वय वाढणे आणि परिपक्वता हे शब्द समानार्थी म्हणून वापरता येतील का? नाही, कारण वय वाढणे ही केवळ भौतिक घटना आहे, तर परिपक्वता ही मानसिक आहे. ज्या वेळी आपल्याला येणारे अनुभव आपण सजगतेच्या पातळीवर अनुभवतो अथवा त्यांची अनुभूती घेतो, तेव्हाच आपण ज्ञानमार्गाचे वाटसरू होतो. याउलट येणाऱ्या अनुभवांमध्ये ‘जाणिवेची  जाणीव’ नसेल तर केवळ वय वाढते. उदाहरण द्यायचे तर, पोळ्या करताना सजगता नसेल तर पुन:पुन्हा हात भाजतो की नाही?
     खरे ज्ञान पुस्तकातून मस्तकात व मस्तकातून हृदयात उतरले तरच त्याचा उपायोग. खरा ज्ञानी ‘बालवत्’ असतो, म्हणजेच निष्पाप, निरागस, स्वत: आनंदी व दुसऱ्यालाही आनंदी करणारा. पण ही निरागसता लहान मुलाप्रमाणे अज्ञानातून आलेली नसते. जगाचे टक्केटोणपे-बरे, वाईट अनुभव घेऊनही खरी ज्ञानी व्यक्ती आपली निष्पापवृत्ती, निरागसता कायम राखण्यात यशस्वी होते. याचे कारण ‘जगण्यातली सजगता’ अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेशाच्या पलीकडे घेऊन जाते.
मनगटांना आराम
 आज आपण मनगटाचे सांधे सहजगतीने गोलाकार फिरवून घेऊ या. बठक स्थितीतील सुखावह अवस्था घ्या. पाठकणा समस्थितीत असू द्या. अंगठा आत घेऊन दोन्ही पंजांची मूठ करा. आता सावकाशपणे मूठ मनगटाभोवती फिरवा. हात कोपरात सरळ असू दे. घडय़ाळाच्या काटय़ाच्या दिशेने व विरुद्ध दिशेने मुठी चक्राकार फिरवा.
     श्वासावर आधारित ही क्रिया करताना श्वास घेत अर्धवर्तुळ व श्वास सोडत उरलेले अर्धवर्तुळ करीत कृती पूर्ण करावी. साधारण ५ ते १० वेळा कृती करावी.
आनंदाची निवृत्ती: .. आणि मी चपात्या करू लागलो
निवृत्तीनंतर अडुसष्टाव्या वर्षी एक नवीन कला शिकण्याची वेळ आली, पण मी डगमगलो नाही, उलट सर्वशक्तीनिशी संकटाचा सामना केला. त्याच ‘संकटा’ची ही कथा. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी नोकरीतील बदलीमुळे कुटुंबापासून दूर तीही एकटय़ाने राहण्याची वेळ आली होती. मदत म्हणून पत्नीने डाळभाताचा कुकर आणि फोडणी घालण्याचे प्रशिक्षण दिले होते, त्यावर दिवस निभावूनही गेले.
