नेतृत्वाचं किंवा नेत्याचं खरं काम कोणतं असेल, तर अधिकाधिक नेते घडवणं. अनुयायी घडवणं नव्हे.
राल्फ नादर, राजकीय कार्यकर्ते खरा नेता कोणता? तर ज्याचं अस्तित्व लोकांना जाणवतही नाही तरीही त्यानं हातात घेतलेलं काम पूर्ण होतं. त्याचं ध्येय पूर्ण होतं.. अन् लोक म्हणतात – हे काम तर ‘आम्ही’ केलंय.
– लाओ त्झू, ताओवादाचे प्रवर्तक मला लोकांच्या मागूनच चालायला हवं. मी त्यांचा नेता आहे ना!
– बेंजामिन डिसरैली, ब्रिटनचे माजी पंतप्रधान जी व्यक्ती इतरांची आज्ञा पाळणं शिकत नाही, ती व्यक्ती स्वत: कधीच चांगला नेता बनू शकत नाही.
– अॅरिस्टॉटल, ग्रीक तत्त्वज्ञ कोणत्याही नेत्याची पहिली जबाबदारी म्हणजे वस्तुस्थितीची जाणीव करून देणं अन् शेवटची जबाबदारी म्हणजे आभार मानणं. या दोन गोष्टींच्या मधल्या काळात नेत्याचं वर्तन एखाद्या सेवकासारखंच हवं.
– मॅक्स डी. प्री, ख्यातनाम अमेरिकी व्यावसायिक व लेखक नेतृत्व, शारीरिक सामर्थ्यांवर अवलंबून असतं, असं मला वाटायचं; पण प्रत्यक्षात नेतृत्व अनेक लोकांना तुम्ही सांभाळून कसे घेता यावर अवलंबून असतं.
– महात्मा गांधी एखादं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची क्षमता म्हणजे नेतृत्व! नेतृत्वासंदर्भातली सर्वात भयंकर दंतकथा म्हणजे – नेता जन्मजात असतो. जणू काही नेता बनणं ही काही तरी आनुवंशिक बाब असते. हे झूठ आहे. प्रत्यक्षात नेता जन्मजात नसून तो घडवला जातो-घडतो.
– वॉरन बेनिस, ख्यातनाम लेखक व द लीडरशिप इन्स्टिटय़ूट ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाचे संस्थापक-अध्यक्ष खरा नेता तोच, जो कोणत्या मार्गाने जायचंय हे जाणतो, स्वत: त्या मार्गाने जातो आणि इतर लोकांना योग्य तो मार्गही दाखवतो.
– जॉन मॅक्सवेल, ‘नेतृत्व’ या विषयावरील पुस्तकांचे प्रख्यात लेखक नेता बनायचं असेल, तर असा नेता बना, की ज्याच्यामागे स्वेच्छेने आणि स्वयंप्रेरणेने लोक येतील. मग भलेही तुम्हाला कोणतंही पद किंवा किताब नसला तरी चालेल.
– ब्रायन ट्रेसी, लेखक व वक्ते तुमच्या कृती इतरांना अधिक स्वप्नं पाहण्यास, अधिक शिकण्यास, अधिक कर्तृत्ववान होण्यास प्रवृत्त करत असतील, तर तुम्ही नेता आहात.
– जॉन क्विन्सी अॅडॅम्स, अमेरिकेचे सहावे राष्ट्राध्यक्ष जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात, विजय मिळतो, अशा वेळी इतर साऱ्यांना आघाडीवर ठेवून नेत्यानं स्वत: मागे राहणं चांगलं. पण जेव्हा परिस्थिती गंभीर किंवा धोकादायक असते, तेव्हा मात्र नेत्यानेच आघाडीवर राहायला हवं.
– नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेतील क्रांतिकारी नेते आपण भविष्याकडे, नव्या शतकाकडे जर दृष्टिक्षेप टाकला, तर लक्षात येईल, की आगामी काळात ज्या व्यक्ती इतरांना सक्षम बनवतील, त्याच नेता म्हणून पात्रतेच्या ठरतील.
– बिल गेट्स, मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष परिणामकारक आणि प्रभावी नेतृत्व भाषणं देणं आणि लोकप्रियतेवर अवलंबून नसतंच, ते अखेरीस तुम्ही काय साध्य केलंत, यावर अवलंबून असतं. त्याच्याशी तुमचे गुण काय आहेत याचा संबंध नसतो.
– पीटर ड्रकर, प्रसिद्ध व्यवस्थापनतज्ज्ञ व लेखक आपल्याला जे काम करायचंय, त्यासाठी उत्तमातल्या उत्तम व्यक्तींची निवड करणारा, ते काम प्रभावीपणे त्यांच्याकडून करून घेणारा आणि मुख्य म्हणजे त्यांच्या कामात अजिबात ढवळाढवळ न करणाराच उत्तम नेता असतो.
