म्हातारपण हे दुसरे बालपण असते, असे म्हणतात. परंतु हे बालपण हट्टीपणा, दुराग्रहीपणा, अननुभव या बालसुलभ गुणांशी जोडले न जाता लहानपणीच्या निरागस निष्पाप आनंदाशी कसे जोडले जाईल हे पाहाणे आवश्यक आहे. लहान मुलांचा एक गुण म्हणजे ‘संपूर्णता.’ मुले जे काही करतात, त्यामध्ये ती स्वतला पूर्णपणे झोकून देतात. ज्या क्षणी एखाद्या खेळात ती रममाण झालेली असतात, त्या क्षणी ती स्वतला विसरतात. भूतकाळ-भविष्यकाळ, आशा-निराशा हे विचारही त्यांच्या मनाला शिवत नाहीत, कारण बऱ्या-वाईट अनुभवाचे गाठोडे त्यांच्यापाशी नसते. या अनुभवाचे गाठोडे बरोबर असूनही आपण आपले बाल्य जपणे म्हणजे बालवत् होणे. असे केल्याने आपल्या ऊर्जेचा अनावश्यक व्यय टाळला जातो. वर्तमानकाळात जगून आयुष्याचा आनंद अधिक चांगल्या रीतीने घेता येतो. आपली भूमिका पार पाडीत असताना फक्त अ‍ॅक्टिंग होते- रिअ‍ॅक्टिंग कमी होते. आयुष्य दर्जेदार होते.
केहुनि नमन
  वर्तमानाप्रती जागरूक होत आज पुढची साधना करू या.  ‘केहुनि नमन’ या कृतीद्वारा आपण कोपरे वाकवून घेऊयात. प्रारंभिक बठक स्थिती घ्या. सुखावह स्थितीत पाठकणा समस्थितीत असू द्या. हात जमिनीला समांतर शरीराशी काटकोनात पुढे घ्या. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेला वर असतील. हात कोपरांतून वाकवून बोटांनी खांद्याला स्पर्श करा. असे १० वेळा करा. दोन्ही हात शरीराच्या बाजूने लांब करून पुन्हा ही कृती करा. हात सरळ करताना श्वास घ्या. हात वाकविताना श्वास सोडा. हाताची बोटे, कोपर, व खांदा एका सरळ रेषेत आहेत का यावर सजगता ठेवा.खा आनंदाने : कंपवातावर वेळीच नियंत्रण
वैदेही अमोघ नवाथे – आहारतज्ज्ञ
आपल्या मनाला प्रार्थना नक्कीच बळ देते. पण वयाप्रमाणे हाता-पायामध्ये सुटणारा कंप आणि भीतीने होणारी थरथर यामध्ये नक्कीच फरक आहे. होय- मी आज बोलणार आहे पार्किन्सन अर्थात कंपवाताविषयी. म्हणजेच हाता-पायामध्ये होणाऱ्या कंपनाविषयी! हा कंप आजी-आजोबांच्या हालचालींवर बंधने आणतो. मध्य-मेंदूमध्ये अस्तित्वात असलेल्या काही पेशी निकामी झाल्या की माणसाच्या मज्जा-संस्थेवर परिणाम होतो आणि हाता-पायामध्ये ‘थरकाप’ व्हायला सुरुवात होते. मग वस्तूंवरची पकड घट्ट राहत नाही किंवा शरीराचा तोल जातो. ‘डोपामिन’ नावाच्या एका ‘संदेशवाहकाचा’ ऱ्हास झाल्यामुळे हा त्रास उद्भव ूशकतो. योग्य औषध आणि आहार याद्वारे आपण आजाराची तीव्रता कमी करू शकतो. चला आजचा पार्किन्सन्ससाठीचा आहारमंत्र बघू या.
१. संतुलित आहार घेणे. पाणी भरपूर प्यावे.
२. प्रक्रिया केलेले पदार्थ जसे ब्रेड / पाव / अतिरिक्त चरबीयुक्त पदार्थ यांचे सेवन टाळावे.
३. साखर, चरबी, मीठ यांचा वापर मर्यादित करण्याचा प्रयत्न करा.
४. डोपामिनचे प्रमाण राखण्यासाठी पुढील पदार्थ मदत करतात – बदाम (भिजवलेले), केळी, चवळी, श्रावणघेवडा, सोयाबीन, दूध आणि दुधाचे पदार्थ.
५.  विटामिन अ, क, आणि ई चे सेवन करणे. उदा. गाजर, बीट, भोपळा, रताळ, आवळा, पेरू, संत्र, मोसंबी, भोपळ्याच्या बिया, अळशीच्या बिया वगरे
६. चहा – कॉफीचे अतिरिक्त सेवन टाळावे.
