अजिंक्य कुलकर्णी – ajjukulqqx@gmail.com

स्त्री आणि पुरुष यांची मैत्री ही त्यांच्यातल्या प्रेमाची (आणि कदाचित लग्नाचीही!) पहिली पायरी असते, अशा समजुती आपण बरीच र्वष बाळगत आलो; पण स्त्री-पुरुषांच्या आवडीनिवडी, त्यांचे छंद एक असणं, हादेखील त्यांच्यातल्या मैत्रीचा पाया असू शकतो. पुढे त्यांच्यात निर्माण होणारा जिव्हाळा ही निव्र्याज मानवी भावना असूच शकते. अशा मैत्रीला विनाकारण लैंगिकतेचा पैलू जोडण्याच्या आपल्या समजुती आता ‘रिफ्रेश’ करायला हव्यात.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!
Viral wedding photoshoot of bride working out in a park in Traditional wedding lehenga netizen say her Tiger Shroff female version
“लेडी टायगर श्रॉफ!”, चक्क लग्नाच्या लेहेंग्यात नवरी करतेय व्यायाम, हटके फोटोशूट पाहून चक्रावले नेटकरी; Video एकदा बघाच

मैत्री ही स्फुलिंगासारखी असते. ती केव्हा आणि कुणासोबत प्रकट होईल ते सांगता येत नाही. कित्येकदा अनेक वर्षांच्या सहवासातही ती अप्रकटच राहील, तर काही वेळा अत्यल्प सहवास घडलेला असूनही ती प्रकट होऊन दोन व्यक्ती कायमस्वरूपी जोडल्या जाऊ शकतील. मैत्रीची आपल्या आयुष्यात अत्यंत गरज असून आपण त्याचा पुरेसा विचार के लाय का कधी? मुबलक पैसा, चांगली नोकरी नाही म्हणून हळहळणारे आपण आपल्याला पुष्कळ मित्रमैत्रिणी नाहीत म्हणून हळहळतो का कधी? पुरुष-पुरुष, स्त्री-स्त्री आणि स्त्री-पुरुष असे मैत्रीचे प्रकार. त्यातल्या तिसऱ्या प्रकाराकडे- म्हणजेच

‘स्त्री-पुरुष’ मैत्रीकडे म्हणूनच आज डोळसपणे पाहण्याची फार गरज आहे, असं मला वाटतं. आपल्या भारतीय समाजाचा सांस्कृतिक इतिहास बघता आपल्याला स्त्री-पुरुष मैत्रीकडे डोळसपणे पाहता आलेलं नाहीये. रक्ताच्या स्त्री-पुरुष नात्याच्या पलीकडे आजही आपण पाहू शकत नाही. स्त्री-पुरुष संबंधांवर सामाजिक दडपणं तर आहेतच, शिवाय त्याला लैंगिकतेचाही एक पदर आहे.

