‘ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा’ या संत चोखामेळा यांच्या अभंगातील दोन ओळी. काही गोष्टी वरून चांगल्या दिसत नाहीत, पण त्यांचं अंतरंग सुंदर, देखणं, गोड असतं. चोखामेळांच्या वरील ओळींना दुजोरा देणारी ही गोष्ट.
सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत यंदा भरघोस यश मिळालं होतं. सुमित्राबाईंनी अभ्यास करून घेतला होता म्हणून अर्थातच त्या खूश होत्या. मुलांना त्यांनी आपल्या घरी भेळ खायला बोलावलं. चटपटीत भेळ मुलांना आवडली. नंतर बाईंनी छानसं आंबट गोड सरबत दिलं. मुलं खूप आनंदात होती. गप्पागोष्टींत रंगली होती. बाई म्हणाल्या, ‘‘मुलांनो, तुम्हाला सगळं आवडलेलं दिसतंय, पण बाळांनो, भेळीसाठी माझ्याकडे एकसारख्या डिशेस नव्हत्या. सरबत द्यायला पेलेसुद्धा सगळे वेगवेगळे. मला वाईट वाटतंय.’’ एक चुणचुणीत मुलगी म्हणाली, ‘‘बाई, भेळ इतकी मस्त होती की आमचं कोणाचंही लक्ष डिशकडे गेलंच नाही. भेळीसारखंच सरबत पण छान चविष्ट असणार हाच विचार सर्वानी केला असेल, म्हणून भराभर पेले आम्ही उचलले. ते बाहेरून कसे आहेत इकडे पाहिलंय कोणी? आणि बाई, तुम्ही शिकवलेला श्लोक पण खूप आवडला.’’ मिनिटभर विचार केल्यावर बाईंच्या लक्षात आलं, हिने मनातील गोष्ट सोप्या शब्दात सांगितली. अंतरंग मोहून टाकणारं असेल तर बाह्य़रंगाकडे दुर्लक्ष होतं. अंतरंग लोकांना मोहवून टाकणारं असावं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हल्ली फेसबुकवर जुने मित्र-मैत्रिणी भेटतात. व्हॉट्सअ‍ॅप, ईमेलवरून संपर्कात राहता येतं. त्यातूनच ‘रियुनियन’ची कल्पना जन्माला आली. असंच एक रियुनियन १९९२ मध्ये पदवी घेतलेल्या मुला-मुलींनी आयोजित केलं. त्या वेळचे प्राचार्य आणि एक प्राध्यापक पण यायला तयार झाले. ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी सगळे जमले. जुन्या आठवणी, एकमेकांची ख्यालीखुशाली यात बराच वेळ गेला. आता प्रत्येकाने आपली सद्य:स्थिती थोडक्यात सांगायची होती. आपण सुखासीन आयुष्य जगतोय हे सगळ्यांनी सांगितलं. बायकांनी, आपणसुद्धा फक्त चूलमूल करत नाही, शिक्षणाचा उपयोग पैसे कमाविण्याकरता करतो हे ठासून सांगितलं.

मराठीतील सर्व मन वढाय वढाय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What we see is not always true
First published on: 30-04-2016 at 01:05 IST