मध्य प्रदेशच्या दातियाच्या जिल्हा रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला असून २५ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. येथील रुग्णांनी आरोप केला आहे की, त्यांना एका इंजेक्शनमधूनच औषधे देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.


रुग्णालयातील डॉ. पी. के. शर्मा म्हणाले, सर्व रुग्णांना एकाच इंजेक्शनमधून औषधे देण्यात आल्याची बाब खरी आहे. इतकेच नाही तर हे इंजेक्शन स्वच्छ करण्यासाठी रुग्णालयातील परिचारिकांनी डिस्टिल्ड वॉटर वापरण्याच्या ऐवजी साधारण पाण्याचा वापर केला होता. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.


अनेक रुग्णांसाठी एकाच सिरिंजचा वापर केल्यास त्याद्वारे एका रुग्णाच्या रक्तातील जंतू दुसऱ्या रुग्णाच्या रक्तात संक्रमित होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा प्रकारे एकच सिरिंज अनेक रुग्णांसाठी वापरता येत नाही.