‘टिपिकल’ बॉलीवूड चित्रपटांनी स्त्री-पुरुष संबंधांकडे कधीच गंभीरपणे पाहिलेलं दिसत नाही. ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटात मोहनीश बहलच्या तोंडचं वाक्य घ्या.  तो म्हणतो, ‘‘प्रेम, एक लडका और लडकी कभी दोस्त नही होते. ये तो परदा है परदा! कपकपाती रातों में धडकते हुए दिल में भडकती हुई आग को बुझाने का, छुपाने का!’’ किंवा ‘कुछ कुछ होता हैं’मधला शाहरुखच्या तोंडचा हा संवाद, ‘‘प्यार.. प्यार दोस्ती है! अगर वो मेरी सबसे अच्छी दोस्त नहीं बन सकती, तो मैं उससे कभी प्यार करही नहीं सकता. क्योंकी दोस्ती बिना प्यार तो होताही नहीं.’’ या आणि अशा तद्दन ‘फिल्मी’ संवादांचा प्रभाव कित्येक र्वष समाजातल्या एका वर्गावर झालेला दिसतो. स्त्री-स्त्री, पुरुष-पुरुष मैत्री आपण आनंदानं स्वीकारतो; पण स्त्री-पुरुष मैत्रीचा विषय निघताच अंगावर झुरळ पडल्यासारखं आपण तो का झटकतो? या नात्याविषयी गैरसमजच जास्त असलेले अनेक जण आपल्याला अवतीभोवती दिसतात. गैरसमजांच्या चौकटी त्यांच्या डोक्यात फिट्ट बसलेल्या असतात. शास्त्रीय संशोधनानं हे कित्येक वेळा सिद्ध केलं आहे, की पुरुष-पुरुष मैत्री ही व्यवहारी असते, तर स्त्री-स्त्री मैत्री ही खूपदा भावनिक बंधानं विणलेली एक वीण असते. याचं एक शास्त्रीय कारणही आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या मेंदूमध्ये ‘ऑक्सिटोसिन’ हे संप्रेरक जास्त स्रवतं. त्यामुळेही स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत नात्यांबद्दल जास्त हळव्या असतात. याच संप्रेरकामुळे त्यांच्यात प्रेम, करुणा, माया, ममता या गुणांचा संचय होत असतो. या दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर राहूनही स्त्री-पुरुष मैत्री होऊ शकतेच.

माणसाला आपलं हक्काचं कु णी तरी असावं असं कायम वाटत असतं. असं हक्काचं जर कुणी नसेल तर आपलं बरंच संतुलन कोसळतं; पण एकदा का ते नातं तयार झालं, की अनेकदा त्यात स्वामित्वाची भावना येते आणि ती मानवी संबंधांमध्ये गुंता निर्माण करते. मात्र अशी स्वामित्वाची, एकाधिकारशाहीची भावना फक्त निखळ मैत्रीत नसते आणि ती नसावी तरच ती खरी मैत्री मानायला हवी. स्त्री-पुरुष यांच्यातल्या मैत्रीतही अशी निखळ मैत्रीची भावना दिसतेच की!  तरीही भिन्नलिंगी मैत्री म्हटलं रे म्हटलं, की लगेच आपल्या भुवया उंचावल्या जातात. त्यासाठी मला वाटतं प्रथम हा विचार करावा लागेल, की या भिन्नलिंगी मैत्रीची आपल्याला खरंच गरज आहे का? नेमकं काय मिळतं आपल्याला या मैत्रीतून? एक पुरुष म्हणून मी हे नक्की सांगू शकतो की, मुलगे हे मुलींच्या तुलनेत जास्त भावुक होत नाहीत, ते बऱ्यापैकी व्यवहारी असतात. त्यामुळे आपली  मैत्रीण भावनेच्या भरात एखादा चुकीचा निर्णय घेत असेल तर तिला थांबतात, ‘प्रॅक्टिकल’ विचार करायला लावतात. अनेकदा मुलग्यांच्या वैविध्यपूर्ण वाचनामुळे त्यांच्याशी खुलेपणानं विविध विषयांवर चर्चा करता येऊ शकते, असं मुलींना वाटतं. तर अनेकदा असंही दिसून येतं, की अशा खुलेपणा असलेल्या मित्रमैत्रिणींच्या चर्चेमुळे, तर्कावर आधारित मतांमुळे मुलग्यांची व्यसनंही सुटली आहेत. आजकाल ‘फेसबुक’सारख्या समाजमाध्यमांवर चांगलं लिहिणारं कुणी असेल, तर मुलं मुलींना किंवा मुली मुलांना

‘फ्रें ड रिक्वेस्ट’ही पाठवतात. फेसबुक पोस्टमध्ये पटणारे वा न पटणारे मुद्दे असतील तर त्यावर मनमोकळेपणानं मुलीही ‘कमेंट’ करतात. सर्वात छान अनुभव असतो, तो पुस्तक वाचणाम्ऱ्यांच्या ‘व्हॉटसअ‍ॅप ग्रुप’मध्ये. अशा जागी मुलगा-मुलगी, स्त्री-पुरुष असा कोणताच भेदभाव नसतो. तिथं असतं निव्वळ ‘शेअरिंग’; नवीन काय वाचलं, ऐकलं, पाहिलं याबद्दलचं. अशा वेगळ्या पातळीवरचं मैत्रही नक्कीच जोपासता येऊ शकतं.