– थिओडोर रुझवेल्ट, अमेरिकेचे २६ वे अध्यक्ष एखाद्या गोष्टीला ठामपणे नकार देता येणं, ही नेतृत्वाची खरी कला आहे, साऱ्याला होकार देणं नाही. कारण होकार देणं अगदी सोपं असतं. नकार देण्यास मात्र सामथ्र्य लागतं.
– टोनी ब्लेअर, इंग्लंडचे माजी पंतप्रधान खरा नेता जनमताच्या शोधात जात नाही. तो जनमत तयार करतो.
– मार्टिन ल्यूथर किंग (ज्यु.), आफ्रिकन-अमेरिकन मानवी हक्क चळवळीचे नेते जो माणूस सारा वाद्यवृंद नियंत्रित करतो, त्याची नेहमीच प्रेक्षकांकडे पाठ असते.
– मॅक्स ल्यूकॅडो, बेस्टसेलर पुस्तकांचे लेखक इतरांना यशाचा मार्ग दाखवण्यात खरं नेतृत्व लपलेलं असतं. प्रत्येक जण आपापलं काम मनापासून आणि उत्तम करतोय. जे काम करायचं, ज्यानं ज्यानं ठरवलंय ती व्यक्ती ते काम चांगल्या प्रकारे करत आहे ना, याची सतत खात्री करणं म्हणजे नेतृत्व!
– बिल ओवेन्स सक्षम नेता फारशी कार्यक्षमता नसणाऱ्या अनुयायांकडूनही उत्तम प्रतीचं व परिणामकारक कार्य करवून घेऊ शकतो. याउलट एखादा अकार्यक्षम नेता चांगल्या व कार्यक्षम अनुयायांचं मनोबल खच्ची करू शकतो.
– जनरल ऑफ द आर्मीज जॉन पी. पर्शिग, अमेरिकेचे सेनाधिकारी उत्तम नेते हे नेहमीच प्रश्न आणि अडचणी सोपे-सरळ करण्यात वाकबगार असतात. त्यांना नेहमीच वादावादी, गुंतागुंतीच्या चर्चा आणि शंकांचं वादळ या गोष्टींतून बरोबर मार्ग काढता येतो. इतकंच नाही, तर सामान्य लोकांना चटकन समजेल तसा तोडगा काढण्यातही ते कुशल असतात.
– जनरल कोलिन पॉवेल, अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री सच्च्या नेत्याजवळ एकटय़ानं झुंझायचं धैर्य असतं. अतिशय कटू व कठोर निर्णय घेण्याचं सामथ्र्य असतं. इतरांचं म्हणणं सुज्ञपणे ऐकून घेण्याची हिंमत असते. तसंच त्याच्या मनातील ध्येयाशी एकरूप होण्याची ताकद असते.
– डग्लस मॅकऑर्थर, सेनाधिकारी कोणताही नेता सजा ठोठावण्याच्या कामी शांतपणे विचार करून निर्णय घेणारा असावा. पण लोकांना शाबासकीची थाप देण्यात मात्र अत्यंत तत्पर असावा.
– ओव्हिड, रोमन कवी नेता नेहमीच व्यवहार्य विचार करणारा आणि वास्तवदर्शी हवा. पण त्याची भाषा नेहमीच दूरदर्शी व्यक्तीची आणि आदर्शवादी असावी.
– एरिक हॉफर, तत्त्वज्ञ व लेखक नेतृत्व करणं हे मोठं अवघड काम असतं. कणखर असणं पण उद्धट न बनणं, दयाळू असणं पण दुर्बल नसणं, धीट असणं पण आक्रमक नसणं, विचारी असणं पण आळशी न बनणं, नम्र असणं पण भित्रेपणा न येऊ देणं, अभिमानी असणं पण उर्मट नसणं, विनोदबुद्धी जोपासणं पण त्याला मूर्खपणाचा लवलेशही येऊ न देणं – अशी कसरत नेत्याला कुशलपणे सांभाळायला लागते.
– जिम रॉन, लेखक व प्रेरणादायी वक्ता कोणत्याही संघर्षांच्या प्रसंगी कुशल नेत्याला आपल्या विजयाचा केवळ मार्गच ठाऊक असतो असं नाही, तर त्याला विजय मिळवणं केव्हा अशक्य आहे, तेदेखील बरोबर लक्षात येतं.
– पॉलिबियस, ग्रीक इतिहासतज्ज्ञ उत्तम नेतृत्वासाठी आवश्यक गुण : माणुसकी, स्पष्टपणा आणि धैर्य!
– फूचॅन युआन, चिनी तत्त्वज्ञ
संग्रहित लेख, दिनांक 6th Apr 2013 रोजी प्रकाशित
नेतृत्व
नेतृत्वाचं किंवा नेत्याचं खरं काम कोणतं असेल, तर अधिकाधिक नेते घडवणं. अनुयायी घडवणं नव्हे. राल्फ नादर, राजकीय कार्यकर्ते २ खरा नेता कोणता?

First published on: 06-04-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leadership