खसखस

हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक असलेले कॅल्शियम, मँगनीज याशिवाय फॉस्फरस आणि झिंक असलेली खसखस बाळंतिणीच्या आहारात अवश्य असावी. खसखशीत तांबा, लोह, ‘ब’ जीवनसत्त्व आणि पोटॅशियमही…

हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक असलेले कॅल्शियम, मँगनीज याशिवाय फॉस्फरस आणि झिंक असलेली खसखस बाळंतिणीच्या आहारात अवश्य असावी. खसखशीत तांबा, लोह, ‘ब’ जीवनसत्त्व आणि पोटॅशियमही असतं, यामुळे रक्तातील लाल पेशींचं प्रमाण वाढायला मदत होते, रक्तदाब आटोक्यात राहतो, आवश्यक एन्झाइम्स मिळतात. खसखस भाजून केलेली पावडर घातलेला पदार्थ खमंग होतो. खसखस दुधात भिजवून, वाटून पदार्थात घातली की पदार्थ शाही बनतो.
यासह खसखस हा अत्यंत गुणकारी पदार्थ आहे. चेतासंस्थेतील समस्यांवर खसखस उपयुक्त आहे. शिवाय ती अ‍ॅण्टी ऑक्सिडंट घटक म्हणून काम करते. बाळंतिणीसाठीच्या खास पदार्थामध्ये आवर्जून खसखशीचा वापर करतात.

खसखशीच्या वडय़ा-

साहित्य :
एक वाटी खसखस, एक वाटी मगज (किंवा बदाम), पाव वाटी आल्याचा कीस, तीन वाटय़ा साखर, दोन वाटय़ा दूध, एक चमचा वेलची पावडर.
कृती :
दूध गरम करून त्यात खसखस आणि मगज किंवा बदाम दोन तास भिजत घालावा. नंतर त्यात निम्मी साखर आणि आलं घालून मिक्सरमध्ये गुळगुळीत वाटून घ्यावं. या मिश्रणात उरलेली साखर घालून गॅसवर ठेवावं आणि ढवळत राहावं. मिश्रणाचा गोळा होऊन कढईच्या कडेला कोरडी साखर वाहायला लागली की वेलची घालून खाली उतरावं, कोमट झाल्यावर तूप लावलेल्या थाळीत थापून नंतर वडय़ा कापाव्यात.
वसुंधरा पर्वते – vgparvate@yahoo.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अन्नसंकर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Poppy seeds

ताज्या बातम्या