युनोच्या आकडेवारीनुसार जगभरात १०० कोटी स्त्रियांना रोज विविध प्रकारच्या िहसेला तोंड द्यावे लागत आहे. त्याविरोधात येत्या १४ फेब्रुवारी रोजी, व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी, प्रेमाचा संदेश पसरविला जाणार आहे. यासाठी ‘ वन बिलियन रायझिंग – १०० कोटी स्त्री-पुरुषांनो जागे व्हा!’ अर्थात ‘जगत्व्यापी कृतीची हाक’ मारली जाणार असून यात जगभरातून १००कोटी लोक सहभागी होणार आहेत. आपणही होऊ या सामील या मोहिमेत…
फ४ फेब्रुवारी २०१३ ला एक आवाज जगभर निनादणार आहे – ‘बस्स!! स्त्रियांवर होणारी िहसा आता सहन करायची नाही. आता नाही आणि कधीच नाही.’ जवळजवळ १०० कोटी स्त्री-पुरुषांचे आवाज त्या आवाजामध्ये सामील होणार आहेत. जगातील कोनाकोपऱ्यातून या आवाजाचा घोष होईल अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमासाठी काढलेले पोस्टर आवाहन करते, ‘आपण जेथे कोठे असू तेथे रस्त्यावर येऊ, िहसा बंद करू. प्रेमाचा संदेश पसरवू.’ आपण हे वचन घेऊ की, ‘खूप वाट पाहिली, आता ही िहसा संपायलाच हवी.’ ही १००कोटी उभरत्या स्त्री-पुरुषांची, ‘जगत्व्यापी कृतीची हाक’ ही १०० कोटी उभरत्या स्त्री पुरुषांची सामुदायिक कृती आहे. रस्त्यावर या, नाचा आणि तुमच्या, आया, बहिणी, सख्या, मत्रिणी यांच्यावर झालेल्या अन्यायांच्या विरोधात निर्भयतेने उभे राहा..
हा १०० कोटी स्त्री-पुरुषांचा जलसा असेल. आपण आपापली ऑफिसेस सोडून, घर सोडून, रोजची कामे सोडून या सर्वशक्तिमान अशा जागतिक कृतीमध्ये सामील होऊ आणि हजारो वष्रे चालत आलेल्या िहसेला नकार देऊ. ही आपली कृती घडवेल समाजात बदल.
दिल्लीतील बलात्कार प्रकरण खूपच गाजलं आणि त्याच्या निषेधार्थ देश चिडून उठला. १९८० साली मथुरा बलात्कारप्रकरणी झालेल्या चळवळीनंतर पुन्हा एकदा पुरुष सत्तेचे आणि दहशतीचे नग्न स्वरूप अतितीव्र स्वरूपात प्रगट झाले. वर्षांनुवष्रे बलात्काराच्या भीतीपोटी आयुष्य संकुचित करून, आक्रसून घेऊन जगणाऱ्या नव्या पिढीतील तरुण मुलींना हे सत्य भिडले आणि त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिकाराने इंडिया गेट, विजय चौक, जंतरमंतर दणाणून गेले. शासनही हादरले. मुख्य म्हणजे कॉलेजच्या विद्याíथनींनी यामध्ये पुढाकार घेतला होता. प्रचंड जोशाने त्या सामील झाल्या आणि कित्येक दिवस त्यांच्या संतापाचा लाव्हा बाहेर पडत होता. आजही बलात्काराचे हे सत्र थांबलेले नाही. रोज नवनवीन बातम्या येत आहेत. हरियाणामध्ये एका महिन्यात ३० बलात्कार झाले, त्यातील बहुतेक जणी दलित समाजातील होत्या. घराण्याच्या इज्जतीच्या नावाखाली परजातीय विवाह करणाऱ्या मुलांना आणि मुलींना मारले जातेय. रस्त्यावर वासूगिरी करून छळ करणाऱ्यांची संख्या वाढतीय. घराघरातील मारहाणीला बळी पडणाऱ्या स्त्रियाा बाहेर पडून न्याय मागायला न्यायालयात उभ्या राहत आहेत. अरुणाचल प्रदेश, मणिपूर, काश्मीर येथे जवानांकडून बलात्कार होत आहेत आणि ते नागरी न्यायालयाच्या परिघाबाहेर आहेत. लंगिक आक्रमता विधेयक लोकसभेत मांडले गेले आहे. परंतु त्यांतही अनेक त्रुटी आहेत. या सगळ्या पाश्र्वभूमीवर अशा प्रकारच्या प्रतिकाराची, आवाज उठविण्याची गरज सर्वाना वाटत असते. त्यासाठी उपयोगी पडणारा हा कार्यक्रम जगभर आकार घेतोय.
