लैंगिकतेची जबाबदारी व परिस्थितीप्रमाणे ती हाताळण्याची क्षमता किशोरवयीनांमध्ये येण्यासाठी आणि रेव्ह पाटर्य़ासारखे स्फोट आटोक्यात आणण्यासाठी लैंगिकतेचा शास्त्रीय अभ्यासच समाजाला उपयोगी पडणार आहे. लैंगिक गुन्हे व लैंगिक मानसिकतेच्या समस्या काही प्रमाणात अनावर किंवा दाबलेल्या कामोत्तेजनेमुळे घडत असल्याने लैंगिकता हाताळण्यासाठी युवकांना सामाजिक जबाबदारीची जाणीव, प्रौढांना स्वत:चे कामजीवन दुर्लक्षित न करता जगण्याचे मार्गदर्शन अत्यावश्यक आहे.
लोकशाही म्हणजे मतभिन्नता. त्यामुळे निर्माण होणारे वाद मात्र काही वेळा समाजावर गंभीर परिणाम करतात आणि त्यातून शासनाकडून घेतला जाणारा निर्णय हा चुकीच्या दिशेने टाकलेले पाऊल ठरू शकते. लैंगिक शिक्षणाबाबत तेच घडत आहे. थोडे ऐतिहासिक सत्य आणि विदारक वास्तव यांचा विचार केला तर मात्र लोकांच्या आणि लोकनेत्यांच्या मनातील लैंगिक शिक्षणाबाबतचा बाऊ कमी होण्याची शक्यता आहे.
सध्या रेव्ह पाटर्य़ाचे फुटलेले पेव, किशोरवयीन मुलामुलींचे बेदरकार उन्मुक्तपणे वागणे हे एक अतिरेकी टोक तर त्यांना येनकेनप्रकारेण काबूत ठेवण्यासाठी चिंतित पालकवर्ग, ‘सोशल पॉलिसिंग’ व ‘सरकारी पॉलिसिंग’, हे आपले सामाजिक चित्र आहे. त्याच वेळी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’, होमोसेक्सुआलिटी, िलग-परिवर्तन शस्त्रक्रिया, बलात्काराचे बदलते निकष, िपकी-प्रामाणिक सारख्या आंतरिलगत्वाच्या केसेस याचाही विचार अपुरा पडत चालल्याची जाणीव समाजाला होत आहे. या सर्वाचे मूळ आहे केवळ लैंगिकतेच्या डोळस शिक्षणाचा अभाव. ‘लैंगिकता’ वयाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे हाताळायला शिकणे तसेच लैंगिकतेचे इतर पलूही माहीत करून घेणे यालाच लैंगिक शिक्षणाचा पाया म्हणायला हरकत नाही.
कुठलेही ज्ञान समाजासाठी व पुढील पिढय़ांसाठी उपयोगी पडावे म्हणून त्याची व्यवस्थितपणे मांडणी करून जतन करण्याची प्राचीन भारतीयांची परंपरा ‘कामशास्त्रा’बाबतही आढळून येते. ‘कामजीवना’ला तत्त्वज्ञानाची बठक व शास्त्रीय कोंदण देण्यात सर्वात महत्त्वाचा सहभाग प्राचीन भारतीयांचाच आहे. सुप्रसिद्ध अमेरिकन सेक्स रिसर्चर डॉ. वर्न बुलाख यांनी यासाठीच प्राचीन भारतीय संस्कृतीचा गौरव केला आहे. प्राचीन काळी आपलीच एकमेव अशी अभ्यासू संस्कृती होती. त्या काळी भारतीय साहित्यातून हे ज्ञान चीन, जपान, तिबेट व इतर दक्षिणपूर्व आशियाई देशांमधे पसरले. विशेषत: ‘कामसूत्र’ हा महर्षी मल्लनाग वात्स्यायन लिखित तिसऱ्या शतकातील ग्रंथ सर्वदूर पसरला. आजही याचे विविध भाषांमधील अनुवाद उपलब्ध आहेत.
ऐतिहासिक सत्य हे आहे की, इसवी सन चौथ्या शतकामध्ये आपल्या भारतानेच जगामध्ये प्रथमच लैंगिक शिक्षणाला सुरुवात केली होती, जेव्हा ‘कामसूत्र’ ग्रंथ निर्माण झाला. महर्षी मल्लनाग वात्स्यायन यांनी या विषयी संस्कृत भाषेत सेक्ससारख्या महत्त्वाच्या पण दुर्लक्षित विषयाला शास्त्रीय बठक आणली.
