‘काळाबरोबर चालतो तो शहाणा’, अशी एक म्हण आहे; परंतु यात थोडा बदल करून काळाच्या बरोबरीनं चालतो तो आनंदी आणि आजच्या भाषेत बोलायचं तर ‘स्मार्ट’!

असे कित्येक स्मार्ट आजी-आजोबा आम्हाला माहीत आहेत, ज्यांनी बदलत्या, आधुनिक काळात स्वत:मध्ये ‘स्मार्ट’ बदल घडवले आणि त्यांचं आयुष्य स्वयंपूर्ण आणि मुख्य म्हणजे आनंदी, सुखी झालं..

Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…

कोणते छोटे छोटे बदल केले या आजी-आजोबांनी? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिकता बदलली. ‘मला नाही बाई जमत मेसेज करायला’ किंवा ‘तू बरी ऑनलाइन सिनेमे बघतेस, मला तर समजतच नाही, यूटय़ूब कसं उघडायचं? इथपासून ‘आज मी नातवाशी ‘झूम’वर गप्पा मारल्या’, ‘आज मी ‘ऑनलाइन बँकिंग ’करून हजार रुपये भरले’ इथपर्यंत समाधानी आवाज ऐकू येऊ लागले. कारण ‘मला हे येऊ शकतं, मला ते शिकून घ्यायचं आहे, माझ्यासाठी ते उपयोगी आहे,’ हा त्यांचा बदलता ‘अॅटीटय़ुड’.

आमचे साठी किंवा त्यापुढचे कित्येक आजी-आजोबा आज मोबाइल, इंटरनेट सफाईनं वापरत आहेत. फोन करणं असो वा मेसेज पाठवणं, त्यांना सहज जमू लागलं आहे. काही लॅपटॉप वापरताहेत, त्यावर पुस्तकं वाचताहेत, काही ‘व्हॉट्सॲप’ वर मित्रमैत्रिणी जमवून गप्पा मारताहेत. काही जण खाण्याच्या ॲपवरून थेट आवडेल ते खाणं ऑर्डर करताहेत, तर काही जण कुठं जायचं असेल तर गाडी किंवा सिनेमा, नाटकांची तिकिटं बुक करताहेत, इतकंच काय, तर स्वत:चे ‘रील’ आणि मोबाइलवर ‘सेल्फी’ काढून ते ‘इन्स्टा’वर टाकताहेत. परदेशी राहाणाऱ्या मुलांचे व्हिडीओ कॉल घेणं वा करणं असो की पहिल्यांदा थेट परदेशी जाणं असो, आजी-आजोबा एकत्र किंवा अगदी एकटय़ानं सगळे सोपस्कार पार पडत परदेशी जात आहेत.
काही शिकण्याची प्रक्रिया खरं तर अविरत सुरूच असते, अगदी कोणत्याही वयात. मला हे जमणार नाही, आमचं हे शिकायचं वय नाही, हे तुमचे मानसिक ‘स्टॉप’ असतात. ते लक्षात घेऊन त्याला सामोरं जायचं असतं. जानेवारी २०२३ पासून सुरू होणारं हे सदर त्या आजी-आजोबांसाठी आहे ज्यांनी नवीन काही शिकण्यातला आनंद अनुभवला.

‘काय नवीन शिकलात? कुणी शिकवलं? त्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं? शिकतानाचा आणि शिकल्यानंतरचा तुमचा अनुभव कसा होता ?’ आम्हाला लिहून पाठवा. अगदी मोबाइवर हा अनुभव लिहून तो आम्हाला ईमेलही करू शकता, हेसुद्धा अनेकांसाठी नव्यानं शिकणंच असेल. तेव्हा पासष्टीच्या पुढच्या आजी-आजोबांनो, लागा कामाला. पाठवा तुमचे अनुभव ६०० ते ८०० शब्दांत. हे अनुभव मराठीतच हवेत. कॉम्प्युटरवर ऑपरेट करून पाठवले तर ओपन आणि पीडीएफ दोन्ही फायली पाठवा. ‘सब्जेक्ट’मध्ये‘.. आणि आम्ही शिकलो’ आवश्य लिहा. ईमेल आयडी chaturang.loksatta@gmail.com