खरं वाटतेय? असे खरंच घडेल का? जगभरातील माणसे एकी करतील का? पुरुषही सामील होतील का? १०० कोटी का? आणि १४ फेब्रुवारी का?
१०० कोटी ही संख्या सांगते की एवढय़ा स्त्रियांना रोज विविध प्रकारच्या िहसेला तोंड द्यावे लागत आहे. युनोने प्रसिद्ध केलेले आकडे आहेत हे. जगातील तीनामधील एक स्त्री ही आयुष्यामध्ये कधी ना कधी िहसेला बळी झालेली असते. १४ फेब्रुवारी हा तर सेंट व्हॅलेंटाइन यांचा जन्मदिवस जगभर साजरा केला जातो. त्यांनी प्रेमाचा संदेश जगभर पसरविला. या मोहिमेसाठी इव्ह एन्सलेर या लेखिकेने पुढाकार घेतला आहे. तिचे ‘व्हजायना मोनोलॉग’ हे नाटक जगभर गाजते आहे. आपल्याकडे वंदना खरे यांनी मराठीमध्ये त्याचा अनुवाद अतिशय समर्थपणे, ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ या नावाने केले आहे. त्या नाटकाचे १०० प्रयोग नुकतेच पार पडले आहेत. स्त्रियांच्या लंगिक अनुभवासंबंधी हे नाटक अतिशय संवेदनशील पद्धतीने संवाद साधते, ज्याबद्दल आजपर्यंत बोलण्यास बंदी होती. इव्हने जगभरातील जवळजवळ १६८ संघटनांशी संवाद साधून ही मोहीम त्या त्या देशांमध्ये सुरू करण्याचे प्रयत्न केले आहेत. भारतात कमला भसीन यांच्या ‘संगत’ या दिल्लीस्थित संस्थेने ही जबाबदारी घेतली असून मुंबईमध्ये ‘अक्षरा’ त्यामध्ये सामील झाली आहे. कोलकता, बंगळुरु, गुवाहाटी, चेन्नई याही ठिकाणी बरेच कार्यक्रम आखले जात आहेत.
मुंबईत नुकताच ‘जेन्डर अॅन्ड व्हॉयलन्स’ हा कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये लहानमोठे ३० लघुचित्रपट दाखविले गेले. शिवाय वेगवेगळ्या महाविद्यालयांशी संपर्क साधून याबाबतची माहिती आणि छोटय़ा चित्रफिती व गाण्याच्या सीडीज दाखविण्याचे काम सुरू आहे. कमला भसीन यांनी स्वत: ही गाणी लिहिलेली असून विद्याíथनींबरोबर गायलेली आहेत. ‘सत्यमेव जयते’ या गाजलेल्या मालिकेमध्ये ‘पारिवारिक िहसा’ या विषयावर त्या भाष्यकार म्हणून आल्या होत्या.
कमला भसीन यांनी केलेल्या गाण्याचे बोल असे आहेत- (काही कडवी)
शंभर कोटींचा हाकारा, िहसेला देऊ नका सहारा
शंभर कोटींचा हाकारा, अपमानाला आता नाकारा
आशिया बोलतोय, आफ्रिका बोलतोय
बोलतोय युरोप, अमेरिकाही बोलतेय
शहर पण बोलतेय, गांव पण बोलतेय
मानकरी पण बोलतो, आम आदमी पण बोलतो
सर्वाचा एकच हाकारा, िहसेला देऊ नका सहारा
कौटुंबिक िहसा कलंक आहे
महिलांवरील िहसा कलंक आहे
कलंकाची हकालपट्टी करायची आहे
आपण प्रेमाचे संवर्धन करू या
समतेची फुले फुलवू या
मानवतेचा घोष करू या
दिल्लीमध्ये घडलेल्या निर्घृण कृत्यातील तिच्या बलिदानाला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करण्याची ही चांगली संधी आहे. जगभरातील स्त्री-पुरुषांबरोबर आवाज उठवीत आपण पुन्हा एकदा निर्भयाचे स्मरण करू या आणि कायद्यामध्ये आवश्यक ते बदल होतील व त्या कायद्याची अंमलबजावणी नीट होत आहे ना, हे पाहणाऱ्या पोलिसांची व न्यायसंस्थेची मानसिकता बदलेल यासाठी प्रार्थना करू या.
अधिक माहितीसाठी
akshara website, and following websites:
http://beenasarwar.wordpress.com/2012/10/30/one billion rising-global-campaign-against-violence-against women