 निवृत्तीनंतर काही कारणाने परत मला एकटय़ाने एका ठिकाणी राहण्याची वेळ आली. मग काय घरपोच खाणावळीचा मासिक डबा लावला, पण ऐन दिवाळीच्या आठ दिवस अगोदर डबेवाल्या बाई गंभीर आजाराने दवाखान्यात दाखल झाल्या. अन् माझी पंचाईत झाली. डबा बंद झाला आणि मधुमेहामुळे भात बंद, त्यामुळे कुकर लावण्याचा पर्याय बाद. भरीस भर म्हणून इतरही काही पथ्ये मागे लागलेली. काय करावे? हॉटेलातून पोळी भाजी २-३ दिवस आणली, पण कडक आणि कच्च्या पोळय़ा घशाखाली उतरेनात. तेव्हा मात्र माझ्यातला बल्लवाचार्य जागा झाला. तसा बराचसा स्वयंपाक येतो, पण पोळय़ा काही जमत नव्हत्या. गावातच दूर राहणाऱ्या बहिणीकडे जाऊन प्रात्यक्षिक पाहिले व घरी पीठ आणून मळण्यास सुरुवात केली. पण तो प्रयोगच होता, कारण नेमकं किती पाणी घालायचं याचा अंदाज नव्हता. पीठ हाताला चिटकून बसू लागलं. कसं तरी करून कणिक तिंबली खरी पण जेव्हा पोळी लाटायला घेतली तर पोळपाटाला चिकटली. उलथन्याने उचलली तर अर्धी तुटून पोळपाटाला चिकटली. तशीच अर्धीमुर्धी पोळी तव्यावर टाकली तर तीही तव्याला चिकटली. निघता निघेना. खाली गॅस ढणढणा पेटलेला. पोळीच्या हिंदुस्थानाचा तुटलेला पाकिस्तानी भाग करपून जळत चाललेला. कसा तरी खरवडून काढला. पोळीचा आकार गोल की अ‍ॅटलास होतोय याची पर्वा नव्हती, फक्त खाता आली पाहिजे इतकी एकच अट स्वत:ला घातलेली. पुन्हा गॅस बंद करून बहिणीकडून फोनवर सल्ला घेतला व पुढे प्रयत्न चालू ठेवले.
  कणकेत तेल-मीठ घातले. सरावाने पोळीही जरा बरी लाटता येऊ लागली. आता तव्यावर भाजण्याच्या प्रक्रियेत मास्टरी आली पाहिजे, यासाठी चंगच बांधला. किती वेळ भाजायची, किती वेळा उलटायची याची सविस्तर माहिती घेतली. बहीण म्हणे, फुगायला ती लागल्यावर उलटायची. पण प्रत्यक्षात फुगा काही येईना, पोळी कडक होत चालली. तशीच उलटवली. पुन्हा दुसऱ्या बाजूने भाजणे सुरू, पण किती वेळ हे विचारलेच नव्हते. दोन मिनिटाने पोळी तव्यावरून उतरवली. लगोलग बाकीच्या चार तशाच केल्या. स्वत: केलेल्या भाजी-पोळय़ांचा समाचार अध्र्या तासाने घ्यायला बसलो. पोळीचा तुकडा तोंडात टाकला पण चावता चावेना. सावरकरांची आठवण झाली. कैद अन् तुरुंगवास काय असतो याची प्रचीती मिळाली. पोळी एकदम कडक, ना भाकरी ना रोटी. दुसऱ्या दिवशी वाळलेल्या पोळीविषयी काय सांगू, पोळी आहे म्हणून सुखी की सुख्खी रोटी खातोय असे म्हणायची वेळ आली. सपाटून भूक लागलेली, घरी एकटाच. दुपारचे दोन वाजत आलेले आणि बाहेर हॉटेलात जायचे जिवावर आलेले. बाहेर लोकांची दिवाळी चाललेली, पण मी तशाही परिस्थितीत ‘लोहे के चने चबाने का’ आनंद घेतला आणि चक्क पाचपकी तीन पोळय़ा खाल्ल्या. नंतर सतत वेगवेगळे प्रयोग करून, बदल करून आता मला व्यवस्थित पोळय़ा करता येऊ लागल्या आहेत.  मोठ्ठा काळा डाग न पडता पोळी भाजता आली पाहिजे, ही बहिणीची अटही बहुतांशी वेळा पूर्ण होते आहे. अगदी सुगरणीसारख्या जरी नाही तरी हॉटेलपेक्षा सरस पोळय़ा आता बनवू शकतो. तेव्हा नक्की या जेवायला!     