हे सर्व जरी असलं, तरी स्त्री-पुरुषांच्या मैत्रीत जरा मोकळेपणा आला, की सर्वात प्रथम त्यांच्यावर ‘बोल्ड’, ‘बिनधास्त’ असे शिक्के मारले जातात. हे ‘बोल्ड’ असणं सामाजिक, धार्मिक संदर्भात नव्हे, तर केवळ लैंगिक संदर्भातच गृहीत धरलं जातं. अनेकदा सामाजिक कार्य करणारे स्त्री-पुरुष कार्यकर्ते एखाद्या संस्थेच्या अंतर्गत एकत्र काम करतात. या चळवळीत त्यांच्या विचारांची देवाणघेवाण वाढते, चळवळीच्या कामानिमित्त दौरे करावे लागतात, एकत्र काम करावं लागतं, एकत्र खाणंपिणं होतं, विचारांची देवाणघेवाण होते. त्यांची तरंगलांबी जुळली की त्यांच्यात कायमस्वरूपी मैत्री होते. असाच अनुभव नाटक-चित्रपटांत काम करणाऱ्या कलावंतांच्या बाबतीतही पाहायला मिळतो. नाटक-चित्रपटांच्या तालमी सुरू होण्याअगोदर ही मंडळी एकमेकांना फारशी ओळखतही नसतात. नाटकाच्या प्रयोगाच्या दौऱ्यामुळे, नाटकात रंगमंचावर एकत्र वावरायला मिळाल्यानं त्यांच्यात मैत्री होते. पुढे वारंवार नाटक-चित्रपटांत एकत्र आल्यानं ही मैत्री अधिकाधिक वाढते. माझ्या पुण्यातल्या एका मैत्रिणीचा एक बोलका अनुभव आहे. ती नाटकात काम करते. एकदा तिला आणि तिच्या आईला काही अपरिहार्य कारणास्तव घर सोडावं लागलं होतं. तिच्या नाटकात काम करणाऱ्या एका मित्रानं त्या दोघींना आपल्या घरी आश्रय दिला. रात्री-अपरात्री जर तालमीला उशीर झाला तर तिला हे मित्र घरी सोडायला जात असत. मुलींना सोडायला जायचं म्हटलं, की सुरुवातीला सर्व जण तयार होतात; पण नंतर इतक्या दूर सोडायला कोण जाणार म्हणून टाळाटाळही करतात. मात्र या मैत्रिणीचे मित्र कितीही उशीर झाला तरी तक्रार किंवा बहाणे करत नव्हती. आपली एक मैत्रीण सुरक्षित घरी जाते आहे, हीच भावना असायची