७. प्रत्येक अन्न विभागातून विविध प्रकारचे अन्न खा. म्हणजेच धान्य फक्त तांदूळ-गव्हापुरते मर्यादित न ठेवता जव, नाचणी, ज्वारी, कुळीथ, बाजरी, राजगिरा वगरे धान्यांचासुद्धा विचार करा.
८. व्यायाम आणि अन्न यांचे योग्य संतुलन राखून आपले वजन आटोक्यात ठेवा.
विचारपूर्वक केलेले आहारनियोजन आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरते.
* आहाराचे नियम प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीप्रमाणे बदलू शकतात. आहारतज्ज्ञांचा सल्लाही घ्या.     संगणकाशी मत्री : स्काईप कसे वापरावे
अलीकडे भारतीय लोक मोठय़ा संख्येने परदेशी जाऊ लागले आहेत, परदेशातील आपल्या या नातेवाईकांसोबत थेट गप्पा मारण्याचा सोपा आणि स्वस्त मार्ग म्हणजे ‘स्काईप’. स्काईपवरून आपण परदेशातील व्यक्तींना कमी दरात दूरध्वनी तसेच व्हिडिओ कॉलही करू शकतो. आज आपण स्काईप कसे वापरावे हे पाहणार आहोत.
१. प्रथम अ‍ॅड्रेसबारमध्ये जाऊन http://www.skype.com असे टाईप करा.
२. आता आपल्यासमोर असलेल्या पर्यायापकी download चा पर्याय निवडा आणि आपण ज्या साधनात स्काईप वापरणार आहात (उदा. फोन, टॅब, टिव्ही, लॅपटॉप..) त्या साधनाचा पर्याय निवडून स्काईप डाऊनलोड करा.
३. आता वेबसाईटवर उजव्या कोपऱ्यात असलेल्या sign in या पर्यायावर क्लिक करा. आपल्यासमोर  sign in आणि create an account  असे दोन पर्याय ओपन होतील. त्यापकी create an account हा पर्याय निवडून आपले युजरनेम तयार करा.
४.  तयार झालेले युजरनेम आणि पासवर्ड वापरून आपण स्काईप  वापरू शकता. कसं ते यापूर्वी सांगितले आहे.
५. आता कितीही वेळ आपण आपल्या परदेशी असलेल्या आप्तांसोबत अत्यल्प दरात मनसोक्त गप्पा मारू शकता.
६. ज्या व्यक्तीसोबत आपल्याला स्काइपवरून गप्पा मारायचा असतील, त्या व्यक्तीच्या ‘स्काइप आयडी’वर विनंती (friend request) पाठवावी.
७. आपल्या संपर्क यादीतील contact list) जी व्यक्ती स्काइपवर गप्पा मारण्यासाठी उपलब्ध असेल त्या व्यक्तीच्या नावापुढे हिरवे चिन्ह दिसेल.
८. व्यक्तीच्या नावावर किंवा फोटोवर क्लिक केल्यानंतर type a message here लिहिलेल्या ठिकाणी आपला संदेश लिहा.
९. Type a message here  चा अगदी खाली एका बाजूला कॅमेराचे व फोनचे चिन्ह दिसेल. जर व्हिडीओ कॉलिंग करायचे असेल तर कॅमेराच्या चिन्हावर क्लिक करा आणि जर ऑडीओ कॉलिंग करायचे असेल तर फोनच्या चिन्हावर क्लिक करा.
काय मग आजी आजोबा, मुलांच्या नातवंडाच्या डोळ्यात डोळे घालून गप्पा मारणार की नाही!   ( संकलन- गीतांजली राणे)आनंदाची निवृत्ती : धार्मिक पर्यटनाचा आनंद
नारायण (नाना) चव्हाण, कळवा
बी.ए.आर.सी.मधून सेवानिवृत्त झाल्यावर समाजाची सेवा करावी, हे उद्दिष्ट मी नोकरीत असतानाच मनात बाळगले होते. त्यामुळे कमी बजेटमध्ये जास्तीतजास्त पर्यटन स्थळदर्शनाच्या टूर्स आयोजित करू लागलो. आज वयाच्या पंचाहत्तरीतही मी त्याच उत्साहाने अनेकांना धार्मिक स्थळांचं दर्शन घडवून त्यांचा आनंद द्विगुणीत करतो आहे.
