मलप्पुरम : कोळीकोड विमान दुर्घटनेतील जखमींपैकी १४ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे मलप्पुरमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. या अपघातात दोन वैमानिकांसह १८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. जखमींपैकी १०९ प्रवाशांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी १४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आतापर्यंत ४९ प्रवाशांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, अपघातात मृत्यूमुखी पडलेले कॅप्टन दीपक साठे यांचे पार्थिव रविवारी मुंबईत आणण्यात आले. त्यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार होतील.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 10, 2020 12:14 am