21 September 2018

News Flash

देह तव पाचाचे झाले..

ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात

ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पाच महाभूतांचा हा देह कर्माच्या बंधनाने व्यापून आहे. जन्माला आल्यानंतर कर्माशिवाय माणसाची सुटका नाही. एका भजनात कबीर सांगतो, ‘जीवन व्यर्थ न जाये तेरा शुभ कर्मही करते जाना.’ तसेच तो सांगतो, ‘क्या धरती पर लेकर आया, क्या लेकर है जाना..’ चांगले काम केल्याचे समाधान घेऊनच निर्वाण करायचे. आपले जीवन कार्य संपले असे ज्या सत्पुरुषांना संतांना वाटले त्यांनी आपणहून अगदी आनंदाने या जगाचा निरोप घेतला. संत ज्ञानेश्वर,

HOT DEALS
  • Lenovo K8 Note 64 GB Venom Black
    ₹ 10892 MRP ₹ 15999 -32%
    ₹1634 Cashback
  • Lenovo Phab 2 Plus 32GB Gunmetal Grey
    ₹ 17999 MRP ₹ 17999 -0%

संत एकनाथ, रामदास स्वामी, महाप्रभू चैतन्य, आद्य शंकराचार्य, श्री गोंदवलेकर महाराज, स्वामी विवेकानंद अशी कितीतरी उदाहरणे आहेत. अगदी अलीकडच्या काळात ज्यांनी आपले कार्य संपले असे समजून आत्मार्पण केले ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. मातृभूमीसाठीच आपले संपूर्ण जीवन देणाऱ्या सावरकरांनी आपले कार्य संपले हे समजून प्राणांतिक उपोषणास सुरुवात केली. नुसत्या पाण्यावर राहणाऱ्या सावरकरांना, २४ फेब्रुवारी रोजी आपला शेवट जवळ आला हे समजलं. आपली लाडकी मुलगी प्रभात व जामात माधवराव यांना तसे सांगून २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांनी देह ठेवला. सावरकरांचे मनोधैर्य अफाट होते. ब्रिटिश सरकारला आपल्या ध्येयाबद्दल ठणकावून सांगताना ते म्हणत,

अनादी मी अनंत मी, अवध्य मी भला

मारील रिपू जगती असा कवण जन्मला

भिउनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो

सावरकरांच्या तेजाला भिऊन, खरोखरच मृत्यू त्यांच्या जवळ फिरकत नव्हता. आपलं कार्य संपल्यानंतर त्यांनी आनंदानं मृत्यूला जवळ बोलावलं. आपला देह अनंतात विलीन केला. क्षणभंगुर जीवनाचे भान ठेवून, चांगले कर्म करण्याचा संदेश सर्वच संतांनी दिला. आपल्या निर्वाणापूर्वी देहूला अतिशय कळकळीने तुकारामांनी शेवटचे कीर्तन केले त्यात ते सांगतात, ‘आता तरी हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा’

काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, मोह यांना मनात येऊ देऊ नका. सर्व देहुवासी पाणावलेल्या डोळ्यांनी तुकारामांना नजरेत साठवून घेत होते. शेवटी तुकारामांनी अभंग म्हटला, आम्ही जातो आमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा

रामकृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला..

 

माधवी कवीश्वर

madhavi.kavishwar1@gmail.com

First Published on December 24, 2016 12:45 am

Web Title: dnyaneshwari