धडपडे आजी-आजोबा: सगळ्यात वयोवृद्ध पदवीधर
२०१० मध्ये त्यांनी वयाच्या ९८ व्या वर्षांत पदार्पण केलं आणि याच वर्षी पदव्युत्तर पदवी मिळविणाऱ्या त्या जगातल्या एकमेव आजी ठरल्या. पण शिक्षण घेऊन नुसतं थांबायचं कशाला म्हणून या उत्साही आजींनी वयाच्या १०० व्या वर्षांपासून पदवी स्तरावरील वर्गासाठी साहाय्यक अध्यापक म्हणूनही काम करायला सुरुवात केलीय. आज १०३ वर्षांच्या असलेल्या अमेरिकेतील या नोला ओचस आजी सतत काही ना काही शिकणाऱ्या.
तत्पूर्वी म्हणजे वयाच्या ९६ व्या वर्षी त्या पदवीधर झाल्या आणि ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये जगातील सगळ्यात वयोवृद्ध पदवीधर म्हणून त्यांची नोंद झाली. अमेरिकेतील ‘फोर्ट हेज् स्टेट युनिव्हर्सिटी’मधून १४ मे २००७ रोजी आपली २१ वर्षीय नात अलेक्झांड्रासोबतही पदवी घेतली. या आजींना १३ नातवंडे आणि १५ पतवंडे आहेत.
१९३० साली या आजींनी कॉलेजात प्रवेश घेतला होता. मात्र वेरनॉन यांच्यासोबत लग्न झाल्यावर आजी पूर्णवेळ गृहिणी झाल्या. मात्र १०७२ साली वेरनॉन यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आजींनी पुन्हा एकदा शिक्षणाकडे मोर्चा वळवला व कॉलेज कॅम्पसच्या सगळ्यात उत्साही विद्यार्थिनी बनल्या. आजींची शिकण्याची आवड इतकी तीव्र आहे की त्या सतत कसले ना कसले शिक्षण घेतच असतात. या आजींना शेतीची विशेष आवड असल्यामुळे त्यांनी शेतकी विपणनाचेही शिक्षण घेतले आहे. आजींच्या कर्तृत्वाबद्दल २००७ साली त्यांना ‘कॅनसस वुमन लीडर ऑफ द इयर’ या पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्याची दखल घेत ‘सीबीएस न्यूज, एमएसएन बीसी’ या वाहिन्यांनी त्यांच्यावर आधारित विशेष फिचर्स प्रसारित केली होती. शिक्षण घेण्यासाठी वय आड येत नाही ते यांनी शब्दश: खरं करून दाखवलंय.
संकलन- गीतांजली राणे
१२  ९ ८ हेल्पलाइनसाठी पर्यायी क्रमांक
१५ फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध केलेला १२९८ हा हेल्पलाइन क्रमांक फक्त मुंबई, ठाणे, नवी मुंबईकरता असल्याने आमच्या अन्य शहरांतील वाचकांना त्याचा लाभ घेता आला नाही. वाचकांच्या सूचनेनुसार या हेल्पलाइनसाठी असलेला पर्यायी क्रमांक देत आहोत. ज्येष्ठ नागरिकांनी  ९०२९००००९१ या क्रमांकावर सोमवार ते शनिवार सकाळी १० ते  सायंकाळी ५ या वेळेत संपर्क साधावा.
डिग्निटी फाउंडेशन
‘डिग्निटी फाउंडेशन’ ही मुंबई, दादर येथील संस्था. ‘स्मृतिभ्रंश’ झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘केअर सेंटर’ चालवते. सोमवार ते शुक्रवार, सकाळी ११ ते ३.३० या वेळेत अशा रुग्णांना येथे सांभाळले जाते. यासह ऑक्युपेशनल थेरपीजसारख्या विविध उपचारांची सोयही येथे आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांना स्मृतिभ्रंश झाला आहे, त्यांच्या नातेवाइकांनी संस्थेला संपर्क करणे आवश्यक आहे. संपर्क साधल्यानंतर या संस्थेची गाडी सकाळी घरी येऊन रुग्णांना संस्थेत घेऊन जाते व साडेतीन वाजेनंतर पुन्हा रुग्णाला घरी आणून सोडते.
 या संस्थेचे वैशिष्टय़ म्हणजे जी फी ते आकारत त्यात फक्त जेवण व प्रवास यांचा खर्च समाविष्ट असतो. दिवसभर केले जाणारे उपक्रम व रुग्णाला दिली जाणारी थेरपी ही मोफत असते. ज्या रुग्णांची तेवढीही आíथक ऐपत नसेल अशा रुग्णांसाठी संस्थेमार्फतच ‘मदतकर्ता’ शोधून दिला जातो. ही सुविधा फक्त मुंबईतील चर्चगेट ते अंधेरी या भागापुरतीच मर्यादित आहे. १९९५ सालापासून ‘डिग्निटी फाउंडेशन’तर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवले जातात.
जोगेश्वरी सावंत-०२२-६५२५७३९१-
  मोबा.-९८२०५३८६६६
(सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेतच संपर्क करावा.)
responsedignity@gmail.com
-: वेबसाईट :-
http://www.dignityfoundation.com
खा आनंदाने: आरोग्यासाठी रंगपंचमी
वय झालंय मग शरीराच्या काही-बाही कुरबुरी चालूच राहणार हे बऱ्याच आजी-आजोबांचं प्रामाणिक मत! एका अर्थी ते बरोबरपण आहे, कारण वयपरत्वे शरीराची झीज होत असते जी नसíगक आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते जी काही प्रमाणात योग्य आहाराद्वारे आपण नक्कीच वाढवू शकतो. जेणेकरून व्हिटामिन अ, क, इतर मिळतातच जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतातच, पण लायकोपिन, झेंथिनसारखे ‘आहार-सनिक’ही मिळतात जे डोळे, त्वचा, मेंदू, हृदय, यकृत आदी अवयवांची कार्यक्षमता वाढवतात.  
म्हणूनच थोडं थोडं खा. दिवसभरात विभागून खा. कमी प्रमाणात खाणार म्हणून जे खाल ते आरोग्याच्या दृष्टीने उत्तमच पाहिजे. म्हणजे फरसाणच्या ऐवजी फुटाणे (बारीक केलेले), बिस्कीट्सच्या ऐवजी चिक्की (राजगिरा), ब्रेडच्या ऐवजी चपाती / खाकरा वगरे वगरे.
* जेवणात रंग भरा. रंगपंचमी आलीच आहे. तुमच्या आहारातही वेगळ्या रंगाच्या भाज्या-फळाची रंगपंचमी साजरी करा. विविध रंगांचे पदार्थ खाल्ल्याने आजारांशी लढण्यासाठी आपल्याला ‘आहार-सनिक ’ मिळतात. उदाहरणादाखल हे काही आहारातले विविध रंग
हिरवा रंग – पालक, मेथी, चवळी, शेंगाभाजी, मटार, मुळा-शेपूपाला, पेरू, आवळा, पुदिना, तुळस, कोिथबीर
लाल रंग – सफरचंद, आलू-बुखार, लाल माठ, लाल मुळा, गाजर, बीट, रताळे, टोमॅटो, किलगड
पिवळा / केशरी रंग – िलबू, मोसंबी, पिवळी भोपळी मिरची, आंबा, संत्र, टरबूज
जांभळा रंग – जांभूळ, करवंद
पौष्टिक भेळ –
साहित्य  – ४ चमचे उकडलेले शेंगदाणे, ४ मोठे चमचे मोड आलेले उकडलेले मूग,  ४ चमचे चिरलेला टोमॅटो, ४ चमचे चिरलेला सफरचंद, २ चमचे चिरलेली कैरी / आवळा,
हिरवी चटणी, गोड चटणी, ४ मोठे चमचे डािळबाचे दाणे, १ संत्र, १ कप कुरमुरे, ४ मोठे चमचे बारीक चिरलेली कोिथबीर, ४ मोठे चमचे िलबाचा रस, चवीनुसार मीठ, शेव.
कृती – सर्व साहित्य एकत्र करा, एकत्रित त्याचा आस्वाद घ्या आणि रंगपंचमी खऱ्या अर्थी साजरी करा.
वैदेही अमोघ नवाथे,आहारतज्ज्ञ

 

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान