01 March 2021

News Flash

जगाचं कुतूहल असलेली मी एक माणूस

प्रतिमा कुलकर्णी यांनी घेतलेली सुमित्रा भावे यांची मुलाखत ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२०’ सोहळ्याचा आकर्षणिबदू ठरली.

सुमित्रा भावे यांची मुलाखत घेताना प्रतिमा कुलकर्णी

संपदा सोवनी – chaturang@expressindia.com

प्रतिमा कुलकर्णी यांनी घेतलेली सुमित्रा भावे यांची मुलाखत ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२०’ सोहळ्याचा आकर्षणिबदू ठरली. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित     केलेले चित्रपट पाहिल्यावर ते के वळ वेगळे नाहीत, तर त्यातून मनापासून काही विचार मांडण्याचा प्रयत्न झाला असल्याचे रसिकांना जाणवतं. सुमित्रा भावे यांचं व्यक्तिमत्त्व कसं घडत गेलं, कलाकार म्हणून त्यांची विचारप्रक्रिया कशी असते, या प्रश्नांची उत्तरं या मुलाखतीतून उलगडत गेली..

प्रतिमा कुलकर्णी – ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार’ मिळाल्याबद्दल तुमचं अभिनंदनच, पण हा पुरस्कार ज्याचं फलित आहे त्या कामाबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद! चित्रपट सगळेच दिग्दर्शक देतात, पण तुम्ही त्याबरोबर काही विचार, दिशा आणि प्रेरणा दिल्यात. सामाजिक भानाचा संस्कार तुमच्यावर कसा झाला? ‘चतुरंग’ पुरवणीतल्या तुमच्या गतवर्षीच्या सदरात तुम्ही घराच्या वास्तुशांतीचा मान घर बांधणाऱ्या हातांनाच मिळायला हवा, असं म्हणणाऱ्या तुमच्या आईचा उल्लेख के ला होतात. त्याविषयी थोडं सांगा.

सुमित्रा भावे – मी आणि आईनं आमच्या घराच्या वर आणखी एक घर बांधलं. विटा आणि अंतर मोजून गवंडी आणि सुताराच्या सहाय्यानं आम्ही दोघींनी घर उभं के लं होतं. जेव्हा त्याच्या वास्तुशांतीची वेळ आली तेव्हा आई म्हणाली, की जे कामगार आपल्याबरोबर काम करत होते त्यांच्याबरोबर आपण एकत्र जेवू, तीच वास्तुशांत. अशा समृद्ध सांस्कृतिक वातावरणात मी वाढले. माझी आई तिसरी शिकलेली, पण अतिशय बुद्धिमान आणि रसिक. तर वडील ‘डबल ग्रॅज्युएट’, इंग्लिश आणि ‘लॉ’ शिकलेले. त्यांना वाचनाची प्रचंड आवड. आमचं घर हजारो पुस्तकांनी भरलेलं होतं. वडील सतत मला वाचायला सांगायचे, इंग्लिश वाचून दाखवायचे. त्यांनी आईलाही तिची स्वतंत्र लायब्ररी करून दिली होती. आईला गाण्याची, चित्रकलेची आवड होती. ती रांगोळ्यांमध्ये कधी झेब्रा, तर कधी जिराफ काढे. सगळे हसत, की ही रांगोळी आहे का? ती म्हणत असे, की हे प्राणीही देवानंच तयार के लेत! मी जेव्हा चित्रपट करायचं ठरवलं, तेव्हा घरातून मला प्रोत्साहनच मिळालं. त्यांनी धर्म ही संकल्पना मला फार वेगळ्या प्रकारे शिकवली. आम्ही पुण्याच्या पूर्व भागात राहात असल्यामुळे विविध धर्माच्या, जातींच्या, समाजांच्या लोकांशी आमचा संपर्क  येत असे. मुस्लीम, ज्यू, ख्रिश्चन, तमिळी असे सर्व लोक आमच्याकडे येत. यातून या गोष्टींकडे पाहाण्याची वेगळी नजर मिळाली.

प्रतिमा कुलकर्णी – तुमच्या चित्रपटांमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची आई दिसते. त्याचं मूळ यात आहे का?

सुमित्रा भावे – मला मातृत्व ही संकल्पना खूप महत्त्वाची वाटते. त्यासाठी त्या व्यक्तीनं बाळाला जन्मच दिला पाहिजे असं नव्हे. ती स्त्री असो किं वा पुरुष, त्यांनी ‘मातापण’ पोटात वागवायला हवं. त्याशिवाय कोणाशीच खरं नातं निर्माण होऊ शकत नाही. तसं नातं तयार झालं, तर संपूर्ण जगणं तुम्हाला वेगळं दिसायला लागतं. मी माझ्या नात्यात, महाविद्यालयीन जीवनात, मोठेपणी मैत्रिणींमध्येही अशा अनेक स्त्रिया पाहिल्या. त्यांचा माझ्या मनावर मोठा परिणाम झाला. अशा स्त्रियाच समाज आणि माणसं घडवतात, समाज बदलवतातही. याचं भान सर्व स्त्रियांनी आणि हे स्त्रीत्व समजणाऱ्या पुरुषांनीही ठेवलं पाहिजे.

