News Flash

अनंतनागमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा

जखमी पोलिसाला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अनंतनागमध्ये दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोध मोहिम राबवण्यात येते आहे

जम्मू काश्मीर येथील अनंतनागमध्ये पोलीस आणि दहशवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला आहे. तर एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. या दहशतवाद्याची ओळख पटवण्यात आलेली नाही. जखमी पोलिसाला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अनंतनागमध्ये दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोध मोहिम राबवण्यात येते आहे.

याआधी १ सप्टेंबरलाही बंदिपुरा सेक्टरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं. शनिवारी म्हणजेच १ सप्टेंबरला झालेल्या कारवाईत पोलिसांनी दहशतवाद्यांकडे असलेली शस्त्रास्त्रे, दारूगोळा जप्त केला. किलो फोर्स या भारतीय जवानांच्या तुकडीचाही या कारवाईत समावेश होता. या कारवाईत दोन जवान जखमी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 6:34 am

Web Title: 1 terrorist killed 1 policeman injured in weapon snatching bid which was foiled by police in anantnag
Next Stories
1 भारत इंग्लंड कसोटी सामना पाहण्यासाठी आला होता कर्जबुडव्या विजय मल्ल्या
2 हिंदू समाज एकत्र आला तरच प्रगती करू शकेल -मोहन भागवत
3 Me Too Urban Naxal ची पाटी गळ्यात अडकवल्याने गिरीश कर्नाड यांच्याविरोधात तक्रार
Just Now!
X