News Flash

१३ गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तिबरोबर काहीही होऊ शकते

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे विधान

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी काँग्रेस नेते विकास चौधरी यांच्या हत्येबाबत  एक खळबळजनक विधान केले आहे.

ज्यांच्या खुन झाला त्यांच्याविरोधात १३ एफआयआर दाखल होते, शिवाय त्यांचे चरित्र देखील फार चांगले नव्हते. अशावेळा अशा माणसाबरोबर काहीपण घडू शकते, कदाचित हे वैयक्तिक द्वेषातून घडले असावे. घटनेचा तपास करण्यासाठी पोलिस पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आरोपींना वाचणार नाहीत.

हरियाणात  मंगळवारी फरिदाबाद येथे काँग्रेस प्रवक्ते विकास चौधरी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. विकास चौधरी आपल्या कारमधून प्रवास करत असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात जखमी झालेल्या विकास चौधरी यांचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 3:31 pm

Web Title: 13 firs against him anything could be possible with such a person msr 87
Next Stories
1 गांधींवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी काँग्रेसने नरसिंह राव यांच्याकडे दुर्लक्ष केलं, नातवाचा आरोप
2 छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान शहीद
3 वाचा मुस्लीम ड्रायव्हर व तस्लिमा नासरीन यांच्यातला संवाद
Just Now!
X