समोसा आता सर्वत्र सहज आढळणारा, खाल्ला जाणारा पदार्थ, पण त्याचे मूळ धागेदोरे अगदी इतिहासात शोधावे लागतात. अर्थात काळाबरोबर अनेकविध रूपे घेत समोसा घडत गेला. मोगलांच्या शाहीखान्यात सबुंसक नावाने, पश्चिम बंगालमध्ये सिंगाडा नावाने तर हैदराबादात हा समोसा ‘लुकमी’ म्हणून ताटात येतो. तुर्कस्तान, उझबेकिस्तान आदी देशांत तर तो समसा नावाने ओळखला जातो. आपल्याकडे मात्र पट्टीचा समोसा वा पंजाबी समोसा या नावाने खवय्यांची जिव्हा तृप्त करतो. रस्त्यावरच्या ठेल्यांपासून ते अगदी फाइव्ह स्टार रेस्टॉरंटपर्यंत पोहोचलेला सर्वव्यापी समोसा प्रत्येकाच्या मेन्यूकार्डमधला अविभाज्य घटक झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही वर्षांपूर्वी एक राजकीय घोषणा प्रसिद्ध झाली होती.. ‘जब तक रहेगा समोसे मे आलू..’ पुढचा भाग या लेखासाठी महत्त्वाचा नाही, पण आपल्या राजकीय घोषणेत एका खाद्यपदार्थाचा जाहीर उच्चार करून समोशाच्या लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब केले गेले होते, हे महत्त्वाचे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरयाणा, हिमाचल या आणि इतर काही राज्यांत समोसा हा खाण्यामधला समान दुवा आढळतो.  बंगाल आणि परिसरात त्याला सिंगाडा म्हणतात. पण आकार चव सारखीच. हैदराबादात हा समोसा ‘लुकमी’ म्हणून येतो. अनेक ठिकाणी समोसा ‘हाणून’ न्याहरी पार पडते. पावलागणिक असे समोसे विक्रेते घाणा घालून बसलेले असतात. भारताच्या या भागांमध्ये तळण्याला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने समोसा अथवा पुरी-भाजी हा मनपसंद नाश्ता असतो. कधी हिरव्या चटणीबरोबर, कधी दह्य़ासोबत तर कधी छोल्याबरोबर समोसा उदरस्थ होतो.

मराठीतील सर्व खाऊ आनंदे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: History of the popular snack samosa
First published on: 05-08-2017 at 01:01 IST