News Flash

घुसखोरांच्या हल्ल्यात १० ठार

अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील हेरथ प्रांतात घुसखोरांनी शनिवारी भल्या पहाटे एका बांधकाम छावणीवर केलेल्या हल्ल्यात १० जण ठार झाले, असे पोलिसांनी सांगितले.

| August 18, 2013 12:06 pm

अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील हेरथ प्रांतात घुसखोरांनी शनिवारी भल्या पहाटे एका बांधकाम छावणीवर केलेल्या हल्ल्यात १० जण ठार झाले, असे पोलिसांनी सांगितले.
कारुख जिल्ह्यात बांधकाम छावणीवर करण्यात आलेल्या हल्ल्यात नऊ मजूर आणि एक पोलीस ठार झाला. अफगाणिस्तान आणि जर्मनीतील एका कंपनीच्या संयुक्त विद्यमाने ५२ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे बांधकाम सुरू होते, तेथे हे मजूर काम करीत होते. ज्या विकासकामांना परकीय निधीची मदत मिळाली आहे अशा कामांवर घुसखोरांकडून सातत्याने हल्ले करण्यात येत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2013 12:06 pm

Web Title: 10 died in attack of intruders in afghanistan
Next Stories
1 १५ ऑगस्टला भारतात स्फोट घडविण्याचा बेत होता!
2 ‘भगतसिंग यांच्या त्यागावरून निर्माण झालेला वाद दु:खद’- पंतप्रधान
3 धार्मिक संघर्षांने धुमसती श्रीलंका
Just Now!
X