चित्रपटाच्या झगमगत्या क्षेत्रात वावरायला मिळाल्यामुळे स्त्रीकडे बघण्याची दृष्टी जास्त निरोगी बनली, चित्रीकरणाचं एक युनिट असतं आणि युनिट म्हणजे बहुतेकजण झपाटल्यासारखे काम करत असतात. अशा वेळी स्त्री-पुरुष हा भेद पुसट होतो. वाद झाले तरी समान पातळीवर होतात, तसेच इतर गोष्टीही.. अशा वेळी ‘हा ऽऽऽ ती बघ मावा खातेय’ किंवा ‘ती बघ झुरके मारतेय’ असले बाळबोध विचार मनात येत नाहीत.. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी’ ही असली विधानं कालबाह्य़ वाटायला लागतात..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या’ म्हणत कोणत्या दोन स्त्रियांनी सजवलेल्या पाळण्याच्या वरून- खालून मला एकमेकींकडे सोपवलं आता आठवत नाही; पण तेव्हापासूनच तिच्याशी माझा संवाद घडायला लागला, चार बहिणींच्या पाठीवर अनपेक्षितपणे म्हणजे अपेक्षा नसताना माझा जन्म झाला त्यामुळे माझ्याभोवती गराडा पडला तो या नानाविध रूपं घेऊन कौतुकाने आलेल्या स्त्रियांचाच. पण त्यात पहिली ओळख दृढ झाली ती आईशी!

मराठीतील सर्व त्याच्या नजरेतून ती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Film unit gender roles gender differences
First published on: 01-04-2017 at 00:16 IST