06 August 2020

News Flash

लाकडी पेटय़ा व पॅलेट्सची किमया

लाकडाच्या वखारीत, भाजी मंडईत, फळांच्या दुकानात किंवा आंब्याच्या मोसमात लाकडाच्या पेटय़ा सहज उपलब्ध होतात.

| June 20, 2015 12:10 pm

लाकडाच्या वखारीत, भाजी मंडईत, फळांच्या दुकानात किंवा आंब्याच्या मोसमात लाकडाच्या पेटय़ा सहज उपलब्ध होतात. काही उंचीने अधिक असल्यामुळे झाडांच्या मुळांना पुरेसा खोलगटपणा मिळतो. या लाकडाच्या पेटय़ांना आतून-बाहेरून प्लॅस्टिकचे कापड किंवा नायलॉनच्या साडीचे आवरण द्यावे म्हणजे त्यातील माती वाहून जात नाही. या पेटय़ा बऱ्यापकी टिकतात. यात प्रामुख्याने मुळा, बीट, रताळी, गाजर अशा कंदवर्गीय भाज्यांचे उत्पादन घेता येते. ही खोकी लोखंडी मांडणीत झिक झ्ॉक पद्धतीने मांडणी केल्यास उत्तम. बाजारातील प्लॅस्टिक क्रेट्स हादेखील भाज्या घेण्यासाठी उत्तम पर्याय आहे. cr07
तसेच व्हर्टिकल गार्डन साकारण्यासाठी लाकडाच्या पॅलेट्सचा वापर मोठय़ा प्रमाणावर होतो. मुख्यत्वे बागेचे सुशोभीकरण करणारी फुलझाडे, आकर्षक रंगीत पानांची झुडपे लावण्यासाठी ही पॅलेट्स वापरण्यात येत असली तरी घरच्या घरी पालेभाज्या घेण्यासाठीही यांचा उत्तम वापर करता येतो. फक्त त्यासाठी पॅलेट्स आडव्या रूपात वापरावी लागतात. हे पॅलेट्स एकमेकांना जोडून त्यांची मांडणी केल्यास त्यावर छोटय़ा कुंडय़ा किंवा प्लॅस्टिकच्या बॅग्स ठेवता येतात. या पॅलेट्समध्ये हवा खेळती असल्यामुळे रोपांची वाढ चांगली होते. फक्त रोपे ओळीने लावण्याची गरज असते.
संदीप चव्हाण -sandeepkchavan79@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2015 12:10 pm

Web Title: wooden boxes usage in garden at gallery
Next Stories
1 अन्नसंकर – तोंडली
2 करून बघावे असे काही
3 कणकण गेला उजळुन..
Just Now!
X