आपल्याकडे वर्षांनुर्वष स्त्री-पुरुष नातं हे गृहीतकांवर आधारित आहे. एखाद्या स्त्री-पुरुषात मैत्री असेल तर ती मैत्री म्हणजे एक पायरी समजली जाते, त्या दोघांचं भविष्यात लग्न होईल याची! समाजात हे गृहीतच धरलं जातं, अगदी आजही. ‘फ्रेंडस् विथ बेनिफिट्स’ आणि ‘नो स्ट्रिंग्ज अटॅच्ड’ हे दोन चित्रपट त्याचं उत्तम उदाहरण. यातले नायक-नायिका ‘आमच्यात फक्त मैत्री आहे ! ’ हे दाखवण्यासाठी झटत असतात; पण सरतेशेवटी प्रेम जिंकतं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं. तेच घडणं आपल्या समाजात अपेक्षित असतं; पण आता काळाप्रमाणे मैत्रीला कोणत्या तरी नात्याचं रूप देणं टाळायला हवं, कारण समाजात स्त्री-पुरुष बरोबरीनं वावरू लागले आहेत. प्रत्येक पावलावर ते एकमेकांना भेटत असतात. अशा वेळी स्त्री-पुरुष या लिंगभेदाच्या पलीकडे जाणं अपरिहार्य असतं. समाजात वावरत असताना एक माणूस म्हणून तुम्ही एकत्र येता आणि पुढे एखाद्याशी तुमचे सूर जुळले तर तुमची छान मैत्रीही होऊ शकते.

ओहायो विद्यापीठातले संशोधक प्रा. डॉ. विल रॉलींस यांनी केलेल्या एका अभ्यासात ते म्हणतात, की मैत्री ही ऐच्छिक, दोन्ही बाजूनं समान असते, त्यात कोणतीही उतरंड नसते. मैत्रीत स्त्री-पुरुष दोघांचाही सहभाग, गुंतवणूक समान असते. स्त्रियांचा भावनांचं प्रकटीकरण करण्याकडे कल जास्त असतो. त्या तुलनेत पुरुष स्वत:ला कमी प्रकट करतात. त्यामुळे आता वेळ आली आहे, की आपल्यामधल्या समजुतींच्या यंत्राचं ‘रिफ्रेश’ बटण दाबण्याची. ज्यामुळे स्त्री-पुरुष निखळ मैत्री असते याची पुन्हा नव्यानं सुरुवात होईल. जिव्हाळा, आत्मीयता ही काही लैंगिक किंवा सांस्कृतिक गोष्ट नाही, ती मानवी गोष्ट आहे.

स्त्री-पुरुष मैत्रीबद्दलच्या संकुचित कल्पनांचा कचरा आपल्याला जर काढायचा असेल तर, सर्वप्रथम स्वत:च्या आत बघावं लागेल आणि आपले मैत्रीबद्दलचे आदर्श कोण आहेत आणि का, हे तपासावं लागेल. दुसम्ऱ्यांच्या मैत्रीबद्दल (स्त्री-पुरुष) मत तयार करण्याआधी काळजीपूर्वक विचार करावा लागेल. आपल्या मुलांना हे समजावून द्यावं लागेल, की मुलं-मुली यांची निखळ मैत्री असू शकते, त्यांच्यात मैत्री होण्यामागे त्यांचे छंद, त्यांच्या आवडीनिवडी सारख्या असणं हेही एक कारण असू शकतं. तर मग याबद्दलची समज ‘रिफ्रेश’ करूयात का?

मैत्र जीवाचे! 

वाचक हो, तुमचा काय अनुभव आहे या िंलंगभेदापलीकडच्या मैत्रीचा? तुम्हाला टिकवता आली आहे का अशी स्त्री-पुरुष मैत्री ? आम्हाला कळवा २०० शब्दांत तुमच्यातल्या निखळ मैत्रीचे किस्से किं वा गमावलेल्या मैत्रीचे अनुभव (१५ ऑगस्टपर्यंतच). आमचा ईमेल- chaturangnew@gmail.com मोह, शारीरिक आकर्षणापलीकडे प्रेम, स्नेह, जिव्हाळा, काळजी, ममत्व, निरपेक्ष, निव्र्याज,मैत्र असू शकतं का मैत्रीत?  मैत्रीतला मोकळेपणा तुम्हाला अनुभवता आलाय, की लपवाछपवीत, संशयाच्या परिघातच तुमची मैत्री घुसमटत राहिली? ‘मैत्र जीवाचे’चा साक्षात्कारी अनुभव तुम्ही घेतला असेल तर जरूर कळवा.