कीस, गाजराचा कीस, वाटलेली डाळ, चवीला मीठ, साखर एकत्र करावं. तेलाची मोहरी-हिंग-हळदीची फोडणी करावी. त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून परतावे. पचडीवर फोडणी घालून लिंबाचा रस मिसळावा, तसंच कोथिंबीर घालावी.
तयार झाली ब्रोकोलीची पौष्टि पचडी तयार.
* फोडणीत हिरव्या मिरचीऐवजी लाल सुकी मिरची किंवा तळणीची एक मिरची चुरडून घातली तर वेगळा स्वाद येईल.
* डाळ घालायची नसल्यास भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालावं.
वसुंधरा पर्वते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 1:01 am

Web Title: broccoli
टॅग : Food Recipes
Next Stories
1 टोफू
Just Now!
X