भाऊंनी मला खूप काही दिलं. पहिली गोष्ट म्हणजे अध्यात्माचा मार्ग सोडू दिला नाही. पळवाटा बुजवून टाकल्या. अध्यात्म हे जगण्यासाठी आहे, बोलण्यासाठी नाही, असं ते सांगत. बाबा आणि भाऊंसारख्यांचं देणं कधीच फिटू शकत नाही.. कधीच नाही!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एखादं रोपटं लावतात तेव्हा त्याची जपणूक करणं, रक्षण करणं, त्याची निगा राखणं, त्याला खत आणि पाणी घालणं आवश्यक असतं. अध्यात्म विचाराचं बीज मनात पडणंच आधी दुरापास्त. त्यातूनही ते पडलं तरी त्याच्या जपणुकीसाठी, रक्षणासाठी, निगेसाठी आणि त्याला खतपाणी घालून फुलविण्यासाठी खरा सत्संग मिळणं त्याहून दुरापास्त! बाबा बेलसरे यांच्या भेटीनं आणि त्यांच्या पुस्तकांच्या सततच्या वाचन आणि मननानं आध्यात्मिक विचारांचं बीज तर मनात अंकुरलं होतं, पण या रोपाचं रक्षण प्रथम भाऊंनीच केलं!

मराठीतील सर्व विचार पारंब्या बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spiritual thought of mind worship devotion spirituality
First published on: 13-05-2017 at 01:26 IST