मध्ययुगीन काळात तंत्रशास्त्र विकसित होऊन भारतात ‘कामजीवना’ला एक वेगळा पलू जोडला गेला. त्यातील हठयोगामधे शरीरशास्त्राचा, विशेषत: सिम्पथेटिक व पॅरॅसिम्पथेटिक मज्जासंस्थांचा विचार त्या काळातील ज्ञानाप्रमाणे केला गेला. त्याचा अभ्यास करताना मला लक्षात आले .ही शेकडो वर्षांपूर्वीच्या श्रीआदिनाथरचित शिवसंहिता ग्रंथामध्ये चौथ्या पटलातील श्लोक १०१-१०२ मध्ये जी व्यायामतंत्रे सांगितली आहेत तीच तंत्रे डॉ. अर्नोल्ड केजेल या गायनॅकॉलॉजिस्टने त्याच्या नावाने ‘केजेल एक्झरसाइज’ म्हणून विसाव्या शतकातील चौथ्या दशकात प्रसिद्ध केले आणि वैद्यकीय क्षेत्रात त्याचे तसे नाव झाले.
आपल्या भारतीयांचे हे दुर्दैव नाहीतर काय की ज्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी अभ्यासून शेकडो वर्षांपूर्वीच ग्रंथांमधे प्रसिद्ध केल्या आहेत त्या केवळ संस्कृतमध्ये असल्याने डॉक्टर मंडळींनी अभ्यासल्या नाहीत व त्या गोष्टींचे वैद्यकीय महत्त्व न कळल्याने संस्कृत पंडितांनी त्या अस्पृश्यासारख्या अप्रकाशित ठेवल्या.
जुआँ पिआजे या फ्रेंच मानसशास्त्रज्ञाने परिवर्तनीय वैचारिकता (रिव्हर्सबिल िथकिंग) ही एक उच्च प्रतीची विचारक्षमता असल्याचे सांगितले आहे. अशा प्रकारच्या वैचारिकतेमुळे दूषित पूर्वग्रह न ठेवता सर्व प्रकारच्या शक्यतांचा विचार करूनच एखाद्या गोष्टीचे मूल्यांकन (बरेचदा पुनर्मूल्यांकन) करण्याची डोळस वृत्ती निर्माण होते. लैंगिक क्षेत्रासारख्या संवेदनशील क्षेत्राबाबतीत तर अशा क्षमतेचे महत्त्व प्रकर्षांने जाणवते.
‘यू होल्ड बेटर विथ अ‍ॅन ओपन हॅण्ड’, मोकळय़ा हाताने तुम्ही चांगले धरू शकता. म्हणजेच मोकळ्या मनाने आणि साफ नजरेनेच एखादी गोष्ट योग्य स्थितीत (परस्पेक्टिव्ह) बघणे शक्य होते. संशय, लाज, शरम, भीती मनात ठेवून तिच्याकडे पाहिल्यास त्या गोष्टीचे योग्य मूल्यमापन होत नाही आणि लैंगिकतेच्या बाबतीत ही वैचारिक त्रयस्थता असणे आवश्यकच आहे. नाहीतर विविध मनोगंड तयार होण्यास वेळ लागत नाही.
संस्कृतीचे संस्कार झाल्याने समाजातील कित्येक गोष्टींचे बरे-वाईट मूल्यांकन होत असते. यामुळे काही गोष्टींचा स्वीकार केला जातो, तर काही गोष्टी त्याज्य समजल्या जातात. त्याज्य गोष्टींचे पुनर्मूल्यांकन करण्याची क्षमता अशा परिवर्तनीय वैचारिकतेमुळे येत असते.  संस्कृती गतिमान व लवचिक असते. ती सर्व प्रकारचे वैचारिक बदल पचवीत स्वत:ची विचारधारणा कालानुरूप वेगळी घडवू शकत असल्याने धक्कादायक वाटणारे विचार काळाच्या ओघात स्वीकारते. पण लैंगिक विचारांना मात्र सांस्कृतिक जोखडातून (कल्चरल हॅण्डीकॅप) सुटणे हे सहजासहजी जमलेले नाही. कारण लैंगिकता ही खासगी, व्यक्तिगत व घनिष्ट (प्रायव्हेट, पर्सनल व इंटिमेट) बाब असते. म्हणून कुठलीही व्यक्ती सहजपणे, सार्वजनिकपणे हा विषय मांडायला उद्युक्त होत नाही.
आजवर समाजाला कामशिक्षण (लैंगिक शिक्षण) न देऊनही समाजातील गुप्तरोग व एड्स यांचे प्रमाण भयावहपणे वाढत आहेच. विशेषत: कॉलेजमधील मुलामुलींमध्ये हे जास्तच आढळत आहे. याचे कारण केवळ लैंगिक सुखाविषयीची उत्सुकता वाटल्याने व नवयुवावस्थेतील ही उत्तेजना विवाहापूर्वी कशी हाताळावी याचे योग्य ज्ञान न मिळाल्याने घडलेले स्वैर लैंगिक संबंध. याच संस्कारक्षम, व्हल्नरेबल वयात अज्ञानातून उत्पन्न झालेला विश्वास हा काही वेळा फारच दृढ असतो.