उत्तम व्यवस्थेची, विश्वासाची, आपुलकीची, प्रेमाची, कौटुंबिक सहवासाची उत्तर भारत, दक्षिण भारत, राजस्थान, केरळ, गुजरात आदी ठिकाणाची सृष्टिसौंदर्याने नटलेली, तसेच काशी, गया, प्रयाग, अयोध्या, रामेश्वर, सोमनाथ आदी धार्मिक स्थळांची टूर आयोजित  करू लागलो. त्याला सर्व स्तरांतील लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत गेला व पुढील टूरची चौकशी करू लागले. आपण लोकांच्या सतत संपर्कात येण्यासाठी मी कळवा शहरात आईच्या नावाने छोटेसे ‘भागीरथी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’चे ऑफिस काढले. अशा या सहलीतून माझा उच्चशिक्षित, तसेच ज्येष्ठ स्त्री-पुरुष व समाजातील इतर लोकांशी संपर्क आला. त्यांच्या भिन्न स्वभावाचा, विचारांचा, प्रेमळ स्वभावाचा फायदा झाला. सहल सुंदर झाली, व्यवस्थित पार पडली, असे त्यांच्याकडून ऐकून आनंद व समाधान मिळत गेले.  उत्तराखंडातील बद्रीकेदार, गंगोत्री, यमुनोत्री, चारधाम सहल मी लोकांना घेऊन  १९८० ते १९९७ पर्यंतच्या काळात दहा वेळा केली. मागील वर्षी आलेल्या प्रलयाची टी.व्ही.वरील दृश्ये पाहून त्या वेळेला चारधाम सहलीवर गेलेल्या लोकांना कसे संकटाला तोंड द्यावे लागले ते ऐकून मला अनेक फोन आले व आपली चारधाम टूर तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक पार पाडलीत, असे सांगून आभार मानू लागले.
माझे वय सध्या पंचाहत्तर चालू आहे. या वयात माझ्या स्वभावामुळे हॉटेल मालक, बस सव्‍‌र्हिसवाले, रिक्षावाले, गंगेच्या ठिकाणचे बोटवाले, धार्मिक स्थळांवरील विधी करणारे पंडित यांच्याशी चांगले संबंध झाले आहेत. त्यांच्याकडून मला चांगले सहकार्य व सेवा मिळत आहे. या सहल दर्शन दरम्यान माझा काही परदेशी लोकांशीही संपर्क येऊन त्यांचे पत्रव्यवहार चालू आहेत. तसेच इतर काही लोकांना आणि टूर्सवाल्यांना माझे मार्गदर्शन होत आहे. स्वतंत्र कुटुंबासहित टूर्स घेऊन जाणाऱ्यांना त्यांच्या बजेटप्रमाणे त्यांच्या आवडीच्या स्थळाची पूर्ण व्यवस्था अगदी विनामूल्य करून देत आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाचा एक ज्येष्ठ सदस्य समजून लोक मला ‘नाना’ या नावाने ओळखतात. माझ्या पत्नीचे वय सत्तर असून सर्व मुलींची लग्ने झाल्यामुळे आम्ही दोघेच घरी असतो. मी टूरवर असताना ती घर सांभाळते. तिची साथ व सहकार्य मिळत असल्यानेच मी अजूनही टूर नेत आहे व आम्ही दोघे आनंदाने निवृत्ती जीवन जगत आहोत.                      

निवृत्त झालेले दोघे आजोबा बागेत एका बाकावर बसले होते. तेवढय़ात एका आजोबांनी दुसऱ्या आजोबांकडे वळून पाहिले व निराशेच्या सुरात म्हणाले, ‘ ऐंशी पूर्ण केली मी नुकतीच, पण आता होत नाही हो. कुठला ना कुठला भाग शरीराचा दुखतच असतो. तुम्हीही माझ्याच वयाचे दिसता. तुम्हाला कसं हो वाटतं?’
दुसरे आजोबा म्हणाले,‘ मला, अहो मला तर नुकत्याच जन्मलेल्या बाळासारखं वाटतं.’
 ‘कसं काय?’
‘ कसं म्हणजे, अहो, डोक्यावरचे केस गेलेत, दातही नाहीत.आणि थोडय़ावेळापूर्वी माझी पँटही ओली झालीय बहुधा !!! ’

Famous Odissi Dancer Jhelum Paranjape article on International Dance Day
नृत्याविष्कार!
people having these mulank or birthdate are honest with partner
Numerology: नातेसंबंधात प्रामाणिक असतात ‘या’ तारखेला जन्मलेले लोक, प्रत्येक सुख दु:खात देतात जोडीदाराला साथ
Till 1st June 2024 Mangal Gochar in Meen rashi Mahavisfot Angarak Yog on Hanuman Jayanti
१ जूनपर्यंत मीन राशीत ‘महाविस्फोट अंगारक’ योग; ‘या’ राशींचा भाग्योदय; प्रचंड धनासह प्रत्येक कामात मिळेल गती
Before Going For Evening Gym Beetroot juice or coffee Which Drink is better For Your Health Read What Experts Said
जिमला जाण्यापूर्वी ‘या’ वेळेत करा बीटाच्या रसाचे सेवन; स्नायू राहतील मजबूत, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात