04 March 2021

News Flash

जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून २० जणांचा मृत्यू, १३ जण जखमी

चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटले ज्यामुळे ही बस दरीत जाऊन कोसळली. बस ज्या ठिकाणी कोसळली तो भाग खोल आहे. त्यामुळे बचाव कार्यात काहीशा अडचणी येत आहेत

फोटो सौजन्य-एएनआय

जम्मू काश्मीर येथील रामबन जिल्ह्यातील बनिहाल या ठिकाणी प्रवासी बस कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला तर १३ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आले आहे तर पोलीसही त्या ठिकाणी पोहचले आहेत. जम्मू सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना ५० हजारांची नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचीही घोषणा केली आहे.

प्रवासी बस आज सकाळी १० च्या सुमारास केला मॉथच्या दिशेने जात होती. त्याच दरम्यान चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटले ज्यामुळे ही बस दरीत जाऊन कोसळली. ही बस ज्या ठिकाणी कोसळली तो भाग खोल आहे. त्यामुळे बचाव कार्यात काहीशा अडचणी येत आहेत. सुरुवातीला दहाजण ठार झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र मृतांचा आकडा आता २० वर पोहचला आहे.

जुलै महिन्यात महाराष्ट्रातील पोलादपूरमध्येही अशीच एक घटना घडली होती. या अपघातात पिकनिकसाठी जाणारी बस पोलादपूरजवळ आंबेनळी घाटात ४०० फूट दरीत कोसळली होती. या अपघातात फक्त एक प्रवासी वाचला तर ३३ जणांचा मृत्यू झाला. जम्मूमध्ये आज घडलेल्या या अपघाताने त्याच आठवणी ताज्या केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2018 3:07 pm

Web Title: 0 people dead and 13 injured in the accident where a minibus fell into a deep gorge at kela moth on jammu
Next Stories
1 डॉलरच्या तुलनेत केवळ रुपयाच नव्हे तर, जागतिक चलनही कमकुवत : अरुण जेटली
2 काँग्रेस ६० वर्षात अपयशीच पण विरोधी पक्ष म्हणूनही ‘फेल’ – नरेंद्र मोदी
3 इंटरपोलच्या अध्यक्षांना चीनने चौकशीसाठी घेतले ताब्यात
Just Now!
X