छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात सोमवारी नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी स्फोट आणि गोळीबारात सीआरपीएफचा एक जवान शहीद तर ५ जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफच्या २३१ बटालियनचे एक पथक राज्य पोलिसांच्या एका पथकाबरोबर दंतेवाडा जिल्ह्यातील आरनपूर क्षेत्रात कार्यरत होते. त्याचदरम्यान आयईडी स्फोट झाला आणि नंतर नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला.

या स्फोट आणि गोळीबारात ६ जवान जखमी झाले. त्यातील एका जवानाच मृत्यू झाला. ही घटना सांयकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी दंतेवाडा जिल्ह्यात निमलष्करी बलाच्या कमाल चौकीजवळ झाला. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने जखमींना उपचारासाठी नेण्यात आले.