‘‘आमच्याकडे काका-काकू वगैरे बराच गोतावळा जमला होता. बुजुर्ग मंडळींना त्या रात्री ‘पिठलं-भात-पापड’ वगैरे टिपिकल चविष्ट पण करायला सोपा (म्हणे)आणि झटपट बेत करावासा वाटला. साहजिकच नवीन सूनबाई म्हणजे माझ्या बायकोवर जबाबदारी येऊन पडली. तिची चांगलीच पंचाईत झाली. मी लगेच शर्टाच्या बाह्य सरसावून पुढे झालो. ‘‘अगं त्यात काय घाबरायचं? पिठलं करणं एकदम ईझी! पंधरा जणांसाठी पंधरा वाटय़ा बेसन काढून घे. कांदे वगैरे कापायची मदत मी करतोच, तू फक्त मिरच्या, कोथिंबीर वगैरे चिरून घे.’’ असं म्हणून मी लगेच कामाला लागलो. ‘मटण शेरे पंजाब’ करणाऱ्या माझ्यासारख्या बहाद्दराला पिठलं करणे म्हणजे एकदम भातुकलीतलाच खेळ वाटला. हाय काय आन नाय काय! ..’’ पण प्रत्यक्षात काय झालं आपल्या खवय्या वाचकांनी पाठवलेल्या त्यांच्या स्वयंपाकघरातील अनुभवांचं हे सदर दर पंधरवडय़ाने..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी एक अतिशय उत्साही, सगळ्या गोष्टींत रस घेणारा, जीवनावर मनापासून प्रेम करणारा साधासुधा पुरुष आहे. मी शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनीयर आणि पेशाने नौदल अधिकारी असलो तरी स्वयंपाक करायला आणि वेगवेगळे पदार्थ करून ते जवळच्या लोकांना विशेषत: बायकोला खाऊ  घालायला मला मनापासून आवडते.

मराठीतील सर्व घड(व)लेले पदार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on food culture
First published on: 14-01-2017 at 00:37 IST