प्रतिमा कुलकर्णी – तुम्ही तुमच्या कामात झपाटलेल्या आहात आणि तुमच्या सहकाऱ्यांनाही तुम्ही झपाटून टाकता. हे कसं करता?

सुमित्रा भावे – हे लोहचुंबकासारखं आहे. मी माझ्या सहकाऱ्यांना आणि ते मला झपाटून टाकतात. जे स्वत: झपाटलेले असतात, असेच लोक मला भेटतात. व्यावसायिक गटापेक्षा कु टुंब ही संकल्पना वेगळी असते. कु टुंबात एकमेकांसाठी त्याग करण्याची, प्रसंगी माघार घेण्याची तयारी असते. त्यात कमीपणा वाटत नाही. ही कौटुंबिकता माझ्यात यावी असं मला वाटतं. तीच आमच्या युनिटमध्ये आहे.

प्रतिमा कुलकर्णी – ‘अस्तू’ चित्रपटात लक्ष्मी रस्त्यावर हत्ती आणून चित्रीकरण करण्याचा विचारही अवघड वाटतो, पण तुम्ही हे करता. अशा कल्पना सत्यात उतरवताना तुम्हाला भीती वाटत नाही का?

सुमित्रा भावे – नाही वाटत! माझ्या डोळ्यासमोर एखादी कथा घडायला लागली, की ती अमलात आणण्यासाठी चित्रपट हे माध्यम मला फार परिणामकारक वाटतं, कारण ते जगण्याच्या प्रतिमा उभ्या करतं. मग मी त्या कथेच्या मागे लागते. लक्ष्मी रस्त्यावरून हत्ती नेण्यापेक्षाही अमृतानं (सुभाष) या चित्रपटात हत्तिणीला आंघोळ घालणं, डॉ. मोहन आगाशे आणि माहुताची लहान मुलगी यांनी हत्तीला टेकू न झोपणं या गोष्टी अधिक अवघड होत्या, पण आम्ही त्या हत्तिणीशी एक नातं जोडलं होतं. आम्ही रोज त्या हत्तिणीशी बोलत असू. या सगळ्यातून ते शक्य झालं.

प्रतिमा कुलकर्णी – ‘क्षमा’ हे आणखी एक तत्त्व तुमच्या चित्रपटांमध्ये वारंवार दिसतं, तत्त्वज्ञान दिसतं. ते पाहून तुम्ही आध्यात्मिक असाल असं वाटतं, परंतु तुमची प्रतिमा तशी नाही. तुम्ही किती आध्यात्मिक आहात? आपल्या आकलनाच्या पलीकडे काही आहे असं तुम्हाला वाटतं का?

सुमित्रा भावे – मला आध्यात्मिक या शब्दाचा अर्थ नेमका कळतो असं वाटत नाही. मी आध्यात्मिक, कलावंत, लेखिका अशा कु ठल्याच कप्प्यात स्वत:ला बसवत नाही. मी जगाचं कु तूहल असलेली एक जिवंत माणूस आहे! जग, माणसं, त्यांचे नातेसंबंध, समाज, त्या समाजाचं चलनवलन आणि निसर्ग याचं मला    कु तूहल आहे.

प्रतिमा कुलकर्णी – तुम्ही सुरुवातीपासून तुमचा एक रस्ता ठरवून त्यावरूनच मार्गक्रमण करता आहात. त्याविषयी थोडंसं सांगा.

सुमित्रा भावे – चित्रपटाच्या बाबतीत मला जे हवंय तेच मी करते. त्यासाठी वेळ, पैसा, प्रतिष्ठा घालवायला मला भीती वाटत नाही. त्यामुळे चित्रपटाचं बजेट, कलाकारांची फी, माझी फी याबद्दल मी उदासीन असते. एखाद्यानं मला म्हटलं, की मला पैसे वाढवून द्या, तर माझ्या फीमधले पैसे काढून द्यायला मी तयार असते. चित्रपट बनवताना मी पूर्ण जीव ओतून काम करते, पण मी माझ्या निर्मात्यांना असं सांगते, की चित्रपटासाठी ओतलेल्या रकमेच्या वसुलीची जबाबदारी माझ्यावर देऊ नका! असेही निर्माते मिळतात आणि एकाहून अधिक चित्रपट करायला तयार होतात याचा आनंद वाटतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2020 1:19 am

Web Title: sumitra bhave interview at loksatta durga 2020 event dd70
Next Stories
1 स्त्रीतल्या असामान्यत्वाचा कौतुक सोहळा
2 निरामय घरटं : निश्चिंत पाखरं
3 जीवन विज्ञान : अन्न पूर्णब्रह्म!
Just Now!
X