इतर भाज्यांच्या तुलनेत स्वस्त तशीच टिकाऊ, वर्षभर उपलब्ध असणारी आणि जगभरात वापरली जाणारी कोबी अनेक गुणांनी समृद्ध आहे. कोबीत जीवनसत्त्व ‘के’ आहेच, सोबत ‘क’, ‘ब६’, ‘ब१’ जीवनसत्त्वांचा साठा असून पोटॅशियम, मँगेनीज आणि कॉपरही आहे.
कोबी कच्ची किंवा कमी शिजवून खाल्ली तर ती जास्त गुणकारी ठरते. फॅट कमी, कोलेस्टेरॉल नाही, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अवश्य खावी. कोबीत चोथाही भरपूर असतो, त्यामुळे पोटाच्या विकारांसाठी उपयुक्त.
कोबी थालीपीठ
साहित्य: दोन वाटय़ा किसलेली कोबी, प्रत्येकी अर्धी वाटी- ओटसचं पीठ, बाजरीचं पीठ, बेसन, चिरलेली कोथिंबीर, १ मोठा चमचा तीळ, प्रत्येकी १ चमचा चिंचेचा कोळ, धणे, जिरे पावडर, लाल तिखट आणि बडीशेपेची पावडर, मीठ तेल.
कृती: दोन चमचे गरम तेल आणि इतर सर्व जिन्नस एकत्र करावे, लागल्यास पाण्याचा हात लावावा आणि तव्यावर तेल सोडून थालीपिठं लावावीत. झटपट होतात व पौष्टिकही असतात.
वसुंधरा पर्वते -vgparvate@yahoo.com
संग्रहित लेख, दिनांक 8th Aug 2015 रोजी प्रकाशित
कोबी
इतर भाज्यांच्या तुलनेत स्वस्त तशीच टिकाऊ, वर्षभर उपलब्ध असणारी आणि जगभरात वापरली जाणारी कोबी अनेक गुणांनी समृद्ध आहे.

First published on: 08-08-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व अन्नसंकर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cabbage