विवाहपूर्व गर्भधारणा व गर्भपात, नपुंसकता व लैंगिक असमाधान यांसारख्या मनोबल खचवून टाकणाऱ्या लैंगिक समस्या, त्यातून उद्भवणारे नराश्य, आत्महत्या, हत्या व घटस्फोट यांसारख्या सामाजिक दुर्घटना याचा आलेख हा वाढत्या प्रमाणातच आहे. हे केवळ दांभिक नीतिमत्तेतून समाजापासून आजवर दूर ठेवलेल्या कामशास्त्राच्या अज्ञानानेच आहे.
विविध कामसमस्यांनी व मनोगंडांनी पछाडलेला तरुणवर्ग पाहताना एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते ती म्हणजे या सर्वाचे मूळ हे एकतर लैंगिकतेच्या अज्ञानात, अपुऱ्या ज्ञानात किंवा विकृत ज्ञानातच दडलेले असते. कामभावनेचे परिणाम व्यक्तिमत्त्व-विकासावर व आंतरव्यक्ती संबंधांवर खोलवर होत असतात, तिच्याविषयीचे मूलभूत शास्त्रीय ज्ञान हे संबंधितांना मिळायलाच पाहिजे.
प्राणीमात्राची सर्वात बलवत्तर दुसरी मूलभूत प्रेरणा, प्रवृत्ती (बेसिक इन्स्टिंक्ट) काम अर्थात सेक्स हीच आहे. स्वरक्षण, सव्‍‌र्हायव्हल ही पहिली. पशूपासून मानवाची उत्क्रांती होण्यासाठी हजारो वष्रे लागली, परंतु मानवाचा एका क्षणात पशू करण्याची ताकद केवळ वासनेमध्येच आहे. ‘कामातुराणां न भयं न लज्जा’, म्हणूनच या भावनेचा सखोल विचार प्राचीन भारतातील विचारवंतांनी फारच डोळसपणे व निरोगीपणे केलेला आहे.
स्त्री-पुरुषांचे हे मीलन दोघांनाही समाधानकारक होण्यासाठी फक्त यांत्रिकतेने व्यवहार न होता, कौशल्याने व भावनात्मकपणे तो होणे आवश्यक असते. तसेच मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे, म्हणून समाजात वावरण्यासाठी काही बंधने व काही विचार घेऊनच तो कामसंबंध करीत असतो. म्हणून त्याला त्या बंधनांची माहिती व विचारांची योग्यता समजली पाहिजे. म्हणजेच शिक्षण पाहिजे. नसíगक कामप्रवृत्तीला अशा शिक्षणाची जोड मिळाल्यास तिचे विकृतीकरण किंवा यांत्रिकीकरण होणार नाही.
प्राण्यांच्या उत्क्रांतीक्रमात निव्वळ वासनेकडून वैचारिक लैंगिकता असा लैंगिकतेचा विकास होत असतो. मानवामध्ये अशा वैचारिक लैंगिकतेचा पूर्ण विकास झालेला असतो. म्हणून स्वत:च्या अनुभवांतून, समजुतींमधून किंवा प्रयत्नपूर्वक मिळवलेल्या शास्त्रीय ज्ञानातून मनुष्य स्वत:च्या लैंगिकतेला विधायक वळण लावू शकतो.
लैंगिकतेची जबाबदारी व परिस्थितीप्रमाणे ती हाताळण्याची क्षमता किशोरवयीनांमध्ये येण्यासाठी आणि रेव्ह पाटर्य़ासारखे स्फोट आटोक्यात आणण्यासाठी लैंगिकतेचा शास्त्रीय अभ्यासच समाजाला उपयोगी पडणार आहे. शालेय जीवनाच्या जीवशास्त्र विषयापासून विवाहपूर्व समुपदेशनापर्यंत टप्प्याटप्प्याने लैंगिक शिक्षण आवश्यकच आहे. विवाहोत्तर काळातही पती-पत्नी नाते समृद्ध होण्यासाठी कामजीवन मार्गदर्शन आवश्यकच असते. लैंगिक गुन्हे व लैंगिक मानसिकतेच्या समस्या काही प्रमाणात अनावर किंवा दाबलेल्या कामोत्तेजनेमुळे घडत असल्याने लैंगिकता हाताळण्यासाठी युवकांना सामाजिक जबाबदारीची जाणीव, प्रौढांना स्वत:चे कामजीवन दुर्लक्षित न करता जगण्याचे मार्गदर्शन सध्याच्या काळात अत्यावश्यक आहे. म्हणूनच ‘समाधानी कामजीवन हा सुखी संसाराचा पाया आहे व सुखी संसार हा समाजस्वास्थ्याचा पाया आहे’ हे ब्रीदवाक्य करून वैद्यकीय तज्ज्ञांनी समाजात आधुनिक वैद्यकीय कामशास्त्राचा पाया मजबूत करणे आवश्यक बनले आहे, नाही का!    
shashank.samak@gmail.com

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
scholarship
स्कॉलरशीप फेलोशीप: उच्च शिक्षणातील संशोधनात्मक पद्धती